Home /News /lifestyle /

कोणताही diet नाही तर फक्त beer पिऊन fat to fit; घटवलं तब्बल 18 kg वजन

कोणताही diet नाही तर फक्त beer पिऊन fat to fit; घटवलं तब्बल 18 kg वजन

ही व्यक्ती खाणं सोडून 46 दिवस फक्त बिअरवर राहिली.

    वॉशिंग्टन, 05 एप्रिल : कोणत्याही डायटेशिअन किंवा वेट लॉस (Weight loss) स्पेशालिस्टकडे गेलात की सर्वात आधी तुम्हाला तुम्हाल साखरेचं प्रमाण आणि अल्कोहोल टाळायला किंवा कमी करायला सांगितलं जातं. या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहेत आणि त्यामुळे वजन वाढतं, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हेल्दी फूड घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अमेरिकेतील एका व्यक्तीने मात्र बिअर पिऊनच आपलं वजन घटवलं (Man lost weight by drinking beer) आहे. अमेरिकेच्या सिनसिनाटी शहरात राहणारे आणि आधी आर्मीत असलेले डेल हॉल यांनी फक्त बिअर पिऊनच आपलं तब्बल 18 किलो वजन घटवलं आहे. ते तब्बल 46 दिवस फक्त बिअरवरच राहिले. म्हणजे दोन महिने त्यांनी दुसरं काहीच खाल्लं नाही. हे वाचा - पासपोर्ट, व्हिसा नाही; इथं राहण्यासाठी चक्क काढून टाकावा लागतो शरीरातील एक अवयव हॉल यांना ब्रेकफास्ट करायला फार आवडत नाही. दिवसातून ते दोन ते पाच बिअर प्यायचे. सर्वात पहिली बिअर दुपारी जेवणाच्या वेळी पितो. त्यानंतर भूख लागली तर पुन्हा दुसरी बिअर, असं हॉल यांनी सांगितल्याचं आज तकच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हॉल म्हणाले, माझं कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर आणि ब्लड शुरगसुद्ध कमी झालं आहे. म्हणजे नियंत्रणात आहे.  माझं शरीर आता मला योग्य वाटचं. वजन कमी झाल्याने मी खूप आनंदी आहे. हे सेलिब्रेट करण्यासाठी ते आपले आवडते पदार्थ खाण्याचा विचार करत आहेत. हे वाचा - बाबो! यांच्या शरीरातून तर आरपार दिसतं; काचेसारखे पारदर्शी असलेले जीव सोबतच आपण वजन घटवण्यासाठी हा जो प्रयोग केला आहे, तो दुसऱ्या कुणी फॉलो करावं असं मी बिलकुल सांगत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Beer, Fitness, Health, Lifestyle, Weight loss, Wellness

    पुढील बातम्या