Home /News /lifestyle /

Online Yoga Session: ही आसनं केलीत तर श्वसनसंस्था राहील निरोगी; लवचिक शरीरासाठी करा हे व्यायाम

Online Yoga Session: ही आसनं केलीत तर श्वसनसंस्था राहील निरोगी; लवचिक शरीरासाठी करा हे व्यायाम

योगासनामुळे मानवी शरीराला अनेक फायदे होतात

योगासनामुळे मानवी शरीराला अनेक फायदे होतात

ही पाच आसनं कराल तर पाठदुखी, कंबरदुखी होणार नाही. श्वसनसंस्था सुधारणारे काही प्राणायामाचे प्रकार पाहा या VIDEO मधून...

नवी दिल्ली, 25 मे :  सध्याच्या कोरोना साथीच्या (Coronavirus Pandemic) या संसर्गापासून वाचण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती चांगली असणं आवश्यक आहे. याकरता नियमितपणे योगासनं (Online Yoga Sessipn) करणं महत्त्वाचं आहे. शरीराची लवचिकता वाढवण्यासाठीही योगासने (Asanas for flexible body) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. सध्या अनेक लोक घरी राहून ऑफीसचं काम करत आहेत. त्यामुळं अनेकांना खूप वेळ एकाच ठिकाणी बसल्यामुळे पाठदुखी, कंबर दुखी उद्भवत आहे तसंच पोटावरची चरबीही (Yoga for reducing belly fat) वाढत आहे. अशा सगळ्या समस्या दूर करण्यासाठी काही विशिष्ट योगासनं करणं आवश्यक आहे. आजच्या थेट योग सत्रामध्ये काही खास योग व्यायाम शिकवले गेले. योगासने केल्यानं शरीर निरोगी राहते. योगासने केल्यावर शरीराला आराम मिळावा म्हणून प्राणायाम करा. यामुळे शरीराचा थकवा दूर होतो. शरीरा संतुलित ठेवण्यासाठी प्राणायाम उत्तम व्यायाम आहे. बटरफ्लाय/फुलपाखरू आसन : या बटरफ्लाय (Butterfly) किंवा फुलपाखरू आसन महिलांसाठी खूपच फायदेशीर आहे. हे आसन करण्यासाठी, आपले पाय समोर पसरवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. गुडघे वाकवून दोन्ही पाय ओटीपोटाच्या दिशेने आणा. दोन्ही हातांनी दोन्ही पावलं घट्ट धरा. पायाच्या टाचा शक्य तितक्या गुप्तांगांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. एक लांब श्वास घ्या, श्वास बाहेर सोडत गुडघे आणि मांड्या जमिनीच्या दिशेने दाबा. नंतर फुलपाखराच्या पंखांप्रमाणे दोन्ही पाय खाली आणि वर हलवा. श्वास घ्या आणि श्वास सोडा. सुरुवातीला, हे शक्य असेल तेवढाच वेळ करा नंतर हळूहळू सराव वाढवा. प्रेग्नंट, ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांनाही मिळणार कोरोना लस; पण एक अट मलासन : शौच करताना आपण ज्या स्थितीत बसतो त्याला मलासन (Malasan) म्हणतात. ही स्थिती पोट आणि पाठीसाठी खूप लाभदायी आहे. हे आसन करण्यासाठी, सर्वप्रथम, दोन्ही गुडघे वाकवून शौच करताना जसे बसतो तसे बसा. मग उजवा गुडघा उजव्या काखेत आणि डावा गुडघा डाव्या काखेत आणि हात जोडलेले अशी नमस्कार मुद्रा करा. याच स्थितीत काही काळ थांबा आणि नंतर सामान्य स्थितीत या. मलासनामुळे गुडघे, सांधे, पाठ आणि पोटातील वेदना कमी होतात. बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येपासूनही मुक्तता होते. त्रिकोणासन : त्रिकोणासन (Trikonasan) करण्यासाठी दोन्ही पायात साधारणपणे दीड फूट अंतर घेऊन उभे रहा. दोन्ही हात खांद्यांच्या मागे पसरा. श्वास घेत डावा हात पुढे घ्या आणि डाव्या तळव्याजवळ जमिनीवर टेकवा किंवा डाव्या पायाच्या घोट्याला लावा, मग उजवा हात उभा करा आणि मान उजवीकडे वळवून उजव्या हाताच्या दिशेनं बघा. श्वास बाहेर सोडत पूर्व स्थितीत या. यानंतर उजव्या बाजूनेदेखील हीच क्रिया करा. यामुळे कंबर लवचिक होते आणि शरीराच्या मागच्या भागावरील चरबी कमी होते. मेंदूज्वर म्हणजे काय आणि तो कसा रोखता येऊ शकतो? भस्रिका : कोरोनाच्या काळात आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी भस्रिका (Bhasrika) या प्राणायामाच्या प्रकाराचा सराव करा. हा मुख्यतः श्वसनाचा व्यायाम आहे. श्वसन व्यवस्था बळकट करण्यासाठी याचा फायदा होतो. यामुळे रक्ताचं शुध्दीकरण वेगानं होतं तसंच शरीराच्या विविध भागांमध्ये वेगवान रक्ताभिसरण होतं. कपालभाती: कपालभातीमुळे (Kapalbhati) ताणतणाव हातळणं सोपं होतं. कपालभाति प्राणायाम करताना पाठीचा कणा ताठ ठेवून ध्यान मुद्रा किंवा सुखासनात बसा किंवा खुर्चीवर बसा. यानंतर, दोन्ही नाकपूडयामधून शक्य तितक्या वेगवान श्वास बाहेर सोडा. पोट शक्य तितके आत ओढून घ्या. यानंतर दोन्ही नाक पूडयातून श्वास आत घ्या आणि पोट सैल सोडा. आपली क्षमतेनुसार हळूहळू 50 वेळा ही क्रिया करा. त्यानंतर हळूहळू प्रमाण वाढवत 500 वेळादेखील ही क्रिया करू शकता. परंतु एका वेळी एकाच पद्धतीनं 50 पेक्षा जास्त वेळा ही क्रिया करू नका. हळूहळू प्रमाण वाढवा. किमान 5 मिनिटे आणि जास्तीत जास्त 30 मिनिटांपर्यंत हा व्यायाम केला जाऊ शकतो. अनुलोम विलोम (Anulom Vilom) प्राणायामः सर्वात आधी सुखासनात बसा. यानंतर, उजव्या अंगठ्याने उजव्या नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. आता अनामिकेनं डावी नाकपुडी बंद करा. यानंतर, उजवी नाकपुडी उघडा आणि श्वास बाहेर सोडा. आता उजव्या नाकपुड्यातून श्वास घ्या आणि हीच क्रिया करून डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या.
First published:

Tags: Yoga

पुढील बातम्या