मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Online Class ने मुलांचं भविष्य वाचवलं, मात्र डोळ्यांचं काय?

Online Class ने मुलांचं भविष्य वाचवलं, मात्र डोळ्यांचं काय?

आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात माणूस पूर्णपणे बदलला आहे. सकाळी डोळे उघडण्यापासून ते रात्री डोळे बंद करण्यापर्यंत आपला बहुतांश वेळ स्क्रीनकडे (Screen) बघण्यात जातो, मग तो मोबाईल चालवण्यात, टीव्ही पाहण्यात किंवा कॉम्प्युटर/लॅपटॉपवर काम करण्यात जातो. पण या सगळ्याचा आपल्या डोळ्यांवर (Effect on Eye) किती वाईट परिणाम होतो याचा कधी विचार केला आहे का?

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 19 नोव्हेंबर : आपली तरुण पिढी सर्वाधिक वेळ ऑनस्क्रीन घालवताना पहायला मिळत आहे. कधी मोबाईल, कधी लॅपटॉप किंवा टीव्ही आणि कॉम्प्युटर. ही गॅजेट्स आपल्या आजच्या जीवनासाठी खूप महत्त्वाची आहेत. लॉकडाउनमुळे मागील दोन वर्षात हे प्रमाण प्रचंड वाढलं आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयं बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. परिणामी आता जवळपास प्रत्येकजण मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रिनला चिकटलेला दिसतो. मात्र, डोळ्यांच्या भविष्यासाठी हे घातक आहे. वरील गोष्टी आवश्यक असल्या तरी आपल्या डोळ्यांचे आरोग्य राखणेही महत्त्वाचे आहे. जेणेकरून आपण हे सुंदर जग पाहू शकू. या गोष्टी थेट बंद करणं अशक्य असलं तरी यावर काही रामबाण उपाय नक्कीच आहेत.

सतत ऑनस्क्रीन असल्याने काय होतं?

मोबाईल, कॉम्प्युटर/लॅपटॉप, टेलिव्हिजन इत्यादी सर्व प्रकारच्या स्क्रीन हानिकारक निळा प्रकाश सोडतात, ज्यामुळे आपल्या डोळ्यांवर खूप परिणाम होतो. या निळ्या प्रकाशाने आपली दृष्टी कमकुवत होत जाते. साधारणपणे, मिनिटाला 12 ते 14 वेळा डोळे मिचकावतात, परंतु जेव्हा आपण मोबाईल स्क्रीनवर राहतो तेव्हा हा दर फक्त 6 ते 7 होतो. त्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढत असून डोळे कमकुवत होत आहेत.

हे आपल्या लक्षात येत नसलं तरी तुम्ही हे निरिक्षण घरी करु शकता. डोळे कमी मिचकावल्यामुळे (eye blinking) आपल्या डोळ्यातील तेल ग्रंथी काम करणे बंद करतात. या ग्रंथी किंवा सूक्ष्म रक्तवाहिन्या आपल्या डोळ्यातील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्याचे काम करतात. पण पापण्या न मिचकावल्यामुळे डोळ्यांतील कोरडेपणा वाढतो.

अंधुक दृष्टी: रात्री उशिरापर्यंत स्मार्टफोन वापरल्यामुळे डोळ्यांमध्ये अंधुक दिसणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने स्क्रीनचा प्रकाश थेट डोळ्यांवर पडतो. आणि यामध्ये डोळ्यांवर खूप परिणाम होतो.

फक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी? घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST

रेटिनावर हल्ला: तुम्ही रात्री फोन वापरता तेव्हा त्यातून निघणारा प्रकाश थेट डोळ्याच्या रेटिनावर परिणाम करतो. त्यामुळे डोळे लवकर खराब होतात. आणि बघण्याची क्षमता देखील हळूहळू कमी होते

डोळे लाल होणे : सतत स्क्रीनकडे पाहत राहिल्याने डोळ्यांचा पांढरा भाग लाल होऊ लागतो. आय ड्रॉप्स टाकूनही हा त्रास कमी होत नाही. लाल होण्यासोबतच डोळे नेहमी सुजलेले दिसतात

डोळ्यांना लवकर चष्मा लावणे : आज मोबाईल फोन हे इतके महत्त्वाचे झाले आहे की त्याशिवाय कोणीही राहू शकत नाही, परंतु त्याचा अतिरेक केल्याने डोळ्यांना चष्मा येतो आणि नंतर चष्म्याचा नंबरही वाढू लागतो. काही वर्षांनी तुम्हाला डोळ्याचे ऑपरेशन देखील करावे लागेल.

Under Eye Skin Care: या 3 चुकांमुळे डोळ्याखाली येतात काळी वर्तुळं; काय कराल?

मोबाईल फोन वापरताना ही काळजी घ्या

मोबाईल डोळ्यांपासून दूर ठेवा. कारण तो डोळ्यांचे काही प्रमाणात संरक्षण करू शकतो. फोन वापरताना, मोबाईल फोन डोळ्यांच्या अगदी जवळ नसल्याची खात्री करा.

रात्री जास्त वेळ फोन वापरू नका. रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्याने झोपेचा त्रास होतो आणि नंतर ती सवय बनते. त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडतात, इत्यादींचाही दृष्टीवर वाईट परिणाम होतो.

मोबाईल वापरत असताना, 20 मिनिटांनी किमान 20 सेकंदांचा ब्रेक घ्या, डोळ्यांना आराम मिळेल

मोबाईल अथवा कॉम्प्युटर वापरताना घरात पूर्ण प्रकाश ठेवावा. अंधारात या वस्तू वापरू नये. त्यामुळे डोळ्यांना आणखी त्रास होण्याची शक्यता आहे.

त्याकरता देखील मुलं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर करतात. सतत एका ठिकाणी नजर ठेवून पाहिल्यामुळे मायोपिया व्हायला लागलेला आहे.

त्याकरता देखील मुलं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर करतात. सतत एका ठिकाणी नजर ठेवून पाहिल्यामुळे मायोपिया व्हायला लागलेला आहे.

तुमचा मोबाईल वापरत असताना त्याची ब्राइटनेस कमी ठेवा. यामुळे डोळ्यांवरील दाब कमी होईल

मोबाईलमध्ये दिलेला आय कम्फर्ट ऑप्शन ऑन ठेवा. त्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो.

शक्यतोवर कोणत्याही कारणाशिवाय मोबाईल वापरू नका आणि शक्य असल्यास आय प्रोटेक्ट ग्लास वापरा. याच्या मदतीने स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश टाळता येऊ शकतो.

Eye Care tips : तुमच्याही डोळ्यांना खाज आणि जळजळ होतेय का? घरच्या-घरी करा हे सोपे उपाय

लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर होणारी कामे असतील तर मोबाईलचा वापर टाळावा. कारण, लॅपटॉप, कॉम्प्युटर डोळ्यांपासून खूप दूर असतात. शिवाय यांच्या स्क्रिनमधून निघणारा प्रकार मोबाईलच्या तुलनेत कमी तीव्रतेचा असतो.

जर तुमचे काम असे असेल की तुम्हाला स्क्रीनवर बराच वेळ घालवावा लागत असेल तर डोळे मिचकावण्याकडे लक्ष द्या. दर 45 मिनिटांनी स्क्रीनवरून ब्रेक घ्या. लुब्रिकेंटिंग करणारे डोळ्याचे ड्रॉप वापरा, कोमट पाण्याने डोळ्यांना मसाज करा.

First published:

Tags: Eyes damage, Mobile Phone, Online