मुंबई, 13 ऑक्टोबर : बुहुतेक घरगुती भाज्या आणि इतर अन्नपदार्थांमध्ये कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु ऐनवेळी कांदा संपला किंवा कांदा महाग झाला म्हणून तुम्ही आणला नसेल. पण कांद्याशिवाय जेवणही जात नसेल तर काय करायचं? किंवा तुम्हाला कांदा हवा पण घरातील एखाद्या सदस्याला कांदा नको असेल तर काय करायचं? तर या तुमच्यासाठी सोप्या टिप्स.
द्याचा वापर न करता तुम्हाला तितकंच चविष्ट जेवण बनवता येईल आणि कांद्याच्या स्वादाइतकी नव्हे पण त्याच्या जवळपास पदार्थाची तशीच चव चाखता येईल.
- भाजीसाठी ग्रेव्ही बनवताना तुम्ही कांद्याऐवजी टोमॅटोचा देखील वापर करू शकता. जेवण बनवताना टोमॅटोसोबत इतर मसल्यांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास स्वयंपाक अधिक चविष्ट होईल. तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही भोपळा देखील वापरू शकता. ग्रेव्ही बनवण्यासाठी भोपळा आधी पाण्यात शिजवून घ्या आणि नंतर त्याचा वापर भाजीच्या मसल्यामध्ये करा.
- तुमच्याकडे कांदा नसेल तर भाजी चवदार बनवण्यासाठी तुम्ही काकडी आणि गाजराचा वापर करू शकता. भाज्यांव्यतिरिक्त तुम्ही सँडविचमध्ये देखील कांद्या काकडी-गाजरचा जास्त वापर करू शकता.
- भाजीचा रस्सा घट्ट किंवा चविष्ट बनवण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो. परंतु तुम्ही कांद्याऐवजी घट्ट दही किंवा शेंगदण्याचा कुट वापरू शकता. यामुळे भाजीची ग्रेव्ही घट्ट होते.
चलन म्हणून वापरला जायचा कांदा, या देशात पूजेतही ठेवायचे! रडवणाऱ्या कांद्याबद्दल 8 गंमतशीर गोष्टी
- एखाद्या भाजीचा रस्सा घट्ट करण्यासाठी तुम्ही मैद्याचाही वापर करू शकता. यासाठी आधी मैदा परतून घ्यावा लागेल. लालसर होईपर्यंत मैदा तेलात परतावा आणि त्यात टोमॅटो घालून मिक्स करा. यामुळे घट्ट ग्रेव्ही तयार होईल.
- याशिवाय तुम्ही भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी आणि भाजी चवदार बनवण्यासाठी त्यात ओलं खोबरं देखील घालू शकता. ग्रेव्हीसाठी कांद्याऐवजी ओलं खोबरं हा चांगला पर्याय ठरू शकतो. ओल्या खोबऱ्यासोबत लसूण आणि आल्याची पेस्ट करून तुम्ही भाजीसाठी मसाला तयार करू शकता.
- कांदा खेरीदी करणे तुम्हाला परवडत नसेल किंवा तुमच्याकडी कांदा संपला असेल तर तुम्ही त्याऐवजी लसणाचा वापर करू शकता. कांदा नसेल तर भाजीमध्ये लसणाचा अधिक वापर करा. लसणामुळे अन्नाची चव तर वाढतेच शिवाय तुमच्या शरीराला अनेक आरोग्यदायी तत्त्व देखील त्यातून मिळतात.
Onion benefits : लाल की पांढरा, आरोग्यासाठी कोणता कांदा चांगला?
- पर्याय कोबीचा देखील वापर केला जाऊ शकतो. भजी किंवा कोशिंबरी बनवताना तुम्ही त्यात कांद्याऐवजी कोबीचा वापर करू शकता. तसेच बटाटा देखील कांद्याला पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो. पोहे, भजी किंवा इतरही अनेक पदार्थांमध्ये तुम्ही कांद्याऐवजी बटाटा वापरू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Onion