नवी दिल्ली, 24 जानेवारी : खाद्यपदार्थांमध्ये वापरला जाणारा कांदा हा सौंदर्यासाठीदेखील फायदेशीर आहे. कांदा हा त्वचेसाठी (Skin) आणि केसांसाठी (Hair) फार उपयोगी ठरतो. कांद्याचा रसाचा वापर त्वचा आणि केसांसाठी केला जातो. पण फक्त कांदाच नव्हे तर कांद्याची सालही (Onion peel) तितकीच फायदेशीर आहे. कांद्याच्या सालीमध्ये विविध गुणधर्म असतात.
अनेकदा आपण कांद्याच्या साली फेकून देतो. पण यामध्ये विविध प्रकारची पोषक तत्वे आणि व्हिटॅमिन्स (Vitamins) असतात. सालीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे दररोजच्या वापरताही कांद्याच्या या सालीच्या मदतीने तुम्ही निरोगी राहू शकता. पाहुयात सालीचे नेमके काय फायदे आहेत.
1) केसांसाठी फायदेशीर
केस गळतीमुळे बरेच लोक त्रस्त आहेत. कांद्याच्या सालाचा (Onion peel) रस केसांची वाढ वाढवण्यात मदत करू शकतो. केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस खूप फायदेशीर मानला जातो. केस वाढत नसल्यास आपण कांद्याची साल वापरू शकता. यासाठी तुम्ही कांद्याची साल पाण्यात उकळवा. या पाण्याने केस धुतल्यास तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. केसांमधील कोंडा कमी होण्यासाठीदेखील कांद्याची साल खूप उपयोगी आहे. याचबरोबर कांद्याची साल (Onion peel) नैसर्गिक हेअरडाय देखील आहे. कांद्याच्या साली उकळून त्याचे पाणी केसांना लावून तुम्ही अर्धा तास ठेवू शकता. केस धुतल्यानंतर तुमच्या केसांना नैसर्गिक चमक येईल.
हे वाचा - एकेकाळी प्रचंड पाणीटंचाई असलेल्या या प्रांतात आज पिकतेय लालबुंद स्ट्रॉबेरी शेती
2) पायांच्या दुखण्यात आराम
कांद्याच्या सालीचा चहा करून प्यायल्यास तुम्हाला पायाच्या दुखण्यामध्ये आराम मिळू शकतो. दररोज 1 कप कांद्याच्या सालीचा चहा प्यायल्यास काही दिवसांमध्ये तुम्हाला नक्की आराम मिळेल.
3) खत म्हणून देखील फायदेशीर
घरामधील झाडांना तुम्ही कांद्याच्या सालीचं खत (Fertilizer) तयार करून वापरू शकता. नैसर्गिक पद्धतीनं तयार होणारं हे खत खूपच फायदेशीर आहे. ऑरगॅनिक पद्धतीचं हे खत रोपांना घातल्यास उत्पादकता देखील वाढते.
हे वाचा - लठ्ठ असाल तर कोरोना लशीचा प्रभाव तुमच्यावर कमी असेल; संशोधक काय सांगतात वाचा
4) त्वचेसाठी फायदेशीर
कांद्याच्या सालीमध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात. पायाला खाज किंवा कोणत्याही प्रकारचा किडा चावला असल्यास कांद्याच्या सालीचा खूपच फायदा होतो.