बहुगुणी आहे कांद्याचा रस; रोगप्रतिकारक शक्ती वाढवून या आजारांना ठेवतो दूर

बहुगुणी आहे कांद्याचा रस; रोगप्रतिकारक शक्ती वाढवून या आजारांना ठेवतो दूर

जर कांद्याचा रस (onion juice) प्यायलो तर ते औषधासारखं अनेक आजारांवर काम करते.

  • Last Updated: Jul 23, 2020 07:59 PM IST
  • Share this:

जेवणात कांदा नसला तर चव जाते. कांदा चवीला छान असतो, तसेच त्यात अनेक पोषक गुणही असतात. कांदा अँटी-अॅलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक आहे. जर कांद्याचा रस प्यायलो तर ते औषधासारखं अनेक आजारांवर काम करते. जसे कांद्याच्या रसाने रक्त शर्करा नियंत्रित होते. जाणून घेऊ या रसाचे फायदे -

केस गळण्यावर प्रभावी

ज्या लोकांचे केस खूप गळतात, त्यांना कांद्याच्या रसाचा खूप फायदा होतो. कांद्यामध्ये जीवनसत्व बी असते ते केसांच्या मुळांना मजबूत करते. ते केसातील सीबम (एक प्रकारचे नैसर्गिक तेल) प्रमाणात ठेवते.

myupchar.com च्या डॉ. अप्रतिमा गोयल यांनी सांगितल्यानुसार, पूर्वीच्या काळी लोक केस चांगले घनदाट होण्यासाठी कांद्याचा रस लावायचा सल्ला द्यायचे. कांद्याच्या रसाचे नियमित सेवन केले तरी त्यापासून फायदाच होतो. त्याने केस घनदाट, चमकदार आणि मजबूत होतात.

कांद्याचा रस रक्ताभिसरण वाढवतो

शरीरातील सर्व अवयवांमध्ये रक्ताभिसरण योग्य होणे आवश्यक आहे. जर ते व्यवस्थित होत नसेल तर अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. कांद्याचा रस प्यायल्याने या समस्या दूर होतात. सकाळी रिकाम्या पोटी कांद्याचा रस प्यायल्याने पचन चांगले होते आणि पित्ताच्या समस्या दूर होतात.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

कांद्यात मॅग्नेशियम भरपूर असते, ते रक्दाबाल संतुलित ठेवण्यात मदत करते. ज्यांचा रक्तदाब नेहमी वाढलेला असतो, त्यांनी रोज कांद्याचा रस प्यायला हवा.

त्वचेवरील सूज दूर होते

कांद्याच्या रसात अँटी इन्फ्लेमेटरी घटक आहेत, ते रक्तात तात्काळ विरघळतात, कांद्याच्या रसाने शरीराच्या त्वचेवर असलेली सूज लवकर उतरते.

स्मरणशक्ती चांगली करतो कांद्याचा रस

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लोक सुकामेवा खातात. पण कांद्याचा रसही स्मरणशक्ती वाढवतो. त्यात ओमेगा -3 फॅटी अॅसिड असते त्याने स्मरण क्षमता मजबूत होते. यासाठीच मुलांनी कांद्याचा रस प्यायला हवा.

रोग प्रतिकारशक्ती मजबूत राहते

जे लोक कांद्याच्या रसाचे रोज सेवन करतात त्यांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. त्याशिवाय कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता कमी होते.

मासिक पाळीमध्ये महिलांना फायदेशीर

मासिक पाळीच्या कालावधीत समस्यांपासून सुटका होण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त आहे. पाळी सुरू होण्यापूर्वी कच्च्या कांद्याचा रस प्यायल्याने लाभ होतो. अशक्तपणाही जाणवत नाही.

तोंड आणि दात याच्या वेदनांमध्ये फायद्याचे

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितल्यानुसार, कांदा खाल्ल्यावर तोंडातून दुर्गंधी येत असली तरी त्याचा रस तोंड आणि दातांसाठी खूप गुणकारी आहे. कांदा नियमित खाल्ल्याने तोंड आणि दातांसंबंधित कुठलाही आजार होत नाही. विशेषतः दातांच्या वेदना लवकर बऱ्या होतात.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - औषधी वनस्पती

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 23, 2020, 7:59 PM IST

ताज्या बातम्या