मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

High Blood Sugar: मधुमेहाच्या रुग्णांनी कोरफडीसोबत खावी ही एक गोष्ट; नेहमी साखर राहील नियंत्रणात

High Blood Sugar: मधुमेहाच्या रुग्णांनी कोरफडीसोबत खावी ही एक गोष्ट; नेहमी साखर राहील नियंत्रणात

रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी औषधांसोबतच तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता. त्यामुळं लवकर परिणाम दिसतील.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 23 डिसेंबर : रक्तातील साखरेची उच्च पातळी मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळं हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि स्ट्रोकसारखी (Strok) गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. यासाठी आपण आपल्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी औषधांसोबतच तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता. त्यामुळं लगेच फायदा होईल.

'झी न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार तज्ज्ञांच्या मते, आवळा आणि कोरफडीचा रोजच्या आहारात समावेश केल्यास तुम्हाला मधुमेहाच्या समस्येत फायदा होईल. यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. आवळा आणि कोरफडीचं सेवन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबत हृदय, मूत्रपिंड आणि यकृत निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी आहे.

आवळा खाण्याचे फायदे

आवळ्याच्या सेवनानं इन्सुलिन सक्रिय होतं आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हे नैसर्गिक पद्धतीनं कोलेस्टेरॉल कमी करतं. तसंच रक्तातील साखरेची उच्च पातळी नियंत्रित करतं. आवळ्यामध्ये पॉलीफेनॉल असतं, जे रक्तातील साखरेच्या उच्च पातळीमुळं होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणावापासून शरीराचं रक्षण करतं.

हे वाचा - Health Tips : हिवाळ्यात सुक्या मेव्याचं जास्त प्रमाण असं ठरू शकतं घातक, वाचा सविस्तर

कोरफडीचे फायदे

कोरफडीमध्ये एसेमनन नावाचं तत्त्व असतं. हे हायपोग्लायसेमिक आहे. म्हणजेच, त्याचा ग्लुकोज कमी करणारा प्रभाव आहे. कोरफडीमध्ये हायड्रोफिलिक फायबर, ग्लुकोमनन आणि फायटोस्टेरॉलसारखी अनेक संयुगं असतात, जी रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात.

हे वाचा - Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी

आवळा आणि कोरफडीचं मिश्रण

आवळा पावडर आणि कोरफड दोन्ही समान प्रमाणात मिसळा आणि रिकाम्या पोटी सेवन करा. हे मिश्रण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याबरोबरच चयापचय देखील वाढवतं. कोरफडीचा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यानं देखील तुम्हाला फायदा होईल. पण तो जास्त प्रमाणात पिऊ नये. त्यात थोडा आवळ्याचा रस घाला आणि नियमित सेवन करा.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Diabetes, Tips for diabetes