एक ग्लास दारूही करेल तुमचा घात; संशोधनात समोर आली धक्कादायक बाब

एक ग्लास दारूही करेल तुमचा घात; संशोधनात समोर आली धक्कादायक बाब

एक किंवा दोन ग्लास दारू प्यायल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हे संशोधकांनी सांगितलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 27 डिसेंबर :  बहुतेक लोक दारू पिऊन (Alcohol Consumption) ड्रायव्हिंग करतात. त्यांना आपण शुद्धीत असल्याचं आणि आपल्यावर ताबा असल्याचं वाटतं. मात्र तुम्ही अतिशय कमी प्रमाणात जरी अल्कोहोलचं सेवन केलं असलं तरीही तुमच्या अनेक कामांत अडथळा येतो. ड्रायव्हिंग करणं (Driving) आणि इतर गोष्टींवर याचा प्रभाव (Affect) पडतो.  एक किंवा दोन ग्लास अल्कोहोल प्यायल्यानंतर तुमच्या हाताचं आणि डोळ्यांचं संतुलन (Hand-Eye Coordination) बिघडत असल्याचं संशोधनात समोर आलं आहे.

कॅलिफोर्नियामधील नासाच्या अ‍ॅम्स रिसर्च सेंटरमधील (NASA's Ames Research Center) संशोधक पथकाच्या अभ्यास पथकाने हा अभ्यास केला. एक किंवा दोन ग्लास अल्कोहोल पिल्यानंतर तुमच्या हाताचे आणि डोळ्यांचं संतुलन बिघडत असल्याचं संशोधनात दिसून आलं.

या संशोधनामध्ये आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा ड्रिंक करणाऱ्या 20 वर्षीय मुली आणि मुलांना निवडण्यात आलं होत. सहभागी मुलांनी रात्री उत्तम झोप घेतली आहे की नाही हे सुरुवातीला तपासण्यात आले. त्याचबरोबर प्रयोगाच्या आदल्या रात्री त्यांनी कोणत्याही प्रकारचया  अल्कोहोलचे (Alcohol) आणि कॅफिनचे (Caffin) सेवन केलं नसल्याचं देखील तपासण्यात आलं होतं.

यानंतर त्यांच्या डोळ्यांची हालचाल, बुबुळांची हालचाल आणि रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण यांचं निरीक्षण केलं. यामध्ये अल्कोहोलचे सेवन केल्यानंतर आणि सेवन करण्याआधी त्यांचे काम करताना निरीक्षण करण्यात आलं. यामध्ये त्यांच्या रक्तात विविध प्रमाणात अल्कोहोलची पातळी होऊ शकणारे मिक्स ड्रिंक देण्यात आलं. यामुळं आपण नक्की किती अल्कोहोल घेतलं आहे याचा त्यांची कल्पना त्यांना नव्हती.

हे वाचा - DON'T WORRY तुम्हाला कोरोना लस मिळाली नाही तरी औषध तयार; व्हायरसपासून करणार बचाव

त्यानंतर संशोधकांनी 21 वेगवेगळ्या डोळ्यातील निरीक्षणं नोंदवली. मेंदूच्या विशिष्ट भागातील न्यूरल प्रोसेसिंगचे मूल्यांकन करण्यासाठी ही मानकं वापरली जातात. 75 किलो वजनाची व्यक्ती अर्धी बिअर प्यायल्यानंतरदेखील तिच्या हाताचा आणि डोळ्यांचा समन्वय बिघडतो. यामुळे ड्रायव्हिंग करणं, पायलटिंग आणि जड वस्तूंवर काम करण्याच्या तुमच्या क्षमेतवर प्रभाव पडत असल्याचं संशोधनात दिसलं. यापूर्वी करण्यात आलेल्या संशोधनात blood alcohol concentrations(BACs) वर अल्कोहोलचा प्रभाव पडत असल्यानं ड्रायव्हिंग करणं सोपं जात होतं. पण नवीन संशोधनानुसार हातावर आणि डोळ्यांवर देखील याचा परिणाम होत असल्यानं ड्रायव्हिंग करण्यास अडचणी येऊ शकतात.

हे वाचा - छकुल्याला वाचवण्यासाठी बाबाची धडपड! 15 हजार पगार, पण 3 वर्षांत जमवले 1 कोटी रु.

या संशोधनाविषयी माहिती देताना द जर्नल ऑफ फिजियोलॉजी" या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या पेपरच्या लेखिका टेरेंस टायसन यांनी म्हटलं, "एक ग्लास अल्कोहोल घेतल्यानंतर लोकांना ते स्थिर आहेत असं वाटतं,पण तसं नसून नक्कीच त्यांच्यावर त्याचा परिणाम झालेला असतो. आपल्याला आपण शुद्धीत असल्याचं आणि आपल्यावर ताबा असल्याचं वाटतं. मात्र याचा नक्कीच प्रभाव होत असल्याचं देखील टायसन यांनी म्हटलं.

दरम्यान, या संशोधनात ही नवीन गोष्ट समोर आल्यानंतर आता डोळ्यांच्या परिस्तिथीचा विकृतीजन्य रोग यांसारख्या न्यूरॉलॉजिकल आजारांवर कसा परिणाम होतो याचाही संशोधक अभ्यास करणार आहेत.

Published by: Priya Lad
First published: December 27, 2020, 9:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading