मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

एक कप कॉफी करू शकते कोरोनाची जोखीम कमी; संशोधनाचे निष्कर्ष

एक कप कॉफी करू शकते कोरोनाची जोखीम कमी; संशोधनाचे निष्कर्ष

केस सफेद होणं सुरू झालं असेल तर, चहा,कॉफी,कोल्ड्रींक कमी प्रमाणात घ्या. त्याऐवजी,आपल्या आहारात अधिक अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट्स घेणं आवश्यक आहे. याशिवाय फॉलिक अ‍ॅसिडयुक्त पदार्थ खा. ग्रीन टी प्यायला सुरूवात करा.

केस सफेद होणं सुरू झालं असेल तर, चहा,कॉफी,कोल्ड्रींक कमी प्रमाणात घ्या. त्याऐवजी,आपल्या आहारात अधिक अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट्स घेणं आवश्यक आहे. याशिवाय फॉलिक अ‍ॅसिडयुक्त पदार्थ खा. ग्रीन टी प्यायला सुरूवात करा.

रोज एक कप कॉफी घेतल्यास कोरोनाचा धोका काही अंशी कमी होऊ शकतो, अशी बाब नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून स्पष्ट झाली आहे.

नवी दिल्ली. 14 जुलै : कोरोनाचा (Corona) संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधक नियमांचं पालन, लसीकरण आणि पौष्टिक आहारासारखे उपाय अत्यावश्यक आहेत. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी काय खावं, काय खाऊ नये अशी चर्चा सध्या जिकडे-तिकडे ऐकायला-वाचायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने कॉफीप्रेमींसाठी (Coffee Lovers) ही बातमी महत्त्वाची आहे. रोज एक कप कॉफी घेतल्यास कोरोनाचा धोका काही अंशी कमी होऊ शकतो, अशी बाब नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून स्पष्ट झाली आहे. तसंच हिरव्या पालेभाज्यांचं (Green Vegetables) अधिक सेवन केल्यास आणि प्रक्रियायुक्त मांसाचं (Processed Meat) कमी प्रमाणात सेवन केल्यास कोरोनाचा धोका काही अंशी टाळता येऊ शकतो, असंदेखील या संशोधनातून स्पष्ट झालं असल्याचं एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

अमेरिकेतल्या नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये कॉफी आणि कोरोनाच्या संबंधांबाबत संशोधन करण्यात आलं. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, अजिबात कॉफी न घेणाऱ्यांच्या तुलनेत एक किंवा त्यापेक्षा अधिक कप कॉफी पिणाऱ्यांना कोरोनाचा धोका 10 टक्के कमी असू शकतो. न्यूट्रिएंट्स नावाच्या नियतकालिकामध्ये या संशोधनाचा निष्कर्ष प्रकाशित झाला आहे. यूके बायोबॅंकमधल्या 40 हजार ब्रिटिश प्रौढांच्या नोंदींचं मूल्यांकन केल्यावर हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.

दिसायचं असेल चिरतरुण तर, लवकर सोडा ‘या’ सवयी

या संशोधनात वैज्ञानिकांनी रोजच्या आहारातली कॉफी, तेलकट मासे, प्रक्रियायुक्त मांस, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं, लाल मांस यांचं सेवन आणि कोविड -19 यांच्यात काही संबंध आहे का याचा अभ्यास केला. पौष्टिक घटक रोगप्रतिकारक यंत्रणेच्या विविध पैलूंवर परिणाम करू शकतात, या संकल्पनेला आमच्या संशोधनाचे निष्कर्ष पुष्टी देतात, असं वैज्ञानिकांनी सांगितलं. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सध्याच्या उपायांमध्ये भाज्यांचं सेवन वाढवणं आणि प्रक्रियायुक्त मांसाचे सेवन कमी करणे यांसारख्या काही आहारप्रक्रियांचं पालन करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं; मात्र यासाठी अधिक अभ्यासाची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

हिरव्या पालेभाज्यांचे अधिक सेवन आणि प्रक्रियायुक्त मांसाचे कमी सेवन केल्यास कोविड-19 ची जोखीम कमी होऊ शकते. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि सूजविरोधी (Swelling) गुणधर्म असतात. त्यामुळे कॉफीचं सेवन सुजेसंबंधी बायोमार्कर्सवर (Biomarkers) सकारात्मक परिणाम करणारं ठरतं. तसेच कॉफी पिण्याचा संबंध हा ज्येष्ठ नागरिकांमध्ये न्यूमोनियाची (Pneumonia) जोखीम कमी करण्याशीदेखील जोडला जातो, असं वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Coffee, Coronavirus