दीड वर्षाच्या मुलानं गिळला मोत्यांचा हार; तब्बल 65 मोती पोटात पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का

दीड वर्षाच्या मुलानं गिळला मोत्यांचा हार; तब्बल 65 मोती पोटात पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का

त्यात या मण्यांमध्ये चुंबकीय गुण होते. सर्जरीच्या आयुधांनाच खेचून घेत होते. त्यामुळे एकेक मोती काढायला लागणार होता.

  • Share this:

लखनऊ, 18 डिसेंबर: सध्याच्या युगात विज्ञानानं (Science) खूप मोठी प्रगती केली आहे. पण काही वेळा अशी प्रकरणं तुमच्या समोर येतात, तेव्हा त्या अडचणींना सामोरं कसं जायचं हे वैद्यकीय तज्ज्ञांनाही (medical expert) कळत नाही. असंच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) डॉक्टरांसमोर आलं आहे.  येथील दीड वर्षाच्या एका मुलानं तब्बल 65 मोत्याचे मणी असलेला हार गिळला आहे. त्यामुळं हा हार बाळाच्या पोटातून बाहेर कसा काढायचा? हा प्रमुख प्रश्न कुटुंबियांसमोर होता. त्यानंतर या कुटुंबियांनी लखनऊमधील गोमतीनगर येथील ACADIS रुग्णालयात धाव घेतली. येथील डॉक्टरांच्या पथकाने 5 तासांच्या प्रदीर्घ प्रयत्नातून हे ऑपरेशन केलं.

एक एक मोती बाहेर काढणं खूप गुंतागुंतीचं होतं

लखनऊमधील दीड वर्षाच्या मुलानं 65 मणी असलेला मोत्याचा हार गिळंकृत केला होता. त्यामुळं कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली ते प्रचंड अस्वस्थ झाले. काय करावं काही सुचतं नव्हतं. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता, डॉक्टरांनासुद्धा सुरूवातीला धक्का बसला. या गुंतागुंतीचं ऑपरेशन करणाऱ्या बालरोग तज्ज्ञ डॉ. सायमा खान म्हणाल्या की हा मुलगा जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा तो सतत रडत आणि उलट्या करीत होता. जेव्हा आम्ही त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्या पोटात मोत्याचा हार असल्याचं लक्षात आलं. तसेच या मण्यांमध्ये चुंबकीय गुण होते. त्यामुळं हे ऑपरेशन खूपच गुंतागुंतीचं बनलं होत, पण शेवटी आम्ही आणि आमच्या टीमनं हे करून दाखवलं.

ऑपरेशन करण्याची उपकरणं एकमेकांना चिटकत होती

ऑपरेशन टीमचे सर्जन डॉ. सुनील कनौजिया याबद्दल म्हणाले की, जेव्हा आम्ही मुलाच्या पोटाला ऑपरेशन करण्यासाठी एक चीर केली तेव्हा ऑपरेशनची उपकरणं आतल्या बाजूला ओढली जाऊ लागली. आम्हाला असं वाटलं, की आतमध्ये चुंबकासारखं काहीतरी आहे. ज्यामुळं आमची उपकरणं सतत चिकटून राहत होती. मग आम्ही लोखंडाच्या साधनांनी मणी शोधणं सुरू केलं. लहान आतड्यात आणि पोटाच्या मागील बाजूस एक छिद्र पडलं होतं. त्यानंतर 5 तास अथक प्रयत्न केल्यानंतर चुंबकीय गुणधर्म असलेले सर्व मणी काढण्यात आम्हाला यश आलं.

Published by: News18 Desk
First published: December 18, 2020, 10:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या