मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Dandruff and Hair fall: थंडीच्या दिवसात या चुकांमुळे केसात होतो भयंकर कोंडा, केस गळती वाढते

Dandruff and Hair fall: थंडीच्या दिवसात या चुकांमुळे केसात होतो भयंकर कोंडा, केस गळती वाढते

हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी पडते, त्यामुळे डोक्याच्या वरची त्वचा, ज्याला स्कॅल्प म्हणतात, तीही गळू लागते. या मृत त्वचेच्या पेशींना डोक्यातील कोंडा म्हणतात, जो डोक्याच्या वरच्या त्वचेवर असतो.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 डिसेंबर : थंडीच्या मोसमात केसांच्या गरजा आणि समस्या बदलतात, त्यामुळे केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. केसांची निगा राखण्यात चूक केल्याने कोंड्याची समस्या वाढून केस कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे केस गळण्याचे (Dandruff and Hair Fall in Winters) प्रमाण खूप वाढू शकते. हिवाळ्यात केसामध्ये कोंडा होण्याची समस्या अधिकच वाढते, कोंडा वाढल्याने परिणामी केस गळती वाढते.

'झी न्यूज'ने दिलेल्या बातमीनुसार, हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी पडते, त्यामुळे डोक्याच्या वरची त्वचा, ज्याला स्कॅल्प म्हणतात, तीही गळू लागते. या मृत त्वचेच्या पेशींना डोक्यातील कोंडा म्हणतात, जो डोक्याच्या वरच्या त्वचेवर असतो. या काळात केसांची काळजी घेताना खालील चुका केल्यास नुकसान वाढू शकते.

केसांना सतत तेल लावणे -

केसांसाठी तेल खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो. परंतु, हिवाळ्यात जास्त वेळा केसांना तेल लावल्याने त्वचेवर कोंडा वाढतो आणि त्यासोबत धूळ, घाण चिकटली जाते. त्यामुळे डोक्याच्या त्वचेला पुरेशी हवा मिळत नसल्याने केसांचे आरोग्य बिघडते. त्यामुळे हिवाळ्यात आंघोळीच्या 1 किंवा 2 तास आधी तेल लावा आणि नंतर शॅम्पू करा. रात्रभर तेल लावून झोपणेही योग्य नाही.

हे वाचा - Healthy Breakfast: सकाळी नाश्त्यामध्ये या गोष्टी खाणं आहे फायदेशीर; अनेक आजार राहतील दूर

जास्त शॅम्पू लावणे

कोंडा आणि केसांमधील घाण साफ करण्यासाठी शॅम्पू लावला पाहिजे. पण, दररोज जास्त प्रमाणात शॅम्पू वापरणे चुकीचे आहे. केस किती दिवसांत धुवावेत (शॅम्पूने), हे तुमच्या केसांच्या आरोग्यावर आणि प्रकारावर अवलंबून असते. जास्त शॅम्पू केल्याने स्कॅल्प कोरडी होते आणि त्यामुळे कोंड़्याची समस्या खूप वाढते. त्यामुळे डोक्यावर आणि कमकुवत केसांमध्ये खाज येण्याची समस्या देखील सुरू होते. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात केस गळती सुरू होते.

हे वाचा - Winter Health: थंडीच्या दिवसात अशक्तपणा जाणवतोय? या 5 फळांचा आहारात करा समावेश

ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवा

बहुतेक लोक आपले डोके धुण्यासाठी कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करतात. त्यामुळे केसांची मुळे थोडीशी ढिली होतात आणि केस तुटण्याचा धोका जास्त असतो. अशा स्थितीत कंघी केल्याने केस गळतात आणि केस कमकुवत होतात. हिवाळ्यात केस सुकायला बराच वेळ लागत असल्याने केसांची काळजी घेण्याशी संबंधित ही चूक लोक अनेकदा करतात. त्याचबरोबर हेअर ड्रायरचा अतिरेक वापर करणेही केसांसाठी हानिकारक ठरू शकते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Winter, Winter session, Woman hair