मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /OmniFiber: शरिराच्या हिशोबाने फूलतं हे कापड, Body मधला ऑक्सिजनही वाढवतं!

OmniFiber: शरिराच्या हिशोबाने फूलतं हे कापड, Body मधला ऑक्सिजनही वाढवतं!

लोकांना अधिकाधिक आरामदायक वाटेल असं कापड (Cotton) तयार करण्याबाबत अनेक वर्षं संशोधन सुरू असून, शरीराच्या आकारानुसार ऑक्सिजन (Oxygen) पुरवणारं कापड तयार करण्यात नुकतंच संशोधकांना यश आलं आहे.

लोकांना अधिकाधिक आरामदायक वाटेल असं कापड (Cotton) तयार करण्याबाबत अनेक वर्षं संशोधन सुरू असून, शरीराच्या आकारानुसार ऑक्सिजन (Oxygen) पुरवणारं कापड तयार करण्यात नुकतंच संशोधकांना यश आलं आहे.

लोकांना अधिकाधिक आरामदायक वाटेल असं कापड (Cotton) तयार करण्याबाबत अनेक वर्षं संशोधन सुरू असून, शरीराच्या आकारानुसार ऑक्सिजन (Oxygen) पुरवणारं कापड तयार करण्यात नुकतंच संशोधकांना यश आलं आहे.

    मुंबई, 17 नोव्हेंबर : आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे (Cloth) घालतो. कोणी कॉटनचे (Cotton) म्हणजे सुती, तर कोणी अन्य वेगळ्या प्रकारच्या धाग्यापासून बनलेले कपडे घालतात. आपल्याला जे कपडे घालणं आरामदायक (Comfortable) वाटतं, ते कपडे घालण्याला आपण पसंती देतो. लोकांना अधिकाधिक आरामदायक वाटेल असं कापड तयार करण्याबाबत अनेक वर्षं संशोधन सुरू असून, शरीराच्या आकारानुसार ऑक्सिजन (Oxygen) पुरवणारं कापड तयार करण्यात नुकतंच संशोधकांना यश आलं आहे. शारीरिक श्रम करणाऱ्यांना या कपड्याचा अधिक फायदा होईल. कारण हे कापड शरीराच्या आकारानुसार आकुंचित होऊ शकतं किंवा विस्तारू शकतं. कापड जितकं पसरतं त्यानुसार शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो.

    मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Massachusetts Institute of Technology- MIT) या संस्थेतल्या संशोधकांनी या कपड्यासाठी आवश्यक असणारं सूत अर्थात फायबर (Fibre) तयार केलं असून, नंतर स्वीडनमध्ये त्याचं फॅब्रिक अर्थात कापडामध्ये (Fabric) रूपांतर करण्यात आलं आहे. संशोधकांच्या मते या कापडामुळे गायक, खेळाडू किंवा कोणत्याही आजारानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर लोकांना श्वसनाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. त्यांच्या श्वास घेण्याच्या क्षमतेत सुधारणा होईल.

    या फायबरला ओम्निफायबर (OmniFibre) असं नाव देण्यात आलं आहे. हे अनेक स्तरांचं (Layers) फायबर असून, याच्या मध्यभागी एक द्रव पदार्थ (Liquid) आहे. या द्रव प्रणालीमुळे या कापडाला विशेष गुणधर्म प्राप्त होतात. या फायबरपासून बनवलेले कपडे कोणी घातले, की लगेच ही यंत्रणा कामाला लागते. या फायबरमध्ये सेन्सर (Sensor) आहेत. ते कापड किती पसरलं आहे किंवा दबलं आहे हे ओळखतात. त्यानुसार, त्यातली यंत्रणा ताबडतोब बाहेरची हवा खेचण्यास सुरुवात करते आणि त्वचेपर्यंत पोहोचवते.

    हा फायबर बनवणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमचे सदस्य ओझगुन किलिक असफर यांनी सांगितलं, की हा नवीन फायबर अतिशय पातळ आहे. कोणत्याही प्रकारच्या कापडासाठी याचा वापर करता येतो. मानवी त्वचेचा विचार करून हे तयार करण्यात आलं आहे. यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. त्याचा बाह्य स्तर सामान्य पॉलिस्टरसारख्या सामग्रीचा बनलेला आहे. रोबोटिक आर्टिफिशियल मसल फायबरपेक्षा (Robotic Artificial Muscle Fiber) हे उत्तम आहे.

    साधारणत: कृत्रिम फायबर उष्णतेनुसार कार्य करतात. यामुळे, मानवी त्वचा (Skin) भाजण्याची शक्यता असते किंवा त्यांची ऊर्जा क्षमता कमी असते किंवा हे कपडे परिधान करण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ओझगुन यांच्या टीमने सुरुवातीला या फायबरच्या मदतीने अंडरगारमेंट (Undregarment) बनवलं आणि काही गायकांना गाणं सादर करताना ते वापरण्यास दिलं.

    याचा गायकांना खूप फायदा झाल्याचं दिसून आले. त्यांच्या शरीराची श्वास घेण्याची क्षमता आणि ऑक्सिजनची पातळी योग्य राहिली होती आणि ते अगदी आरामदायकपणे गाऊ शकत होते. गाताना अगदी उंच तान घेताना त्यांना श्वास घ्यायला खूप मदत झाली. ओझगुन आणि त्यांच्या टीमने हा प्रयोग प्रसिद्ध ऑपेरा सिंगर केल्सी कॉटन (Singer Kelsy Cotton) यांच्यासोबत केला. यानंतर खेळाडूंनाही कपडे देण्यात आले. त्यांनाही श्वास घेण्यास खूप मदत झाली. श्वासोच्छवासाला कोणत्याही प्रकारे मदत झाली, तर लोकांना त्याचा खूप फायदा होईल. याद्वारे रुग्णांना वाचवता येऊ शकतं. गायकांची कामगिरी सुधारू शकते. खेळाडू अधिक गतिमान पद्धतीनं खेळू शकतात. स्कीअर, वेटलिफ्टर्स, ज्यांना श्वास घेण्याची सर्वांत जास्त गरज असते, त्यांना या कापडाचा खूप फायदा होईल, असा विश्वास ओझगुन यांच्या टीममधल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

    First published: