मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अमेरिकेत कोरोना कहर, व्हेंटिलेटरही कमी पडू लागले; स्वित्झर्लंडमध्ये पुन्हा एकदा Lockdown ची स्थिती

अमेरिकेत कोरोना कहर, व्हेंटिलेटरही कमी पडू लागले; स्वित्झर्लंडमध्ये पुन्हा एकदा Lockdown ची स्थिती

Coronavirus in US: गेल्या 24 तासांत मिशिगनमध्ये कोरोनाचे 11,783 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 235 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, इंडियानामध्ये गेल्या दोन आठवड्यात 49 टक्के अधिक प्रकरणे आढळून आली आहेत.

Coronavirus in US: गेल्या 24 तासांत मिशिगनमध्ये कोरोनाचे 11,783 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 235 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, इंडियानामध्ये गेल्या दोन आठवड्यात 49 टक्के अधिक प्रकरणे आढळून आली आहेत.

Coronavirus in US: गेल्या 24 तासांत मिशिगनमध्ये कोरोनाचे 11,783 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 235 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, इंडियानामध्ये गेल्या दोन आठवड्यात 49 टक्के अधिक प्रकरणे आढळून आली आहेत.

  • Published by:  News18 Desk

वॉशिंग्टन, 12 डिसेंबर : अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोना विषाणूचा (Corona Virus) नवीन प्रकार 'ओमिक्रॉन व्हेरिएंट' (Omicron Variant)मुळे परिस्थिती बिघडत असल्याचे नवीन अहवालात सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील मिशिगन राज्यात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असून रुग्णालयांवर याचा ताण वाढला आहे, त्यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटरची तीव्र कमतरता आहे. गेल्या 24 तासांत मिशिगनमध्ये कोरोनाचे 11,783 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 235 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, इंडियानामध्ये गेल्या दोन आठवड्यात 49 टक्के अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. रुग्णालयांमध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी राष्ट्रीय रक्षकांना पाचारण करण्यात  (Coronavirus In America And Europe) आलं आहे.

अमेरिकेत आतापर्यंत ओमिक्रॉन प्रकाराची 43 प्रकरणे आढळून आली आहेत. वाढत्या थंडीमुळे रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ते म्हणतात की, ख्रिसमसमुळे बाजारपेठांमध्ये खूप गर्दी आहे, त्यामुळे संक्रमण वेगाने पसरत आहे. दुसरीकडे स्वित्झर्लंडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटनमध्येही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जर्मनीतील डॉक्टरांनी देशातील नागरिकांना अँटी-कोविड लसीचा चौथा डोस द्यावा, असे म्हटले आहे. जर्मनीमध्ये आतापर्यंत 11 लाख लोकांना अँटी-कोविड लसीचा तिसरा डोस देण्यात आला आहे.

ओमिक्रॉन यूकेमध्ये कहर करण्याची शक्यता

ब्रिटनमधील एका नवीन वैज्ञानिक विश्लेषणात असा इशारा देण्यात आला आहे की, गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घातली गेली नाही तर पुढील वर्षी जानेवारीपासूनच देशाला कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारांपासून होणाऱ्या संसर्गाच्या मोठ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (एलएसएचटीएम) च्या विश्लेषणात असे म्हटले आहे की, इंग्लंडमध्ये सध्या ज्या वेगाने संक्रमण वाढत आहे, त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ होईल.

हे वाचा - Rice water : कोणत्या औषधापेक्षा कमी नाही भाताचं पाणी; ‘या’ समस्यांवर रामबाण उपाय

ब्रिटनमध्ये 'ओमिक्रॉन'शी संबंधित 448 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यासह, देशात कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारांशी संबंधित एकूण प्रकरणांची संख्या 1,265 वर पोहोचली आहे. विश्लेषणाशी संबंधित शास्त्रज्ञांनी सांगितले की, देशातील परिस्थिती पाहता असे दिसते की, जर लोकांच्या गर्दीवर बंदी घातली गेली नाही, तर पुढील वर्षी जानेवारीपासून ब्रिटनला ओमिक्रॉनच्या मोठ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो.

हे वाचा - Shocking! युवकाने एकाच दिवसात घेतले कोरोना लसीचे 10 डोस; वाचा पुढे काय झालं

'ओमिक्रॉन' चे रुग्ण 'डेल्टा' प्रकारापेक्षाही वेगाने वाढू शकतात. यूएससह युरोपमधील देशांमध्ये सध्या डेल्टा प्रकाराशी संबंधित प्रकरणांची संख्या जास्त आहे, परंतु ओमिक्रॉनची प्रकरणे वेगाने वाढत आहेत त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus