काचेसारखी पारदर्शक आहे भारतातली ही नदी !

काचेसारखी पारदर्शक आहे भारतातली ही नदी !

या नदीतून प्रवास करताना जाणवतं की, जसं आपण एखाद्या काचेच्या पारदर्शी तुकड्यावर तरंगत आहोत

  • Share this:

आपल्या देशात एक अशीही नदी आहे जी आपल्या अपेक्षेपेक्षाही अधिक स्वच्छ आहे. ही नदी इतकी स्वच्छ आहे की पाण्याखालचा दगड अगदी लखलखीत चमकतो. त्यात कचऱ्याचा एकही कण आपल्याला सापडणार नाही. ही देशातली सगळ्यात स्वच्छ नदी म्हणून ओळखली जाते. या नदीच नाव आहे उम्नघाट नदी. मेघालयची राजधानी शिलांगच्या 95 किलोमीटर लांब डावकी या शहराच्यालगत ही नदी वाहते. डावकी शहर हे बांगलादेशाच्या सीमेवर वसलेलं आहे.

अनेकांना तर विश्वासच होत नाही की, आपल्या देशात अशी स्वच्छ आणि सुंदर नदी असू शकते. या नदीतून प्रवास करताना जाणवतं की, जसं आपण एखाद्या काचेच्या पारदर्शी तुकड्यावर तरंगत आहोत. या नदीप्रवाहातील खडकं, वाळू, पाण्याखालील जीवसृष्टी, इत्यादी घटक आपल्या स्पष्टपणे पाहता येतात.

जे-जे लोक या नदीला भेट देऊन येतात, त्यांना असचं वाटत कीं ते कोणत्या वेगळ्याच जगात फिरुन आले आहेत. या नदीचं सुंदर रुप, खळखळ वाहणारं पाणी आणि त्या नदीतला खरेपणा अगदी मनाला स्पर्श करतो. काहींनी तर या नदीला स्वर्गाची उपमा दिली आहे. या नदीच्या आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर आहे. त्यामुळे इथे जाणाऱ्या प्रत्येकाला असच वाटत की आयुष्यात एकदातरी उम्नघाट नदीला भेट द्यावी.

बांगलादेश आणि भारताच्या मधून ही नदी वाहते. या नदी खाली गोल गोल दगडांची सुंदर नक्षी आपल्याला पहायला मिळते. ही नदी पुर्वीपासूनच इतकी स्वच्छ आहे. ब्रिटिशांनी या नदीवर एक पूलही बनवला आहे. या नदीत मोठ्या संख्येनं मासेही आहेत.

हिवाळ्यात तर ही नदी आणखी सुंदर आणि स्वच्छ पहायला मिळते. इथं येणाऱ्या प्रत्येकाला सक्ती आहे की, कोणीही नदीत आणि आजूबाजूला कचरा करणार नाही. स्थानिक रहिवासीही या नियमाचं काटेकोरपणे पालन करतात.

खरं तर मेघालयात अनेक पर्यटन स्थळ स्वच्छ आहेत. तुम्हालाही जर अशी खरी स्वच्छता जर अनुभवायची असेल तर उम्नघाट नदीला नक्की भेट द्या.

First published: October 24, 2017, 11:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading