Xiao एका सिग्नलजवळ उभ्या होत्या. त्यावेळी एका तरुणाने त्यांच्या चेहऱ्यावर मुक्का मारला. स्टिव्हन जेनकिन्स (Steven Jenkins) असं या तरुणाचं नाव. त्याने आजीला मुक्का मारताच तिच्या डोळ्यांना मोठी दुखापत झाली. पण आजी अजिबात घाबरली नाही किंवा तिने हार मानली नाही. तर तिने या हल्ल्याचं चांगलंच उत्तर दिलं आहे. तिनेसुद्धा तरुणावर हल्ला केला. तरुणाच्या हल्ल्याला तिने चांगलंच उत्तर दिलं आहे. काठीने तरुणालाल बदड बदड बदडून काढलं. तरुणाला इतकं मारलं, इतकं मारलं की त्याच्या चेहऱ्यावर रक्तसुद्धा दिसतं आहे. हे वाचा - लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर...; हर्ष गोएंका यांचा VIDEO होतोय व्हायरल हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता, आजीचा चेहरा सुजलेला आहे. तिच्या हातात आइसपॅक आहे. ती रडतानासुद्धा दिसते आहे. तिच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत आणि पोलीससुद्धा आहे. तर स्ट्रेजवर एक व्यक्ती जखमी अवस्थेत दिसते आहे. हा तोच तरुण आहे ज्याने आजीवर हल्ला केला. आजीने त्याला मारल्यानंतर त्याची अशी अवस्था झाली आहे. या तरुणाला पोलिसांनी बेड्यासुद्धा ठोकल्या आहेत. हे वाचा - OMG! आगीवर नाही तर 'थप्पड़ मारकर' शिजवलं चिकन; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO Xiao ने KPIX 5 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, ज्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांची मुलगीसुद्धा त्यांच्यासोबत होती. ती खूप घाबरली होती. हल्ल्यामुळे त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. उजव्या डोळ्यांमध्ये त्यांना खूप समस्या जाणवत आहे. उपचारासाठी त्यांनी इतरांकडून मदत मागितली आहे. लोक त्यांना मदत करत आहेत.Just came upon an attack on an elderly Asian woman on Market Street San Francisco. Effort I got more details pic.twitter.com/5o8r0eeHE2
— Dennis O'Donnell (@DennisKPIX) March 17, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Viral, Viral videos