मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

महिला जवानाने आईला दिलं असं सरप्राइझ; VIDEO पाहून तुमच्या डोळ्यातही पाणी येईल

महिला जवानाने आईला दिलं असं सरप्राइझ; VIDEO पाहून तुमच्या डोळ्यातही पाणी येईल

असं सरप्राइझ प्रत्येक जवानाच्या कुटुंबाला हवं असतं.

असं सरप्राइझ प्रत्येक जवानाच्या कुटुंबाला हवं असतं.

असं सरप्राइझ प्रत्येक जवानाच्या कुटुंबाला हवं असतं.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 08 सप्टेंबर : सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी सुट्टी म्हणजे मृगजळच. सैनिकांना आपल्या कुटुंबापासून लांब राहून सीमेवर आपलं कर्तव्य पार पाडावं लागतं. यामुळे अनेक महिने तर काहीवेळा वर्ष देखील त्यांना आपल्या कुटुंबीयांची भेट घेता येत नाही. त्यांचं कुटुंब त्यांची वाट पाहत असतं. मात्र आपल्या कर्तव्यामुळे त्यांना लवकर सुट्टी मिळत नाही. मात्र काही सैनिक अशाचप्रकारे सुट्टी मिळाल्यानंतर अचानक घरी जाऊन आपल्या कुटुंबियांना सरप्राईझ देत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारे एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

एक महिला जवान सुट्टी मिळाल्यानंतर अचानक घरी जाऊन आपल्या आईला सरप्राईज देते आणि ती घरी परतल्यानंतर तिच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे.

View this post on Instagram

What an amazing surprise! ❤️

A post shared by People Magazine (@people) on

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ही महिला जवान घरी आल्यानंतर आपल्या आईला सरप्राईज देण्यासाठी सुरुवातीला घराच्या बाहेरून फोन करते. मी तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर केल्याचं सांगितलं. त्यानंतर आई हे पाहण्यासाठी घराबाहेर येते आणि आपल्या मुलीला सैन्याच्या गणवेशात उभी असलेली पाहते. अनेक दिवसांनंतर मुलीला भेटल्याने तिला खूप आनंद होता. त्यामुळे ती आपल्या मुलीला घट्ट मिठी मारते आणि मोठ्याने ओरडत आपला आनंद व्यक्त करते.

हे वाचा - बापरे! भारतातील 'या' मंदिरांत प्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो गांजा

इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या माहितीनुसार, या महिला जवानाचं नाव रायली ग्रेगसन आहे. अमेरिकेतील ओहिओ मधील हा व्हिडीओ असून इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ आतापर्यंत चार लाख लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे वाचा - माशीला मारायला गेला अन् घरात झाला स्फोट, तुम्हीही ही चूक करत असाल तर सावधान!

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा एका चिनी सैनिकाचा देखील व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये देखील त्याने आपल्या आईला न सांगता घरी येत सरप्राईज दिलं होतं. यामध्ये देखील त्याच्या आईने उड्या मारत आणि डान्स करत आपला आनंद व्यक्त केला होता.

First published:

Tags: Viral videos