मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अरे बापरे! दोन दशकांपूर्वी पृथ्वीवरील सर्व माणसं होती एकत्र; काय आहे हा प्रकार?

अरे बापरे! दोन दशकांपूर्वी पृथ्वीवरील सर्व माणसं होती एकत्र; काय आहे हा प्रकार?

वाचा सविस्तर..

वाचा सविस्तर..

वाचा सविस्तर..

    मुंबई, 8 ऑक्टोबर : जवळपास 2 नोव्हेंबर 2000 पासून पृथ्वीवरील किमान दोन लोक नेहमीच आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेवर काम करत आहेत. याचाच अर्थ मागील 20 वर्षांत असा एकही दिवस आला नाही जेव्हा पृथ्वीवर एकाच वेळी सर्व मानव उपस्थित होते. त्यामुळे जरी जगाची लोकसंख्या 7.6 अब्ज आहे असं आपण सांगत असलो तरीही त्यात दोन माणसं पृथ्वीवर नव्हतीच. त्यामुळे जगाच्या जनगणनेत सर्व माणसं पृथ्वीवर उपस्थित असण्याचा काळ म्हणजे 31 ऑक्टोबर 2000 पूर्वीचा. कारण गेली 20 वर्षं दोन अंतराळवीर रशियाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात आहेत. काही जण परततात त्यांच्याऐवजी दुसरे शास्रज्ञ अंतराळस्थानकात जाऊन अभ्यास करतात. 31 ऑक्टोबर 2000 ला तीन अंतराळवीरांनी रशियन सोयुझ अंतराळ यानासोबत कझाकस्तानामधील बायकॉनूर कॉसमोड्रोम मधून उड्डाण केले  होते. दोन दिवसांनी 2 नोव्हेंबरला हे अंतराळयान पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 400 किलोमीटरवर असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) लँड झालं. तेव्हापासून आजपर्यंत या आंतराळस्थानकात शास्रज्ञ राहतात. म्हणूनच गेल्या 2 दशकांत असा एकही क्षण आलेला नाही जेव्हा पृथ्वीवर सर्व मानव एकत्र होते. यावरूनच मानवाचे अंतराळ संशोधनात केलेली प्रगती दिसून येते. आयएसएस (ISS) चा 20 वा वर्धापन दिन जवळ येत असताना ISS हे केवळ रशिया किंवा अमेरिकी शास्रज्ञांची प्रयोगशाळा राहिलेली नाही तर या अंतराळ स्थानकाचा विस्तार झाला असून तिथं नवनव्या प्रयोगांचं साहित्यही पोहोचलं आहे. 31 मे रोजी SpaceX चा Dragon  क्रू ISS हार्मनी तळावर  पोहोचला आहे. स्पेसएक्स ही खासगी व्यावसायिक आंतरायान सोडणारी कंपनी आहे.  या अतंराळातील निवासातून संशोधन करण्याबरोबरच दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने  माणसावर होणारे  परिणाम समजून घेता येणार आहेत. हे ही वाचा-पासवर्ड हॅक झाला तर Google Chrome सांगणार, मोबाइल ब्राउझरमध्ये नवं फीचर नासाचे क्रिस्टिन कोन आणि स्कॉट केली  हे अंतराळवीर जवळजवळ एक वर्ष ISS मध्ये राहून आले आहेत. त्यांनी एकत्र येऊन कितीतरी महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प राबवले.पार्किन्सच्या आजारावर उपचार शोधणं, वातावरणाचा त्वचेवर आणि अवयवांवर होणारा परिणाम समजून घेणं,सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या परिसरात बियांचं फलन कसं होतं या प्रक्रियेचा अभ्यास अशी महत्त्वाची संशोधन केलं आहे. अंतराळ संशोधनाच्या कामात उत्तम कामगिरी बजावत असलेले व्यक्ती संशोधनाच्या महत्वाच्या टप्प्यावर  आहेत. याचं मुख्य उद्दिष्ट  दुसऱ्या ग्रहावर माणसाला वसती करता येईल का याचा शोध घेणं हाच आहे.  
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Nasa

    पुढील बातम्या