बाप्पाला फलाफल आणि हमसचा नैवेद्य; इस्रायलमध्ये अनोख्या पद्धतीने गणेशाची पूजा

बाप्पाला फलाफल आणि हमसचा नैवेद्य; इस्रायलमध्ये अनोख्या पद्धतीने गणेशाची पूजा

फलाफल आणि हमस हा इस्रायल देशाचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे, त्यामुळे येथील बाप्पालाही याचा नैवेद्य दाखविण्यात आला.

  • Share this:

इस्रायल, 1 सप्टेंबर : आज देशभरातचं नाही तर जगभरात अनंत चतुर्थी साजरी केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घरात विराजमाने झालेल्या गणपती बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे. यंदा कोरोनाचं सावट असल्याने सर्वत्र अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

गणेशोत्सवाच्यानिमित्ताने बाप्पाचे आवडते खाद्य म्हणून प्रत्येक घरात मोदकाचं नैवेद्य केला जातो. भारतात या दिवसांत गोडाचा स्वयंपाक केला जातो. मात्र इस्रायलमध्ये गणेशोत्सव कसा साजरा केला जात असले? सोशल मीडियावर सध्या काही फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये इज्रायलचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ फलाफल आणि हमसचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखविण्यात आला आहे. काबुली चण्यांपासून फलाफल तयार केला जातो. त्याशिवाय काबुली चण्याची पेस्ट आणि विविध सॉसच्या साहाय्याने हमस तयार केला जातो. इज्राईलमध्ये कार्यक्रम असल्यास आवडीने हा पदार्थ तयार केला जातो.

इस्रायलमध्ये भारतीय डिप्लोमॅट्सनी दोन परंपरा एकत्र आणत नवा आदर्श समोर ठेवला आहे. इस्रायल आणि भारतातील मैत्रित्वाचं नातं अधिक घट्ट होत असताना या फोटोंकडे अत्यंत सकारात्मकतेने पाहिले जात आहे. प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केलं होतं. इस्रायल आणि भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी प्रणव मुखर्जी यांनी मदत केल्याचेही ते यावेळी म्हणाले. याशिवाय 2017 मध्ये नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा केला होता. इस्रायलचा दौरा करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान असल्याचे सांगितले जाते.

Published by: Meenal Gangurde
First published: September 1, 2020, 7:38 PM IST

ताज्या बातम्या