Home /News /lifestyle /

जगभरातील 11 विचित्र पेय : नावं ऐकूनच तुम्ही व्हाल चकित

जगभरातील 11 विचित्र पेय : नावं ऐकूनच तुम्ही व्हाल चकित

कुठल्या पदार्थाचा वापर कुठल्या संस्कृतीत खायला करतील याचा नेम नाही आणि कशात काय मिसळून पितील याचाही नेम नाही. ही नुसती नावं तर ऐका.. कुठल्या देशात काय आहे फेमस

    जगभरात खाद्यसंस्कृती वेगवेगळी आहे. कुठल्या पदार्थाचा वापर कुठल्या संस्कृतीत खायला करतील याचा नेम नाही आणि कशात काय मिसळून पितील याचाही नेम नाही. जगभरात विविध प्रकारची ड्रिंक्स आहेत. हार्ड ड्रिंकबरोबरच सॉफ्ट ड्रिंक देखील विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असतात. त्याचबरोबर अनेक विचित्र आणि तुम्ही कधीही न ऐकलेली ड्रिंक्स देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला जगभरातील  11 विचित्र ड्रिंकबद्दल सांगणार आहोत. माहीत आहे क बघा याबद्दल... 1) क्यूमिस मंगोलिया, कझाकिस्तान आणि किर्गिस्तानमध्ये हे ड्रिंक लोकप्रिय आहे. घोडीच्या दुधापासून हे ड्रिंक बनवलं जातं. या देशांमध्ये दारुत हे दूध टाकतात आणि ते पेय पितात. 2) स्नेक वाइन चीनमधील हे पारंपरिक ड्रिंक आहे. राईस वाईनमध्ये एक मेलेला लहान साप टाकला जातो. चीनमध्ये हे ड्रिंक औषधी असून मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. 3) सीगल वाइन सीगलला गरम पाण्यात उन्हामध्ये ठेवलं जातं. त्यानंतर त्यापासून तयार होणाऱ्या ड्रिंकला सीगल ड्रिंक म्हणून सर्व्ह केलं जातं. 4) सोरटो कॉकटेल व्यक्तीचा संवर्धन कलेला अंगठा टाकून दिला जातो. यासाठी अनेक व्यक्ती आपला अंगठा डोनेट करतात. मात्र आता यावर बंदी आली असून, काही ठिकाणी अजूनही हे उपलब्ध आहे. 5) पिझ्झा बिअर लसूण, टोमॅटो आणि मसाल्याचा वापर करून हे ड्रिंक बनवले जाते. पिझ्झासारखी चव असलेलं हे ड्रिंक अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. 6) गौजल गोमूत्रापासून हे पेय तयार केलं जातं. भारतात अनेक ठिकाणी याचं औषध म्हणून देखील सेवन केलं जातं. 7) प्लेसेंटा 10000 नाव विचित्र असलं तरी जपानमध्ये लोकप्रिय असलेलं हे ड्रिंक आहे. ते ताज्या पिचपासून बनवलं जातं. मात्र याच्या विचित्र चवीमुळं पिताना दहा वेळा विचार करावा लागतो. 8) स्मोकर्स कफ जॉगेरमिस्टर आणि मेओनीजपासून हे ड्रिंक तयार केलं जातं. त्यामुळे तुम्ही मेओनीज पासून तयार केलेलं ड्रिंक एकदातरी ट्राय करायला हवं. 9) प्रेयरी ऑयस्टर अंड्याचा पिवळा भाग, सॉस, व्हिनेगर,  हॉट सॉस आणि मिठापासून हे ड्रिंक तयार केलं जातं. हे ड्रिंक खासकरून हँगओव्हर कमी करण्यासाठी प्यायलं जातं. 10) पिनट बटर एंड जेली सोडा पिनट बटरमध्ये सोडा टाकून हे ड्रिंक तयार केलं जातं. याची चव विचित्र असल्यामुळं जास्त प्रमाणात लोकप्रिय झालेलं नाही. 11) योगर्ट फ्लेवर्ड पेप्सी व्हॅनिला आणि लिंबापासून  हे ड्रिंक तयार केलं जातं. सफेद पेप्सी म्हणजेच जवळपास लिम्कासारखी याची चव लागते.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Food

    पुढील बातम्या