मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पत्नीच्या सवयीला वैतागून पतीने केली हत्या; अशा सवयी घातक, वेळीच सावध व्हा!

पत्नीच्या सवयीला वैतागून पतीने केली हत्या; अशा सवयी घातक, वेळीच सावध व्हा!

हल्लीच्या धावपळीच्या जगात कोणीच कोणाला वेळ देत नाही. माणसं एकेकटी असतात. अशा वेळी अनेक कारणांमुळे ती डिप्रेशनची शिकार होतात. डिप्रेशन खूप धोकादायक असतं. पुढे जाऊन मेंदूवर परिणाम करणारं ठरतं. डिप्रेशन आलंय हे पुढील काही लक्षणांवरून समजतं.

हल्लीच्या धावपळीच्या जगात कोणीच कोणाला वेळ देत नाही. माणसं एकेकटी असतात. अशा वेळी अनेक कारणांमुळे ती डिप्रेशनची शिकार होतात. डिप्रेशन खूप धोकादायक असतं. पुढे जाऊन मेंदूवर परिणाम करणारं ठरतं. डिप्रेशन आलंय हे पुढील काही लक्षणांवरून समजतं.

प्रत्येकाला काही सवयी आणि विचार असतात. मात्र या सवयी नियंत्रणात नसणे, दैनंदिन आणि सामाजिक आयुष्यावर त्याचा परिणाम होणे म्हणजेच ओबेसिव्ह कम्पलसिव्ह डिसॉर्ड (Obsessive-compulsive disorder – OCD) हा मानसिक आजार असू शकतो.

म्हैसूर, 22 फेब्रुवारी : कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्या केली, याचं कारण म्हणजे तिला असलेली अतिस्वच्छतेची सवय... आता तुम्ही म्हणाल की, ही तर चांगली सवय आहे. हो, मात्र चांगल्या सवयींनाही काही मर्यादा असतात. या महिलेला  शौचालयाला जाऊन आल्यानंतर, जनावरांना चारा घातल्यानंतर आणि कुणालाही स्पर्श केल्यानंतर अंघोळ करण्याची सवय होतीच, शिवाय घरच्यांसाठी तिनं हे बंधनकारक केलं होतं. तिच्या घरातही कुणी अंघोळ केल्याशिवाय यायचं नाही असा तिचा आग्रह होता.

आजारी पडण्याची भीती आणि अतिस्वच्छता राखणाऱ्या या महिलेची लक्षणं म्हणजे ओसीडी (OCD) या मानसिक आजाराशी मिळतीजुळती आहेत. ओसीडी म्हणजे ओबेसिव्ह कम्पलसिव्ह डिसॉर्ड (Obsessive-compulsive disorder – OCD) हा एक मानसिक आजार आहे.

हेदेखील वाचा - दिवसातून 10 वेळा अंघोळ करायची पत्नी, नोटासुद्धा धुवायची; पतीने हत्या करून केली आत्महत्या

ओसीडी म्हणजे काय?

प्रत्येकाला काही सवयी आणि विचार असतात मात्र ओसीडी असलेल्या व्यक्तींचे विचार किंवा कृती दिवसभरात कित्येक तरी वेळा होते, अनियंत्रित असते आणि  ती आवडणारी नसते. दैनंदिन, व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्यात त्याचा परिणाम होतो. घरातून बाहेर जाताना तुम्ही गॅस, लाइट बंद करता, दरवाजाला टाळं लावता आणि हे सर्व नीट झालं आहे की नाही याची एकदा तरी खात्री करून घेता. काही अघटीत घडू नये, म्हणून सावध राहून प्रत्येक जण असं करतोच. मात्र गॅस, लाइट नीट बंद केला आहे, दरवाजाला टाळंही नीट लागलं आहे, याची खात्री झाली तरीदेखील जर तुम्ही पुन्हा पुन्हा तपासत असाल आणि तुमच्या मनात त्याचा विचार येत असेल, तर याला ओसीडी असं म्हणतात.

ऑबेशन (obsessions) म्हणजे एखादा विचार पुन्हा पुन्हा करणे कम्पलशन (compulsions) म्हणजे एखादी कृती पुन्हा पुन्हा करणे.

न्यूज 18 लोकमतशी बोलताना  पुण्यातील केईएम रूग्णालयाच्या सायकॅट्री विभागाचे प्रमुख डॉ. वासुदेव परळीकर यांनी सांगितलं, "ओसीडी हा आजार खूप सामान्य आहे. ऑब्सेशन म्हणजे एखादे विचार चुकीचे आहेत हे माहिती असूनही वारंवार ते विचार मनात येणं. विचार तात्पुरते थांबले तरी पुन्हा ते विचार येतात आणि विचार सक्तीने थांबवले तरी भीती वाटते. कम्पलशन म्हणजे गरजेच नाही हे समजूनही एखादी कृती वारंवार करणं, एखादा शब्द वारंवार उच्चारणे. कृती सक्तीने थांबवण्याचा विचार केला तर भीती वाढते, मरणासारखे विचारही मनात येतात. पूर्वी हा आजार झाल्याचं लक्षात यायचं नाही. मात्र आता जनजागृतीमुळे या आजाराचे खूप रुग्ण दिसून येतात. मानसोपचारतज्ज्ञच नव्हे जनरल फिजिशियन, डेन्टिस्ट अशा इतर डॉक्टरांकडे गेल्यावरही या आजाराचं निदान होऊ शकतं"

हेदेखील वाचा - पीरियड्समध्ये तुमच्या या सवयी पडतील महागात, काही दिवसांसाठी जीवनशैली बदला

ओसीडीची प्रमुख लक्षणं किंवा प्रकार

सुरक्षा – लाईटचं बटण बंद केलं, दाराचं लॉक नीट लागलं, अलार्म लावला हे माहिती असूनही ही कृती नीट झाली की नाही याची खात्री पुन्हा पुन्हा करत राहणे.

स्वच्छता – एखादी कृती केल्यानंतर आपण अस्वच्छ झालो आहोत, असं समजून वारंवार हात धुणं, अंघोळ करणं. साफसफाई करणं. बॅक्टेरियांची, आपण आजारी पडू अशी भीती वाटणं.

सर्वकाही नीट हवं असतं – काही गोष्टी जशाच्या तसा एका विशिष्ट स्थितीत लागतात. त्यामुळे दिवसभर त्या वस्तू नीट लावत असतात.

जुन्या गोष्टी जमा करणं – काही वस्तू जुन्या झाल्यात, अनावश्यक आहे, हे माहिती असूनही त्या जमा करून ठेवणं. अशा देणं त्यांच्या जीवावर येतं.

मोजणे – सामान, कपडे, लाईट, जिने अशा कोणत्याही गोष्टी सतत मोजत राहणे.

विचार – एका विशिष्ट प्रकारचे विचार सातत्याने येतात. काही विचार हे आक्रमक असू शकता

ओसीडीवर उपचार

"पूर्वी या आजारावर उपचार करणं अवघड असल्याचं समजलं जायचं. मात्र आता सायकोथेरेपिस्ट किंवा समुपदेशकांमार्फत उपचार शक्य आहेत. सुरुवातीला रिलॅक्शेशन त्यानंतर एक्स्पोजर आणि रिस्पॉनस प्रिव्हेंशन म्हणजे विशेष विचार आल्यानंतर त्यांचा सामना करून त्याला प्रतिसाद देण्यापासून स्वत:ला थांबवणं हे या उपचाराचं मुख्य सूत्र आहे सायको आणि बिहेवरील थेरेपीनं बरं वाटलं नाही तर औषधंही दिली जातात. ओसीडी पूर्णपणे बरा होईलच असं सांगता येत नाही. मात्र उपचार शक्य आहे, उपचाराने गुणात्मक सुधारणा दिसून येते", असं डॉ. परळीकर यांनी सांगितलं.

First published:

Tags: Mental health, Mental illnesses