मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

काय म्हणावं हिला! Instagram वर नाजूक कंबर दाखवण्याची हौस; Model ने केली खरतनाक सर्जरी

काय म्हणावं हिला! Instagram वर नाजूक कंबर दाखवण्याची हौस; Model ने केली खरतनाक सर्जरी

Model slimmest waist Surgery : बार्बी डॉलसारखी कंबर हवी यासाठी मॉडेल रिस्क घेण्यातही मागे हटली नाही.

Model slimmest waist Surgery : बार्बी डॉलसारखी कंबर हवी यासाठी मॉडेल रिस्क घेण्यातही मागे हटली नाही.

Model slimmest waist Surgery : बार्बी डॉलसारखी कंबर हवी यासाठी मॉडेल रिस्क घेण्यातही मागे हटली नाही.

  • Published by:  Priya Lad

साओ पाओलो, 07 डिसेंबर : आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी लोक काय काय नाही करत. काही जण तर फक्त मेकअपच नाही तर अगदी सर्जरीही करतात. सध्या अशीच सर्जरी करणारी एक मॉडेल चांगलीच चर्चेत आली आहे. जिनं फक्त इन्स्टाग्रामवर आपली कंबर स्लीम दिसावी यासाठी खतरनाक सर्जरी केली आहे (Surgery for slimmest waist).

ब्राझिलिनअन मॉडेल लुआना सँडीनने (Luana Sandien) एक भयानक सर्जरी केली आहे (Dangerous Surgery for Tiny Waist).  लुआना ही प्रसिद्ध मॅगझिन प्लेबॉयची मॉडेल आहे (Playboy model Luana Sandien). डेली स्टारच्या रिपोर्टनुसार लुआना सांगते तिला नेहमीच बार्बी डॉलसारखी (Barbie doll waist) कंबर हवी होती आणि यासाठी ती रिस्क घेण्यातही मागे हटली नाही.

कंबरेचा आकार घटवण्यासाठी तिने कोलंबियामध्ये वेस्टलाईन सर्जरी केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने फॉलोअर्सना आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

हे वाचा - महिलांसाठी नाही पुरुषांसाठी तयार झाल्या होत्या High Heels! भन्नाट निर्मितीकथा

लुआना म्हणाली, मी कोणत्याही प्रकारचं रिब रिडक्शन केलेलं नाही तर हिप्सवरील चरबी हटवली आहे. जितक्या वेदना मी सहन केल्या आहेत त्या बालपणातील स्वप्नांपेक्षा खूप कमी आहे. मी रिकव्हर होते आहे. आपल्या सर्जरीनंतर रिझल्टमुळे मी खूप आनंदी आहे. जेव्हा फॉलोअर्स आपल्याला पाहतील तेव्हा ते शॉक होतील, असा दावाही तिने केला आहे.

लुआना याआधीसुद्धा चर्चेत आली होती. तिला स्वतःला डेट करायचं आहे आणि स्वतःसोबत खूप आनंदात आहे, असं ती म्हणाली होती. तसंच तिने फुटबॉलर लिओन मैसीच्या अश्रूंनी भिजलेल्या रुमालाची किमत करोडोमध्ये लावली होती.

सर्जरीमुळे झाला होता मॉडेलचा मृत्यू

अशा खतरनाक सर्जरी जीवघेण्याही ठरू शकतात. अमेरिकेतील मॉडेल आणि फॅशन डिझायनर जोसलीन कॅनोचा  (Joselyn Cano) अशाच सर्जरीमुळे मृत्यू झाला होता. तिला मेक्सिनकन किम कर्दाशिया (Mexican Kim Kardashian) म्हणूनही ओळखलं जात होतं.

हे वाचा - ओठ मोठे करण्यासाठी 26 वेळा केली सर्जरी; तरुणीनं सांगितलं विचित्र छंदाचं खरं कारण

मीडिया रिपोर्टनुसार, जोसलीननं बट लिफ्ट सर्जरी केली होती. सर्जरीसाठी ती कोलंबियाला गेली होती. पण काही कारणामुळे ती सर्जरीतून बरी झाली नाही आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं आहे.

First published:

Tags: Brazil, Lifestyle, Model, Surgery