मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Oats Hair Mask Benefits: केसांमधील कोंडा आणि ड्रायनेस होईल गायब; ओट्स हेयर मास्कचा असा करा वापर

Oats Hair Mask Benefits: केसांमधील कोंडा आणि ड्रायनेस होईल गायब; ओट्स हेयर मास्कचा असा करा वापर

Oats Hair Mask Benefits : केसांसाठी ओट्सचा वापर केल्यानं केसांचा कोरडेपणा आणि कोंडा दूर होतो. तसंच, केस मजबूत आणि चमकदार बनतात. इतकंच नाही तर केसांना होणारे इतर अनेक फायदेही (Oats Hair Mask Benefits) ओट्स हेअर पॅकद्वारे सहज मिळवता येतात.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली,08 नोव्हेंबर : ओट्स खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. तसंच, ओट्स वजन कमी करण्यात चांगली भूमिका बजावतात, हेही तुम्हाला माहीत असेल. पण ओट्स केसांसाठीही खूप फायदेशीर असतात हे तुम्हाला माहिती आहे का? केसांसाठी ओट्सचा वापर केल्यानं केसांचा कोरडेपणा आणि कोंडा दूर होतो. तसंच, केस मजबूत आणि चमकदार बनतात. इतकंच नाही तर केसांना होणारे इतर अनेक फायदेही (Oats Hair Mask Benefits) ओट्स हेअर पॅकद्वारे सहज मिळवता येतात.

ओट्समध्ये झिंक, सॅपोनिन्स, प्रथिने, ओमेगा-6 फॅटी अॅसिड, हेल्दी फॅट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्ससारखे घटक असतात. हे केसांना पोषण देते आणि ते निरोगी आणि चमकदार बनविण्यास मदत करते. ओट्सचे हेअर मास्क कसे तयार करायचे आणि त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो ते जाणून घेऊया.

ओट्स-खोबरेल तेल

ओट्स-कोकोनट ऑइल हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात थोडं दूध आणि दोन चमचे ओट्स मिक्स करा. ओट्स दुधात भिजल्यावर ते चांगले कुस्करा आणि गुळगुळीत पेस्ट बनवा. यानंतर त्यात एक चमचा मध आणि एक चमचा खोबरेल तेल मिसळा. हा हेअर मास्क केसांवर लावा आणि वीस मिनिटे तसाच राहू द्या आणि नंतर शॅम्पूनं केस धुवा.

हे वाचा - T20 World Cup : टीम इंडियाचं स्वप्न भंगलं, अफगाणिस्तानला हरवून न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये

ओट्स - एवोकॅडो

केस निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही ओट्स आणि एवोकॅडोचा हेअर मास्क देखील वापरू शकता. यासाठी दोन चमचे ओट्स आणि एक एवोकॅडो कुस्करून घट्ट पेस्ट बनवा. ती केसांना लावा आणि अर्ध्या तासानंतर शॅम्पूनं केस धुवून घ्या.

ओट्स-दूध

ओट्स आणि दूध यांचा हेअर मास्क केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही दोन चमचे ओट्स अर्धा कप दुधात वीस मिनिटं भिजत ठेवा. नंतर ओट्स कुस्करा आणि गुळगुळीत पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि हा मास्क केसांना लावा. पंचवीस मिनिटांनी शॅम्पूनं केस स्वच्छ धुवा.

हे वाचा - Career in Forest Department: तुम्हालाही वनविभागात नोकरी करायची आहे? मग ही महत्त्वाची माहिती नक्की वाचा

ओट्समुळं केसांना हे फायदे मिळतात

केसांमध्ये ओट्सपासून बनवलेले हेअर मास्क वापरल्यानं केसांमधील कोंडा आणि कोरडेपणा दूर होतो. यासोबतच केसांची चमक आणि ताकदही वाढते. डोक्यात खाज येण्याची समस्या असेल, तर ओट्स हेअर मास्कच्या वापरानं ती दूर होते. हे हेअर मास्क केसांची वाढ वेगानं होण्यातही खूप मदत करतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health Tips, Woman hair