मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Numerology: तुमची जन्मतारीखही देते भविष्यातील गोष्टींचे संकेत; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology: तुमची जन्मतारीखही देते भविष्यातील गोष्टींचे संकेत; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमुळे तुमचा आत्मविश्वास डळमळू देऊ नका. सकारात्मक रहा, आणि बिझनेससाठी प्रवासाचा बेत आखा. आज तुम्हाला बाकी बाबतीत आराम मिळेल, मात्र अर्थार्जन आणि वैयक्तिक नातेसंबंध यांमध्ये काही अडचणी येतील. आज यश मिळवण्यासाठी सूर्यदेव आणि भगवान शिवाचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. आज रोमान्सकडे लक्ष न देता कामावर लक्ष देणं गरजेचं आहे. खेळाडूंना मोठं यश मिळेल. महिला आपल्या आदरातिथ्याने इतरांवर छाप पाडतील. कामाच्या ठिकाणी उत्तर दिशेला असलेल्या भिंतीवर कृत्रिम सूर्यफुलं अडकवा. शुभ रंग : लाल आणि केशरी (Red and Orange) शुभ दिवस : रविवार आणि सोमवार शुभ अंक : 1 दान : कृपया सूर्यफुलाचं तेल दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जर तुमच्यावर हुकूम गाजवणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आला असाल, तर ताबडतोब अशा परिस्थितीतून स्वतःला बाजूला काढा. असे न केल्यास भविष्यात त्याचा त्रास होऊ शकेल. आज काम आणि वैयक्तिक आयुष्य या दोन्हींमध्ये भरपूर व्यग्र असाल. रात्रीच्या वेळी बाहेर पडून, चंद्रप्रकाशात काही काळ व्यतीत केल्यास फायदा होईल. आज गुंतवणूक केल्यास म्हणावा तसा फायदा होणार नाही, त्यामुळे प्रॉपर्टीसंबंधी निर्णय घेणं टाळा. लिक्विड, इलेक्ट्रॉनिक्स, धान्य, ज्वेलरी, केमिकल, मेडिसिन आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायातील व्यक्तींना काही दिवसांमध्ये मोठा फायदा संभवतो. शुभ रंग : निळा आणि पिवळा (Blue and Yellow) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया आज भिक्षेकऱ्यांना दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या व्यक्तिमत्त्वामुळे तुमचे सहकारी, बॉस आणि जोडीदारावर चांगली छाप पडेल. एखाद्या गोष्टीबाबत केलेली योजना नीट पार पडेल. आज कागदपत्रं आणि दागिने यांची काळजी घेण्याची गरज आहे. तुमचे कष्ट लक्षात घेतले जाऊन त्यांचं कौतुक होईल, ज्यामुळे यश साजरं करताना आणखी आनंद होईल. बिझनेससंबंधी बोलणी करताना लिखित स्वरूपात संवाद साधण्यावर भर द्या. राजकारणी किंवा सरकारी अधिकारी असलेल्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यापूर्वी गुरूमंत्राचा जप करावा. आज मुलाखत नियोजित असल्यास टाळू नका. आज जेवणात पिवळ्या रंगाचे पदार्थ तयार करा आणि संपूर्ण कुटुंबाला द्या, ज्यामुळे गुरू ग्रहाची ताकद वाढेल. शुभ रंग : केशरी (Orange) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया गरिबांना पिवळ्या डाळी दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्ही घेतलेले सर्व निर्णय तुमच्या फायद्याचे ठरतील. तुमच्या आर्थिक नियोजनाप्रमाणेच परतावा तुम्हाला गुंतवणुकीतून मिळेल. संवाद साधण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. सरकारी कंत्राट पूर्ण करण्यासाठी पैशांचा वाटा महत्त्वाचा ठरेल. आजचा बराचसा वेळ बैठका आणि प्रेझेंटेशनमध्ये जाईल. कायदेशीर प्रकरणांत इतरांचा सल्ला घेताना खबरदारी बाळगा. ऐकावं जनाचं करावं मनाचं हे तत्त्व फायद्याचं ठरेल. खासगी नातेसंबंधांना भावनिक वळण येईल, संवाद टाळू नका. व्यायामाला वेळ द्या, आणि शरीर थंड ठेवतील असे पदार्थ खा. शुभ रंग : निळा आणि केशरी (Blue and Orange) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना हिरवं धान्य दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज घरून काम करणं सोडा, आणि थोडी हालचाल करा. सेल्स क्षेत्रातील व्यक्तींना चांगलं यश मिळेल. एखादं नवीन काम, जागा, डील वा नेतृत्त्वाची संधी मिळू शकते. तुमच्या वरिष्ठांपासून सावध रहा. आज एखादी मुलाखत वा बैठक असल्यास टाळू नका. यासाठी जाताना हिरव्या रंगाचे कपडे घातल्यास फायदा होईल. आज कृपया पार्टी करणं आणि नॉनव्हेज खाणं टाळा. रोमँटिक नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रॉपर्टीसंबंधी निर्णय तुमच्या बाजूने लागतील. खेळाडूंना मोठं यश मिळेल. शुभ रंग : हिरवा (Green) शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया वृद्धाश्रमांमध्ये रोपं दान करा. # नंबर 6: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची कामाची सध्याची पद्धत पाहता, त्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या वरिष्ठांमध्ये अविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या कामाची पद्धत बदला. जोडीदार निवडताना हुशारीने निर्णय घ्या. तुम्हाला मित्र, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांचा भरपूर पाठिंबा आहे, मात्र सर्वांचीच जबाबदारी तुमच्या खांद्यावर घेणं टाळा. आज जोडीदारासोबत आणि ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देण्यात वेळ व्यतीत कराल. सरकारी टेंडरमध्ये रिस्क घेतल्यास फायदा होईल. गाडी, मोबाईल, घर खरेदी करण्यासाठी किंवा एखादी सहल आयोजित करण्यासाठी उत्तम दिवस. शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. वातावरण रोमँटिक राहील. शुभ रंग : अक्वा (Aqua) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया पांढऱ्या रंगाचं नाणं दान करा. #नंबर 7: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज पैशांचे व्यवहार करताना काळजी घेण्याची गरज आहे. कायदेशीर कागदपत्रं पुन्हा तपासून पहा. ज्येष्ठ व्यक्तींसोबत वेळ व्यतीत करून त्यांचा सल्ला ऐकून घ्या. कामाच्या ठिकाणी बॉसने दिलेला एखादा सल्ला स्वीकारा. सॉफ्टवेअर, डिफेन्स, गोल्ड, पेट्रोल, पेय पदार्थ, कॉस्मेटिक्स या क्षेत्रांमधील बिझनेस डील्स फायद्याच्या ठरतील. सोलार पॉवर, ज्वेलरी, वास्तू, मेडिसिन, अभिनय, राजकारण, अन्न आणि धातू उद्योगांमधील व्यक्तींना भरपूर लाभ होईल. लग्नाचे प्रस्ताव स्वीकारण्याचा विचार कराल. आज भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्या. लहान ब्रँड्ससोबत करार करण्यासाठी योग्य दिवस. शुभ रंग : पिवळा (Yellow) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया मंदिरात पिवळ्या रंगाचं कापड दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या पदाचा, पॉवरचा किंवा पैशांचा गैरफायदा घेणं टाळा. तुमची एखाद्या प्रकरणात बदनामी करण्याचा प्रयत्न होईल. तुम्ही इतरांसाठी एक लीडर आणि मार्गदर्शक आहात, मात्र जास्त कठोर होऊ नका. कायदेशीर प्रकरणांपासून सुटका मिळवण्यासाठी प्रभावशाली व्यक्ती किंवा पैशांची मदत घ्याल. तुमचा जोडीदार तुम्हाला पैसे कमावण्यासाठी मदत करेल. विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करावा. यासाठी आता जास्त पैसे भरावे लागत असले, तरी आपली स्वप्नं आणि भविष्यातील फायदा हेदेखील लक्षात घ्या. तुमचे सर्व निर्णय आज योग्य ठरतील. खेळाडूंसाठी उत्तम दिवस. प्रवासाचे बेत पुढे ढकला. न विसरता दान करा. शुभ रंग : समुद्री हिरवा (Sea Green) शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरजूंना खाद्यतेल दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कामात किंवा व्यवसायात वृद्धी होण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क साधाल. आपल्या अधिकारांचा स्वतःसाठी गैरवापर करू नका. बिझनेस व्यवहार सुरळीत पार पडतील. सोलर पॉवर, सरकारी नोकरी, शिक्षण, ग्लॅमर, ऑकल्ट सायन्स, संगीत आणि मीडिया क्षेत्रांतील व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. तरुणांना नवीन पद ऑफर केलं जाईल. आज तुम्ही घेतलेले सर्व निर्णय योग्य ठरतील. पब्लिक स्पीच, भागीदारी, मुलाखत, स्पर्धा परीक्षा या गोष्टींसाठी उत्तम दिवस. विद्यार्थ्यांनी स्पर्धेला जाण्यापूर्वी उजव्या मनगटावर लाल धागा बांधावा. खेळाडूंच्या पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. डॉक्टर आणि सर्जन यांचा सत्कार होईल. प्रवासाचे बेत सुफळ ठरतील. शुभ रंग : केशरी (Orange) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया घरगुती मदतनीस व्यक्तीला लाल कापड दान करा. 19 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज: राहुल गांधी, सलमान रश्दी, काजल अग्रवाल, आशीष विद्यार्थी, मुकेश खन्ना, यशोधरा राजे शिंदे.
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology

पुढील बातम्या