Home /News /lifestyle /

Numerology जन्मतारखेनुसार 25 मेचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology जन्मतारखेनुसार 25 मेचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 25 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 25 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्ही घेताल ते सर्व निर्णय योग्य ठरतील, फक्त कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यावर पूर्ण विचार करा. मेडिटेशन केल्यास फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा परफॉरमन्स चांगला होण्यासाठी एखाद्या सहकाऱ्याची मदत मिळेल. अभिनेते आणि वक्ते यांना करिअरमध्ये चालना मिळेल. शिक्षक, डॉक्टर, धातू उत्पादक, फायनान्सर आणि वकील या क्षेत्रांतील व्यक्तींना आज एखादी चांगली ऑफर मिळेल, ती नक्की स्वीकारा. आज कृपया चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. शुभ रंग : तपकिरी (Brown) शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 3 दान : कृपया मंदिरात सूर्यफुलाच्या बिया दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज स्वतःला विनाकारण कोणत्याही वादात अडकू देऊ नका. कौटुंबिक कलहापासूनही दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुमचं मन काय सांगतंय ते ऐकाल तर फायद्याचं ठरेल. आज स्वतःचा हट्टी स्वभाव दूर ठेऊन मनातील भावना स्पष्टपणे बोलून दाखवा. दिवसभर रोमँटिक वातावरण राहील. बिझनेस व्यवहार आरामात पार पडतील. एखाद्या मोठ्या कंपनीशी पार्टनरशिप करण्याची हीच योग्य वेळ आहे. राजकारण, मीडिया, शेती, बँकिंग आणि मेडिकल या क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींनी प्रॉपर्टी खरेदी करताना खबरदारी घ्यावी. शुभ रंग : आकाशी निळा (Sky Blue) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 आणि 6 दान : कृपया गरिबांना मीठ दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) माध्यम क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस अगदीच फायद्याचा आहे. लोकांवर आज तुमचा मोठा प्रभाव पडेल. नाट्य कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होतील. आज नशीब साथ देईल, मात्र आर्थिक गोष्टींबाबत मित्रांसोबत चर्चा करणं टाळा. संगीतकार, डिझायनर, विद्यार्थी, वृत्त निवेदक, राजकारणी, अभिनेते, कलाकार, गृहिणी, हॉटेलियर आणि लेखकांना आज करिअरसंबंधी एखादी चांगली बातमी समजेल. शुभ रंग : तपकिरी (Brown) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया गरजूंना ब्राऊन राईस दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्ही घेतलेले सर्व मोठे निर्णय आर्थिक फायद्याचे ठरतील. एखादी योजना अंमलात आणण्याचा विचार करत असाल, तर त्याचा पुन्हा एकदा आढावा घ्या. तुमची सर्व कामं वेळेत पूर्ण होतील, मात्र त्यांचा परतावा मिळण्यासाठी थोडा वेळ लागेल. बांधकाम, मशीनरी, मेटल, सॉफ्टवेअर आणि ब्रोकर अशा प्रकारच्या व्यवसायांतील लोकांनी आज करार करणं टाळावं. खेळाडूंच्या पालकांना आज आपल्या पाल्याबद्दल अभिमान वाटेल. शुभ रंग : निळा (Blue) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना धान्य किंवा चादर दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमची सर्व कामं, सर्व टार्गेट्स आरामात पार पडतील. कामाच्या ठिकाणी तुमची भरपूर प्रशंसा होईल. आज तुमचं नशीब सर्व ठिकाणी तुमची साथ देईल. संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस. खेळाडू, निवेदक, ज्वेलर्स, विद्यार्थी आणि ट्रॅव्हलर्स यांच्यासाठी आजचा दिवस फायद्याचा आहे. मीटिंग किंवा मुलाखतींमध्ये हिरवे कपडे घातल्यास नशीब उजळेल. आज तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्याची चांगली संधी आहे. शुभ रंग : समुद्री हिरवा (Sea Green) शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया गायींना पिण्याचे पाणी दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाचा फायदा आजूबाजूचे लोक घेऊ शकतात. त्यामुळे आज भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. आज बरीच कामं एकाचवेळी पार पाडाल. आज मनात रोमान्स आणि त्याग अशा दोन्ही भावना असतील. मात्र, प्रेमात धोका होण्याची शक्यताही आहे. आज समोरच्या व्यक्तीवर छाप पाडाल. तुमच्या खांद्यावर भरपूर घरगुती जबाबदाऱ्या घेणं टाळा. तुम्ही एकाचवेळी सर्वांना खूश करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. हॉटेलियर, ट्रॅव्हलर, ज्वेलर्स, कलाकार, जॉकी आणि डॉक्टरांना आपली कौशल्यं दाखवण्याची संधी मिळेल. शिक्षणासंबंधी भविष्याबाबत पालकांचा सल्ला घ्या. शुभ रंग : निळा (Blue) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया चांदीचं नाणं दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. तुम्हाला कदाचित भरपूर फायदा होऊ शकतो, किंवा भरपूर नुकसानदेखील होण्याची शक्यता आहे. गुरू किंवा वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरूवात केल्यास फायदा संभवतो. पैशांसंबंधी निर्णय घेताना तुमच्या हुशारीचा आणि समंजसपणाचा फायदा होईल. कृपया आपल्या सहकाऱ्यांवर अतिविश्वास ठेवणं टाळा. जोडीदाराकडून तुमच्याबद्दल अविश्वास दाखवला जाण्याची शक्यता आहे. आज कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी खबरदारी घ्या. हीलिंग, कोर्ट, स्टेशनरी, थिएटर, टेक्नॉलॉजी, सरकारी टेंडर, रिअल इस्टेट, शाळा, इंटिरिअर आणि धान्य या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मात्र आजचा दिवस उत्तम आहे. शुभ रंग : केशरी आणि निळा (Orange and Blue) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया गरिबांना सूर्यफुलाचं तेल दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज समोरून चालून आलेली एखादी संधी सोडू नका. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी बोलताना वाणी मृदू ठेवा. आज केवळ काम-काम न करता तब्येतीकडेही लक्ष द्या. दान, पुण्य करून देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. बिझनेसमधील व्यवहार दुपारच्या जेवणानंतर केल्यास फायद्याचे ठरतील. फॅमिली फंक्शन, प्रेझेंटेशन, सरकारी करार किंवा मुलाखती टाळू नका. आज कुटुंबासोबत वेळ व्यतीत करणं आवश्यक आहे. आज भगवान शंकर आणि शनिदेवाचे आशीर्वाद घेतल्यास दुहेरी फायदा संभवतो. शुभ रंग : समुद्री निळा (Sea Blue) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गायींना हिरवा चारा खाऊ घाला. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज पैसा, प्रतिष्ठा, पद, प्रसिद्धी सर्व काही तुम्हाला आरामात मिळून जाईल. अभिनय, माध्यम, निवेदन, खेळ, बांधकाम, आरोग्य, राजकारण आणि ग्लॅमर या क्षेत्रांमधील व्यक्तींची भरपूर प्रगती होईल. क्रिएटिव्ह आर्ट आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. बिझनेस किंवा नोकरीसाठी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची ओळख कामी येईल. आज सकाळी डाळिंब खाल्ल्याने दिवसभरात फायदा होईल. शुभ रंग : लाल (Red) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 आणि 6 दान : कृपया गरिबांना लाल रंगाचे धान्य दान करा. 25 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज: करण जोहर, कुणाल खेमू, उत्तमसिंग, रास बिहारी बोस, अभिनेता कार्थी
First published:

Tags: Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या