Home /News /lifestyle /

सुंदर, प्रभावशाली, तारुण्य.. अंकशास्त्रानुसार हा मूलांक असणारे व्यक्ती असतात नशीबवान

सुंदर, प्रभावशाली, तारुण्य.. अंकशास्त्रानुसार हा मूलांक असणारे व्यक्ती असतात नशीबवान

Number Astrology: ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील माणसाला समजणे सोपे करते. कोणत्याही व्यक्तीच्या जन्म तारखेवरून त्याचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्य हे अगदी सहज कळू शकते. आज आपण Radix 6 च्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 जून : प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र असं व्यक्तिमत्त्व (Personality) असतं. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, गुणवैशिष्ट्यं निरनिराळी असतात. ज्योतिषशास्त्र (Jyotish shastra) आणि हस्तसामुद्रिक शास्त्रातल्या नियम आणि सूत्रांच्या आधारे आपण या गोष्टींचा वेध घेऊ शकतो. या दोन शास्त्रांव्यतिरिक्त अंकशास्त्राच्या माध्यमातूनदेखील व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्यं, भविष्यात घडणाऱ्या संभाव्य घटनांविषयी जाणून घेता येऊ शकतं. अंकशास्त्रात (Numerology) मूलांक हा महत्त्वाचा घटक असतो. व्यक्तीच्या मूलांकाच्या आधारे, त्याचा शासक ग्रह निश्चित केला जातो. या माध्यमातून व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचं भविष्य जाणून घेता येतं. कोणत्याही महिन्यातल्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 येतो. हा मूलांक असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव (Nature), गुणवैशिष्ट्यं खास असतात. याविषयीची माहिती देणारं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे. अंकशास्त्रात 1 ते 9 या अंकांच्या आधारे गणित मांडलं जातं. कोणत्याही व्यक्तीचा मूलांक जाणून घेण्यासाठी त्याच्या जन्मतारखेची बेरीज केली जाते. यातून येणारी एकूण संख्या म्हणजे त्या व्यक्तीचा मूलांक होय. मूलांक 6 असलेल्या व्यक्तींचा स्वामी शुक्र (Venus) असतो. हा ग्रह प्रेम आणि शांतीचं प्रतीक मानला जातो. हा मूलांक असणाऱ्या व्यक्ती दिसायला सुंदर आणि प्रभावशाली असतात. या मूलांकाच्या व्यक्तींना वृद्धापकाळ (Old Age) उशिरा येतो, असं शास्त्र सांगतं. पहिल्या नजरेतच समोरच्या व्यक्तीवर या व्यक्तींच्या सौंदर्याची भुरळ पडते. हा मूलांक असलेल्या व्यक्तींचं कलेवर प्रचंड प्रेम असतं. Numerology : 'ही' जन्मतारीख असलेल्यांची आज फसवणूक होण्याची शक्यता, अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य मूलांक 6 असलेल्या व्यक्ती कला, दागिने, कपड्याशी निगडित क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावतात. चित्रपट, नाटक, संगीत क्षेत्रात, तसंच सोनं-चांदी आणि हिऱ्याशी निगडित क्षेत्रांतही या व्यक्ती विशेष यशस्वी होतात. ही सर्व क्षेत्रं 6 मूलांक असणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष फायदेशीर ठरतात. या व्यक्ती शारीरिकदृष्ट्या मजबूत असतात. या व्यक्तींचं आरोग्यदेखील चांगलं असतं. परंतु, या व्यक्तींना डायबेटीस, शुक्राणू आणि हृदयाशी निगडित आजार होऊ शकतात, असं अंकशास्त्राचे अभ्यासक सांगतात. अंकशास्त्राच्या माध्यमातून व्यक्तीच्या आर्थिक स्थितीविषयी (Financial Condition) माहिती जाणून घेता येऊ शकते. मूलांक 6 असलेल्या व्यक्तींची आर्थिक स्थिती नेहमीच एकसारखी नसते. या व्यक्तींचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असतो. या व्यक्ती मेहनती असतात आणि मेहनतीच्या जोरावर पैसा कमावतात. कौटुंबिक पातळीवर या व्यक्तींना भावंडांशी मतभेदांना सामोरं जावं लागतं. या व्यक्ती कोणाही व्यक्तीशी पटकन मैत्री करतात आणि मैत्री निभावताना मागे-पुढे पाहत नाहीत. 6 मूलांक असलेल्या व्यक्ती खूप प्रेमळ आणि शांतताप्रिय असतात.
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या