मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Numerology: जन्मतारखेनुसार 8 जुलैचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्र काय सांगतं? जाणून घ्या

Numerology: जन्मतारखेनुसार 8 जुलैचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्र काय सांगतं? जाणून घ्या

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 8 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 8 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 8 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 8 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कामाच्या ठिकाणी समोर येणारी आव्हानं स्वीकारा. यामुळे तुमचं लक्ष्य साध्य होण्यास मदत होईल. राजकीय नेते आणि टीम लीडर असणाऱ्या व्यक्तींनी पार्टनरशिप करण्याचं टाळावं. आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडतील. आज यश मिळवण्यासाठी उशिरापर्यंत काम करावं लागेल. मेडिकल क्षेत्रातल्या व्यक्ती, खेळाडू, सोलार व्यावसायिक, इंजिनीअर आणि सरकारी अधिकाऱ्यांना आज नवीन ऑफर मिळेल. शेती आणि शिक्षण व्यवसायात नफा होईल.

शुभ रंग : Yellow and Blue

शुभ दिवस : रविवार

शुभ अंक : 9

दान : कृपया आश्रमांमध्ये गहू दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

दिवसाच्या सुरुवातीला भगवान शंकराला अभिषेक करा. आज तुमची कामं पूर्ण होण्यासाठी प्रामाणिकपणा आणि लवचिकता हे दोन गुण गरजेचे आहेत. तुमच्या निरागसपणाचा फायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. मील आणि तेल व्यापारी, एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनीअर, ब्रोकर, ट्रॅव्हल एजन्सी, शेअर मार्केट आणि पार्टनरशिप फर्ममधल्या व्यक्ती यांना मोठं यश मिळेल. जोडीदार किंवा सहकाऱ्याकडून दुखावले जाल.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : कृपया गायींना पाणी दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्यातलं अफाट टॅलेंट नेहमीच तुम्हाला करिअरमध्ये सर्वांत वर ठेवतं. आज संवादकौशल्य आणि नवीन संकल्पनांच्या जोरावर बॉस, तसंच कुटुंबीयांवर छाप पाडाल. कोणत्याही परिस्थितीत काम करण्याची तुमची तयारी असेल. त्यामुळे यशाचा मार्ग मोकळा होईल. आज पैशांची आणि वस्तूंची काळजी घेणं गरजेचं आहे. क्रिएटिव्ह व्यक्ती आणि पब्लिक फिगर्स यांना भरपूर प्रसिद्धी मिळेल. बांधकाम आणि शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ. सकाळी कपाळावर चंदनाचा टिळा लावणं उत्तम.

शुभ रंग : Orange and Blue

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3 आणि 9

दान : कृपया गरिबांना सूर्यफुलाचं तेल दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

जुन्या कमिटमेंट्स पूर्ण करण्यासाठी आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आज उत्तम दिवस. उच्च पदावर असलेल्या व्यक्तींची आणखी बढती होईल. तुमच्या भविष्यासाठीच्या योजना इतरांपासून गुप्त ठेवा. जेवणात संत्र्याचा समावेश करणं फायद्याचं ठरेल. विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे, नक्की अर्ज करा. आज हिरव्या पालेभाज्या दान केल्याने नशीब उजळेल. खेळाडू आणि सर्जन यांना आर्थिक फायदे संभवतात. आज कुटुंबीयांसोबत किंवा मित्रांसोबत जास्त वेळ व्यतीत करता येणार नाही. त्यामुळे त्यांची बोलणी ऐकून घेण्यासाठी तयार राहा. दानधर्म करणं गरजेचं आहे.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : कृपया गरिबांना चपला दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कामाच्या ठिकाणी तुम्हाला टीम लीड करण्याची संधी मिळेल, ज्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी, गॅदरिंगला हजर राहण्यासाठी, मशीन खरेदी, प्रॉपर्टी विक्री, कागदपत्रांवर स्वाक्षरी करणं आणि सहलीला जाण्यासाठी उत्तम दिवस. प्रेमात असलेल्यांनी आपल्या जोडीदाराला मनातल्या भावना बोलून दाखवाव्यात. न्यूज अँकर, अभिनेते, हस्तकला आर्टिस्ट, इंजिनीअर या सर्वांचं भरपूर कौतुक होईल. आज मिळणारी भेटवस्तू टाळा. तो कदाचित शत्रूंनी तुमच्यासाठी रचलेला सापळा असू शकतो.

शुभ रंग : Aqua

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : कृपया अनाथाश्रमातल्या मुलांना हिरवी फळं दान करा.

# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज बिझनेस कनेक्शन वाढवण्यासाठी भेटीगाठी घ्याल. या ओळखी तुमच्या व्यापार वृद्धीसाठी फायद्याच्या ठरतील. तुमच्या ध्येयाच्या दिशेने काम करत राहिलात, तर दिवसाच्या शेवटी भरपूर आनंद आणि समाधान मिळेल. आज तुमच्या कामाला नशिबाची साथ मिळेल. अगदी ऐशोआरामाचा दिवस. कुटुंबीयांचं प्रेम आणि साथ मिळाल्याने समाधानी असाल. आज भरपूर जबाबदाऱ्या पार पाडाल. रिटेलर, शिक्षक, राजकीय नेते आणि अभिनेते यांना बढती आणि स्थैर्य लाभेल.

शुभ रंग : Sky Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : कृपया गरिबांना दही दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज अगदी उत्साहपूर्ण दिवस आहे. हातात घेतलेलं कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर एनर्जी असेल. कामाच्या ठिकाणी उत्तम परफॉर्मन्स आणि चांगली आर्थिक वाढ होईल. रिलेशनशिप चांगली राहील. बिझनेसमध्ये आज मित्र आणि कुटुंबीयांपासून सावध राहा. खेळाडूंनी आज प्रतिस्पर्ध्यापासून दूर राहावं. म्हणजे वाद टळतील. विरुद्धलिंगी व्यक्ती तुमच्यासाठी नशीबवान ठरेल. आज भगवान शंकराची पूजा करून आशीर्वाद घेणं फायद्याचं ठरेल.

शुभ रंग : Green

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 3

दान : कृपया पिवळा भात किंवा पिवळ्या डाळी दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज बऱ्याच गोष्टी एकत्रित घडतील. त्यामुळे दिवसभर व्यग्र रहाल. तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती तुमच्याशी प्रामाणिक आहेत. त्यामुळे उत्तम प्रकारे नेतृत्व करू शकाल. आज निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ व्यतीत करणं आणि तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. दानधर्म केल्याने फायदा होईल. काही वेळ मेडिटेशन केल्यास उत्तम. प्रॉपर्टी आणि करिअरसंबंधी आज घेतलेला निर्णय भविष्यात फायद्याचा ठरेल; मात्र त्यापूर्वी तुमच्या मेंटॉरचा सल्ला अवश्य घ्या.

शुभ रंग : Purple

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : कृपया गरिबांना छत्री दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस प्रसिद्धी, आनंद, ऊर्जा आणि उत्साहाचा आहे. ही सगळी ऊर्जा तुमच्या ध्येयासाठी वापरल्यास उत्तम. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन आणि आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडतील. एकमेकांप्रति विश्वास असल्यामुळे नातेसंबंध मजबूत होतील. प्रॉपर्टी डीलर्स, कापड उत्पादक, बँकर, शेफ, हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर, हीलर्स, फार्मासिस्ट, सर्जन, राजकीय व्यक्ती आणि खेळाडूंना भरपूर प्रसिद्धी मिळेल. आज लाल रंगाचे कपडे घातल्याने नशीब उजळेल.

शुभ रंग : Red

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : कृपया गरिबांना लाल मसूर दान करा.

8 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : सौरव गांगुली, रेवती, वाय. एस. राजशेखर रेड्डी, नीतू सिंग, ज्योती बसू, मोहम्मद आझम शाह

First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology