मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Numerology: तुमची जन्मतारीखही देते भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology: तुमची जन्मतारीखही देते भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणंच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 21 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणंच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 21 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणंच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 21 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणंच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 21 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जुन्या प्रॉपर्टीच्या संदर्भात कुटुंबातल्या ज्येष्ठ मंडळींच्या मदतीने काही तरी ठोस निर्णय होईल. प्रॉपर्टी खरेदीपेक्षा सध्याचा काळ विक्रीसाठी योग्य आहे. खेळात विजयाची मोठी शक्यता. शाळा, कला, बांधकाम, सोनं, इलेक्ट्रॉनिक्स, कृषिविषयक पुस्तकं, औषधं, फायनान्स आदी क्षेत्रांतल्या व्यवसायांना जास्त नफा मिळेल. महत्त्वाच्या असाइनमेंट्स आज सूर्यास्तापूर्वी पूर्ण करणं गरजेचं आहे. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : मंदिरात कच्ची हळद दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या लवचीक आणि निरागस स्वभावामुळे तुमच्या स्वतःच्याच भावना दुखावण्याची शक्यता आहे. लीगल कमिटमेंट्स सहज पूर्ण केल्या जातील. आज कोणी तरी तुम्हाला दुखावू शकतं. त्यामुळे योग्य ती सावधगिरी बाळगा. महिला आणि विद्यार्थ्यांनी सार्वजनिक प्लॅटफॉर्म्सवर उपस्थिती लावली पाहिजे आणि लोकप्रियता मिळवली पाहिजे. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, ट्रॅव्हलिंग, एअरलाइन्स, क्रीडा, रिटेल, वैद्यकीय आदी क्षेत्रं, तसंच राजकीय व्यक्तींची प्रगती होईल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : मंदिरात तेल किंवा दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज लीडरप्रमाणे काम करा आणि सर्व ठिकाणी विजय प्राप्त करा. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती तुमच्या कौशल्यांवर जळतात. त्यावर उपाय म्हणून संध्याकाळी दुधाच्या पाण्याने आंघोळ करावी. कामाच्या ठिकाणी अप्रैझल किंवा प्रमोशनची शक्यता. तुमचं ज्ञान आणि भाषण यांमुळे लोक प्रभावित होतील. आज घेतलेले निर्णय अनुकूल ठरतील. खासकरून, शिक्षणतज्ज्ञ, संगीतकार, बँकर्स, लेखक यांच्या बाबतीत हे जास्त लागू होईल. आज केलेली गुंतवणूक मोठा परतावा देईल. प्रेमात असलेल्यांनी आपल्या भावना खुलेपणाने व्यक्त कराव्यात. सरकारी अधिकाऱ्यांना नशिबाची साथ मिळेल. दिवसाची सुरुवात करताना गुरूचं नामस्मरण करायला आणि कपाळावर चंदन लावायला विसरू नका. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : मुलांना पिवळं पेन किंवा पेन्सिल दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचे कष्ट आणि संघटनकौशल्य यांमुळे आज यश मिळणार हे निश्चित आहे. आज विश्रांतीला वेळ नाही. भविष्यासाठी आजच बीजारोपण करणं ही आजच्या दिवसाची कृती आहे. क्रीडा, राजकारण, मनोरंजन या क्षेत्रांत असलेल्यांना प्रवासासाठी हा उत्तम दिवस आहे. बांधकाम किंवा स्टॉक मार्केट बिझनेस यांची प्रगती होईल. मीडिया, मेटल, मेडिकल आणि कृषी क्षेत्रात नव्या संधी मिळतील. विद्यार्थी, मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती त्यांचं महिनाअखेरीचं उद्दिष्ट पूर्ण करू शकतील. आज मांसाहार घेणं टाळा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : भिकाऱ्यांना कपडे दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या प्रोफाइलचं प्रमोशन होण्यासारखी नवी ऑफर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही ती स्वीकारायला हवी. जुना मित्र किंवा नातेवाईक मदतीला येईल. तुम्ही ती मदत स्वीकारायला हवी. बँकर्स, खेळाडू, अभिनेते, राजकीय नेते यांना नशिबाची विशेष साथ मिळेल. विक्री आणि क्रीडा क्षेत्रात असलेल्यांना वेगाने हालचाली होणं अनुकूल ठरेल. विद्यार्थी त्यांचं शैक्षणिक यश साजरं करतील. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : हिरव्या पालेभाज्या दान कराव्यात. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या मदत करण्याच्या स्वभावामुळे तुम्ही अनेकांचे आवडते आहात. त्यामुळे तुम्ही शत्रू निर्माण कराल. कौटुंबिक सोहळ्यांना उपस्थित राहणं, एंगेजमेंट, प्रेमभावना, प्रवास, कौशल्यं प्रदर्शन, प्रेझेंटेशन, मास मीडियासमोर जाणं, विजय साजरा करणं यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मुलं आणि जोडीदार यांच्याबरोबर व्यतीत करण्यासाठी चांगला दिवस. व्हिसाची वाट पाहत असलात, तर पाठपुरावा करायला हवा. फॅक्टरीसाठी नव्या प्रॉपर्टीच्या शोधात असलेल्यांना चांगला पर्याय उपलब्ध होईल. अभिनेते, मीडिया क्षेत्रातल्या व्यक्ती आदींना यश मिळेल. शुभ रंग : Teal शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना पांढरी मिठाई दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही तुमच्या कामांचं विश्लेषण करता. खूप कष्ट घ्याल. त्यामुळे विजय मिळेल. तुम्ही आजच्या दिवसाचे हीरो ठराल. बिझनेसमध्ये जोखीम घ्यायला हरकत नाही. कायदेशीर प्रकरणात तुमचं विश्लेषणकौशल्य वापरावं. खेळ, शैक्षणिक क्षेत्रात विजय मिळेल. रिलेशनशिप बहरेल. विरुद्धलिंगी व्यक्ती तुमच्यासाठी नशीबवान ठरेल. गुरुमंत्राचं स्मरण करावं. राजकीय नेत्यांसाठी चांगला दिवस. मृदू भाषेचा वापर करणं गरजेचं. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या, त्यांची सेवा करा. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : आश्रमात गहू दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) शहाणपणा आणि वक्तशीरपणा आज महत्त्वाचा ठरेल. कष्ट घेणं अत्यावश्यक. पैसे मिळतील; मात्र काही मॅनिप्युलेशन्स करावी लागतील. ब्रँड जितका मोठा, तितकी यश मिळण्याची शक्यता जास्त. गुडविलमुळे तुम्हाला दिवसाच्या शेवटी गौरवलं जाईल, खासकरून तुम्ही मॅन्युफॅक्चरर असलात तर... उच्च पातळीवरचं ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही अधिक वेळ व्यतीत कराल. डॉक्टर्सना सेवेसाठी गौरवलं जाईल. पब्लिक फिगर्सना संध्याकाळपर्यंत आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सोहळ्यासाठी वचन देऊ नका. वेळ मिळण्याची शक्यता दिसत नाही. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना कलिंगड दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) स्त्रियांना आज कुटुंबातली आयकॉन बनण्याची संधी आहे. आजचा दिवस कौतुकाचा आणि प्रगतीचा आहे. अचानक प्रगतीची किंवा यशाची शक्यता आहे. सरकारी ऑर्डर्ससाठी जाण्याचा दिवस. खेळाडू, विद्यार्थी यांनी पुढे येऊन संधी स्वीकारली पाहिजे. कारण आजचा दिवस चांगला आहे. शेफ, अभिनेत्री, गायक, सीए, शिक्षक, खेळाडू, हॉटेलियर्स यांना नशीब साथ देईल. शुभ रंग : Red & Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3, 9 दान : घरगुती मदतनीस किंवा भिकाऱ्यांना लाल मसूर दान करा. 21 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : संग्राम सिंह, वरुण संदेश, आनंद बक्षी, आशिष चौधरी, खर्गे, शंकरसिंह वाघेला
First published:

Tags: Numerology

पुढील बातम्या