मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Numerology: जन्मतारखेनुसार 11 जुलैचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology: जन्मतारखेनुसार 11 जुलैचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या वैयक्तिक आयुष्याची नव्या मित्राबरोबर नवी सुरुवात असू शकेल. एखादा करार करणं असो, तुमच्या मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घेणं असो, भागीदारी करणं, नवी नाती तयार करणं किंवा इंटरव्ह्यूसाठी तयारी करणं असो, ही एक नवी सुरुवात असू शकते. टीम म्हणून तुम्हाला आज आणखी काही गोष्टी शिकाव्या लागतील. कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या ऑफिसमधले सीनिअर आणि ज्युनिअर्सशी तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल. तुमच्या खासगी आयुष्यात तुम्हाला अत्यंत मुत्सद्दीपणे वागावं लागेल. नवीन ठिकाणी गुंतवणुकीमध्ये तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल. भगवान विष्णूची आराधना करायला विसरू नका.

शुभ रंग : Creme and Sky blue

शुभ दिवस : रविवार

शुभ अंक : 1

दान : आज केळी दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या प्रचंड ऊर्जेमुळे तुम्ही सर्वांचे आवडते बनता. मस्त संगीत ऐकून तुमच्या सुंदर दिवसाची सुरुवात करा आणि जोडीदाराबरोबर शॉपिंगचा आनंद घ्या. तुम्हाला एखादा करार करायचा असेल किंवा टेंडर पाठवायचं असेल, तर त्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांवर मात करण्यासाठी मुत्सद्दीपणे संवाद साधणं आवश्यक आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवण्यासाठीही आजचा दिवस चांगला आहे. तसंच तुमची स्वप्नं प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीनं आज तरी अशक्य वाटत असली तरी संयम ठेवा. आज पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्यास नक्कीच काही तरी चांगलं घडू शकतं. भगवान शंकर आणि चंद्राची विशेष आराधना करा.

शुभ रंग : White

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : गरिबांना पांढरी मिठाई दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमची जुनी मालमत्ता जास्त किमतीला विकायची असेल, तर कायदेशीर अडचणी सोडवाव्या लागतील. आजचा दिवस म्हणजे बोलून किंवा लेखी संवादाद्वारे तुमच्या भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे. आजचा दिवस अधिक चांगला करण्यासाठी आपल्या वाट्याला आलेले भोग विसरा आणि दिवस चांगला जाईल अशादृष्टीने आपल्याच मनाशी संवाद साधा. तुमच्या मित्रांना इम्प्रेस करण्यासाठी आणि समाजात मिसळण्याच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. तुम्ही डान्सिंग, कुकिंग, डिझायनिंग, अभिनय, शिक्षण किंवा ऑडिटिंग यांपैकी कोणत्याही क्षेत्रात असाल तर तुमचं कौशल्य दाखविण्याचा आजचा दिवस आहे. वित्तीय क्षेत्र आणि सरकारी परीक्षा देणारे विद्यार्थी आज त्यांना मिळालेल्या मार्कांचा आनंद घेऊ शकतात.

शुभ रंग : Peach

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3 आणि 9

दान : मंदिरामध्ये हिरवी केळी दान करा

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या आक्रमकतेला आवर घाला आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी भूतकाळ विसरा. आजचा दिवस व्यावसायिक योजना प्रत्यक्षात आणण्याच्या कृतींचा आहे. ग्राहक किंवा क्लायंट मीटिंग उत्त्म पार पडतील आणि त्यात तुमचं कौतुक होईल. आजचा बहुतांश वेळ समुपदेशनात घालवावा. प्रवास करणार असाल किंवा तुमचं काम यंत्रांशी निगडित असेल तर काळजी घ्या. वैयक्तिक नातेसंबंधही कोणत्याही गोंधळाशिवाय सुरळीत होतील. चांगल्या, आरोग्यदायी आयुष्यासाठी जिथे हिरवागार परिसर आहे अशा निसर्गाच्या ठिकाणी प्रवास करा.

शुभ रंग : Sky Blue

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : गरिबांना हिरव्या रंगाचं धान्य दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आता तुम्हाला भावनाशील विचार करण्याची गरज आहे. तुमच्या आवाजात, बोलण्यात मार्दवता ठेवा. नाही तर तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतात. तुमच्या स्वातंत्र्याला तुमच्या नैतिकतेच्या मर्यादा ओलांडू देऊ नका. आज मीटिंगमध्ये सी ग्रीन रंगाचे कपडे घातल्यास फायदा होऊ शकतो. एखादा प्रस्ताव किंवा इंटरव्ह्यूला आनंदाने सामोरं जा. आज मालमत्तेसंबंधीचे निर्णय अगदी योग्य ठरतील. प्रवासाची आवड असणाऱ्यांनी परदेशी ट्रिपचा विचार करायला हरकत नाही. खाण्यापिण्यात मात्र आज शिस्तबद्धता बाळगणं अत्यावश्यक आहे.

शुभ रंग : Sea Green

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : गरिबांना पांढरा हातरुमाल दान करा.

# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुम्हाला पैसा आणि नशीब दोन्हींचीही साथ मिळणार आहे. तुमच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचा आजचा दिवस आहे. तुम्हाला लहान मुलं आणि ज्येष्ठांचाही पाठिंबा मिळाल्याने अगदी धन्य वाटेल. शिक्षक, गृहिणी, तसंच ग्लॅमर, ट्रेनिंग (प्रशिक्षण), इम्पोर्ट-एक्सपोर्ट, कापड, रिअल इस्टेट, लक्झरी गोष्टींशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना तर आज नशिबाची विशेष साथ मिळणार आहे. आजचा दिवस दागिने, घर, कपडे किंवा अन्य उपकरणं घेण्यासाठी उत्तम दिवस आहे. शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. संध्याकाळी एखादी रोमँटिक डेट स्वप्नातला आनंद प्रत्यक्षात उतरवेल.

शुभ रंग : Aqua

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : मंदिरामध्ये दही दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज प्रवास शक्यतो टाळा. आज तुमच्यासाठी घरून काम करणं म्हणजेच वर्क फ्रॉम होम हेच योग्य असेल. आज यश मिळवायचं असेल तर क्लायंट किंवा तुमच्या भागीदाराबरोबर जोखीम, धोका पत्करा. वकिलाचा सल्ला ऐकल्याने तुमचा फायदा होणार आहे. लग्नाचा प्रस्ताव प्रत्यक्षात येऊ शकेल. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन तिथे अभिषेक केल्याने यशासाठी आवश्यक असणाऱ्या नेपच्यून ग्रहाला बळकटी मिळेल.

शुभ रंग : Sea green

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : गरिबांना तेल दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुम्ही अनेकांचे आवडते आहात. त्यामुळे आज तुम्हाला आजूबाजूच्या अनेकांकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळतील. तुमचा दृष्टिकोन थोडासा लवचिक ठेवा आणि आक्रमकता टाळा. सरकारी संबंधांचा फायदा करून घ्या. मुत्सद्दी दृष्टिकोन आणि पैशांच्या मदतीने कायदेशीर समस्या सुटतील. बिझनेस डील्स करण्यासाठी तुमचा आतला आवाजच मदत करेल. तुम्हाला मिळालेल्या यशामुळे तुमचा जोडीदार प्रभावित होईल. विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रांत यश मिळेल. तुमचा आजचा दिवस विविध व्यवहारांमध्ये अगदी व्यग्र जाईल. त्यामुळे आजचा दिवस तुम्हाला समाधान मिळवून देईल. आज गुरांसाठी दानधर्म करणं आवश्यक आहे.

शुभ रंग : Sea Blue

शुभ दिवस : शनिवार

शुभ अंक : 6

दान : गरजूंना पादत्राणं दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज काही छोट्या समस्या असतील, तर त्यांकडे दुर्लक्ष करा. आजच्या दिवसाचा उत्तरार्ध तुमच्या मनासारखा होईल. जुने वाद परस्पर विश्वासाने मिटवावेत. नेतृत्व करणारे त्यांच्या समर्थकांचा अधिक विश्वास आणि निष्ठा मिळवतील. आज व्यावसायिक संबंध आणि सौद्यांमध्ये नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे. राजकारण, द्रव पदार्थांचा, औषधांचा व्यवसाय करणारे, डिझायनिंग क्षेत्र, मीडिया, अर्थ किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांची भरपूर प्रगती होईल. जे तुम्हाला आतापर्यंत विरोध करत होते ते दूरवर फेकले जातील. प्रेमात असणाऱ्यांनी बोलून वाद मिटवावेत. खेळाडूंच्या पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : मंदिरात लाल कापड दान करा.

11 जुलै रोजी जन्मलेल्या सेलिब्रिटीज : अमिताव घोष, बेजान दारूवाला, झुंपा लाहिरी, मानव गोहिल, सुरेश प्रभू

First published:

Tags: Numerology