Home /News /lifestyle /

Numerology: जन्मतारखेनुसार 22 मेचा दिवस 'या' राशींसाठी असेल उत्तम; जाणून घ्या काय सांगतात आकडे

Numerology: जन्मतारखेनुसार 22 मेचा दिवस 'या' राशींसाठी असेल उत्तम; जाणून घ्या काय सांगतात आकडे

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 22 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 22 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस संपत्ती विकण्यासाठी चांगला आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा वापर करुन घेण्याची ही योग्य वेळ आहे. खेळ आणि स्पर्धांमध्ये जिंकण्याची शक्यता अधिक आहे. टूल्स, मशीन्स, ट्रॅव्हल एजन्सी, फर्निचर, साहित्य, औषधं आणि कपडे या क्षेत्रांतील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात फायदा संभावतो. राजकारणी आणि पायलट यांच्यासाठी लकी दिवस आहे. लहान मुलांचं शिक्षक आणि प्रशिक्षक कौतुक करतील. शुभ रंग : निळा (Blue) शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना निळे कापड दान करा. #नंबर 2: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) भावनिक विचार करण्यापेक्षा तर्कशुद्ध विचार करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या नापसंतीच्या एखाद्या क्षेत्रातूनदेखील फायदा होत असेल तर त्याबद्दल विचार करा. लोक तुमच्या इच्छा आणि आकांक्षा दाबण्याचा प्रयत्न करतील, त्याला बळी पडू नका. एखादी व्यक्ती तुमचा अपमान करू शकते, तेव्हा काळजी घ्या. महिलांनी जोडीदाराच्या सावध स्वभावाकडे दुर्लक्ष करावं. कायदेशीर व्यवहार सुरळीत पार पडतील. जुन्या ओळखीने सरकारी कामं पूर्ण कराल. राजकारणी आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यवसायात असणाऱ्यांना फायदा संभवतो. शुभ रंग : आकाशी निळा (Sky Blue) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरांमध्ये पांढऱ्या रंगाची कोणतीही मिठाई दान करा. #नंबर 3: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची तर्कशुद्ध विचारसरणी आणि अंतर्ज्ञान यामुळे कुटुंबीय आणि मित्र परिवारामधील संबंध दृढ होतील. अभिनेत्यांसाठी आज आपले कौशल्य दाखवण्याची उत्तम संधी चालून येईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्ती लोकांवर छाप पाडण्यात यशस्वी होतील. लेखन आणि संगीत क्षेत्रातील व्यक्तींना आज घेतलेले सर्व निर्णय फायद्याचे ठरतील. आज केलेली गुंतवणूक चांगला परतावा देईल. प्रेमात असलेल्यांनी आपल्या मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त कराव्यात. सरकारी कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. दिवसाच्या सुरुवातीला कपाळावर चंदनाचा टिळा लावावा. तसंच, दिवसभरात गुरूंचं नामस्मरण केल्याने फायदा होईल. शुभ रंग : केशरी आणि निळा (Orange and Blue) शुभ दिवस : गुरूवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया महिला मदतनीसाला केशर दान करा. #नंबर 4: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज दिवसभर भरपूर उत्साह राहील. ही सगळी एनर्जी एखाद्या विशिष्ट कामी लावलीत तर त्याचे उत्तम परिणाम दिसून येतील. उत्पादक आणि शेतकरी संपत्ती खरेदीबाबत निर्णय घेतील. राजकारणी आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींसाठी आज प्रवासाचा दिवस आहे. मेडिकल, सॉफ्टवेअर, हँडिक्राफ्ट, मेटल सेक्टर या क्षेत्रांतील व्यक्तींना फायदा संभवतो. मार्केटिंग क्षेत्रातील व्यक्तींचे टार्गेट पूर्ण होईल. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा दिवस. आज मांसाहार टाळा, तसंच मेडिटेशन केल्यास उत्तम. शुभ रंग : निळा (Blue) शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना लिंबूवर्गीय फळं दान करा. #नंबर 5: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही पहिल्यापासूनच अतिशय महत्वाकांक्षी व्यक्ती आहात. तुमच्या कृतीतून ते कायम दिसून येतं. तुमच्या या स्वभावामुळेच तुम्हाला मोठं यश मिळणार आहे. आजचा दिवस भरपूर फायदा आणि नाव कमावण्याचा आहे. एखादा जुना मित्र वा नातेवाईक तुमच्याकडे मदत मागेल, तेव्हा त्याला टाळू नका. आजचा दिवस बराचसा रोमँटिक असेल. डिझायनर, ब्रोकर, प्रॉपर्टी डीलर, बँकर, खेळाडू आणि राजकारणी व्यक्तींसाठी आजचा दिवस लकी ठरेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. शुभ रंग : समुद्री हिरवा (Sea Green) शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया हिरव्या पालेभाज्या दान करा. #नंबर 6: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस थोडा सावधगिरी बाळगण्याचा आहे. तुमच्या सोबतचे लोक तुमच्या साध्या स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आज कोणी काही ऑफर करत असेल, तर त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्या. शक्यतो कोणतीही ऑफर टाळा. आज मुलांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी उत्तम दिवस आहे. व्हिसा मिळण्यासाठी वाट पाहत असाल, तर अजूनही प्रतीक्षेत रहावं लागेल. नवीन काम किंवा नवीन घर शोधत असाल, तर आज उत्तम पर्याय समोर येईल. अभिनेते आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्तींना मोठं यश मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धात बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाल्यामुळे समाधानी आणि निवांत वाटेल. शुभ रंग : शेवाळी (Teal) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना मिठाई दान करा. #नंबर 7: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तरुण राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, वकील, वैज्ञानिक, शेतकरी, डिस्ट्रिब्युटर्स, सीए आणि डिफेन्स क्षेत्रातील व्यक्तींना करिअरमध्ये मोठं यश मिळेल. खेळ आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीसाठी थोरामोठ्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य मिळेल. आज जोडीदारासोबत नातेसंबंध अधिक फुलतील, तसंच विरुद्धलिंगी व्यक्ती तुमच्यासाठी लकी ठरेल. आज वाणी मधुर ठेवाल तर कोणत्याही अडचणीवर मात कराल. राजकारणी लोक जनतेवर आणि पक्षातील वरिष्ठांवर छाप पाडतील. महिलांना शेअर मार्केटमध्ये फायदा संभवतो. आज दिवसभरात गुरूमंत्राचा जप करत राहिल्यास उत्तम. शुभ रंग : केशरी (Orange) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया मंदिरामध्ये कुंकू दान करा. #नंबर 8: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज ठामपणे एखादा निर्णय घ्याल तर त्यामध्ये मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या भूतकाळातील चांगल्या कामांचा परतावा मिळण्याचा हा दिवस आहे. तुमच्या प्रचंड ओळखींचा फायदा आज तुम्हाला होईल. दिवसाच्या शेवटी एखादी चांगली बातमी समजू शकते. आजचा बहुतांश वेळ ज्ञानार्जनात खर्च होईल. डॉक्टरांना सेमिनारमध्ये भरपूर कौतुक आणि प्रशंसा मिळू शकते. पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तींना संध्याकाळपर्यंत भरपूर प्रसिद्धी मिळेल. शुभ रंग : समुद्री निळा (Sea Blue) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना लाल फळ दान करा. #नंबर 9: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस कौतुक आणि भरभराटीचा आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. स्टॉक ब्रोकर, ज्वेलरी, शिक्षण, अभिनय, गायन, नृत्य, चित्रकला, लेखन, प्रॉपर्टी व्यवहार आणि मेडिकल क्षेत्रातील व्यक्तींना आज मोठ्या प्रमाणात प्रशंसा आणि प्रसिद्धी लाभेल. प्रेमात असलेल्यांनी दोघांमधील मध्यस्थांपासून सावध रहावं. मुलाखत किंवा ऑडिशन देण्यासाठी, तसंच सरकारी ऑर्डर आणि प्रमोशनसंबंधी बोलणी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसंबंधी कामं आज करून घ्यावीत. अभिनेते, सीए, शिक्षक, खेळाडू आणि हॉटेल व्यवसायिकांसाठी लकी दिवस ठरेल. शुभ रंग : लाल आणि केशरी (Red and Orange) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया घरातील कामगारांना किंवा भिक्षेकऱ्यांना डाळिंब दान करा. 22 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज: राजा राममोहन रॉय, पद्मनाभ सिंग, दी ग्रेट गामा, नेदुमुदी वेणू, मेहबूबा मुफ्ती, रजितसिंग
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या