मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Numerology: जन्मतारखेनुसार 20 जुलैचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology: जन्मतारखेनुसार 20 जुलैचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 20 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 20 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 20 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 20 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या जोडीदाराला प्रॉमिस करण्याचा, आणि त्यांच्याकडून प्रॉमिस घेण्याचा दिवस आहे. आजचा दिवस अ‍ॅग्रीमेंट करण्यासाठी, आपल्या प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी, मुलाखत वा परीक्षा देण्यासाठी उत्तम आहे. भरपूर प्रसिद्धी आणि प्रशंसा मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना तुमच्याबद्दल मत्सर वाटेल. यातून होणारं नुकसान टाळण्यासाठी तुमच्या योजना इतरांना सांगणं टाळा, तसंच गुरुनामाचा जप करत राहा. ऑफिसमध्ये बॉस आणि वरिष्ठांचा विश्वास संपादन करा. नवी गुंतवणूक करताना तुमची हुशारी कामी येईल. आज घरातून बाहेर पडण्यापूर्वी भगवान शंकर आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद घ्या. शुभ रंग : Yellow and Blue शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : कृपया मंदिरामध्ये नारळ दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा आहे. त्यामुळे ठरवलेलं टार्गेट पूर्ण कराल. प्रेमात असलेल्यांनी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी चांगला दिवस. नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी, सरकारी टेंडर घेण्यासाठी, क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी उत्तम दिवस. आज चंद्रदेव आणि लक्ष्मी देवीसाठी खास पूजा करा. पाणी, फार्मा, महागड्या वस्तू, कापड, मेडिकल उत्पादन, हिरे, रबर, क्रीडा साहित्य, लिक्विड, ऑइल, फर्निचर आणि अन्न व्यापारात भरपूर फायदा होईल. शुभ रंग : White शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया गरिबांना किंवा आश्रमांमध्ये तांदूळ दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं ज्ञान सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करा, जेणेकरून त्याचा फायदा होईल. आज मौखिक संवादामुळे बऱ्याच गोष्टी साध्य कराल. संगीताची आवड असणाऱ्यांना विशेष ऑफर मिळेल. आज वाद टाळून तुमच्या मनातली गोष्ट बोलून दाखवल्यास फायदा होईल. तुमच्या मित्रांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी आणि त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी चांगला दिवस. शिक्षण, संगीत, अकाउंटिंग, डान्सिंग, कुकिंग, डिझायनिंग, अभिनय किंवा ऑडिटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. विदेशातले विद्यार्थी, इनडोअर गेम्स खेळणारे खेळाडू, सरकारी आणि फायनान्स क्षेत्रातल्या परीक्षा देणाऱ्या व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. शुभ रंग : Peach शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया महिलांना चंदनाचं खोड दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं सोशल सर्कल वाढवण्यासाठी आज चांगला दिवस आहे. याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. क्लायंट मीटिंग अगदी उत्तमरीत्या पार पडतील, ज्याबद्दल तुमचं कौतुक होईल. आजचा बराचसा वेळ ब्रँडिंग आणि सेल्स टार्गेट पूर्ण करण्यात व्यतीत होईल. आयटी, ब्युटी प्रॉडक्ट्स, अन्न, कापड, मशीन, कन्स्ट्रक्शन, समुपदेशन, अभिनय किंवा मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींनी आज मार्केटमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल. वैयक्तिक संबंध उत्तम राहतील. आज गोड आणि आंबट पदार्थ खाणं फायद्याचं ठरेल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना किंवा गायींना कच्ची केळी दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज मोठं यश साजरं करण्याचा आणि समाधानाचा दिवस आहे. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीचे फायदे आता दिसून येतील. अ‍ॅक्वा रंगाचे कपडे घातल्याने नशीब उजळेल. स्पर्धा, परीक्षा, मुलाखती, प्रेझेंटेशन या गोष्टींना आवर्जून उपस्थित राहा. कौटुंबिक निर्णयदेखील फायद्याचे ठरतील. प्रवासाची आवड असणाऱ्यांना लाँग ड्राइव्हला जाण्याची संधी मिळेल. आज बोलण्यावर आणि खाण्यावर ताबा ठेवणं गरजेचं आहे. शुभ रंग : Sea Green and Aqua शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया गरिबांना साखर दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस ऐशोआरामाचा, भरपूर संधींचा, दिलेलं प्रॉमिस पूर्ण करण्याचा आणि पार्टनरला प्रपोज करण्याचा आहे. दिवसाची सुरुवात आनंदी चेहऱ्याने करा. संपूर्ण दिवस समाधानी असाल. कुटुंबीय, मित्र, सहकारी यांचं प्रेम आणि पैसा दोन्ही भरपूर मिळेल. गृहिणी, अभिनेते, डॉक्टर, प्रशिक्षक, एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यापारी, कापड व्यापारी, रिअल इस्टेट व्यापारी आणि महागड्या वस्तूंशी संबंधित व्यावसायिक यांच्यासाठी भाग्याचा दिवस. सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहा; मात्र गप्पा-टप्पा, चहाड्या टाळा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल. दिवसाच्या शेवटी एखादी रोमँटिक कमिटमेंट तुम्हाला पूर्णत्वाची जाणीव करून देईल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया घरकाम करणाऱ्यांना बांगड्या दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आयुष्यात तुम्हाला पुढे जायचं असेल, तर तुमचा विश्वास ज्यांनी मोडला अशा व्यक्तींना माफ करायला शिका. कामाच्या ठिकाणी एखादी नवी सुरुवात होईल. आर्थिक ताण कमी होण्याची शक्यता आहे. आज कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत कराल. तुमच्या जोडीदाराचा स्वभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून वाद टळतील. आज दुधाच्या पाण्याने आंघोळ करणं गरजेचं आहे. विवाहासाठी अनुरूप प्रस्ताव येतील. गणेश मंदिरात जाऊन अभिषेक केल्यास फायदा होईल. शुभ रंग : Teal शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना गहू दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज सर्वांच्या नजरा तुमच्यावरच खिळलेल्या असतील. पैसा, पद, प्रतिष्ठा सगळं काही मिळवण्याचा आजचा दिवस आहे. एक समाधानी आयुष्य मिळाल्याबद्दल आज देवाचे आभार माना. भूतकाळातल्या चांगल्या कामाचं फळ आता मिळेल. कायदेशीर प्रकरणें पैसा आणि ओळखीने सुटतील. विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षणासाठी जाण्याचा विचार करावा. यासाठी भरपूर फी लागत असली, तरी पुढे होणारा फायदा आणि तुमची स्वप्नं पाहून योग्य निर्णय घ्यावा. आजचा दिवस नियोजनात जाईल. सरकारी डील्स मिळवण्यासाठी तुमचं नशीब कामी येईल. पैसा आणि समाधान यांचा समतोल साधण्यात आजचा बराच वेळ जाईल. प्रवासाचे बेत फायद्याचे ठरतील. निसर्गाच्या सान्निध्यात काही काळ व्यतीत केल्यास फायदा होईल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरजूंना चपला दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कोणत्याही क्षेत्रातल्या कलाकारांना आज आर्थिक फायदा होईल. आज दानधर्म करणं गरजेचं आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींना प्रपोझल मिळेल. विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रांमध्ये मोठं यश मिळेल. आर्थिक व्यवहार, कागदपत्रांवर सही करणं, घरगुती कार्यक्रम किंवा शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जातील. निवेदन, डिझायनिंग, मीडिया, फायनान्स आणि शिक्षण क्षेत्रांतल्या व्यक्तींना भरपूर प्रगती पहायला मिळेल. खेळाडूंच्या पालकांना आपल्या मुलांना अभिमान वाटेल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना कलिंगड दान करा. 20 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : अरुणिमा सिन्हा, नासिरुद्दीन शाह, ग्रेसी सिंह, हार्दिक पटेल, राजेंद्र कुमार
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology

पुढील बातम्या