Home /News /lifestyle /

Numerology : 7 जन्मांक असलेल्या व्यक्ती कशा असतात? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या स्वभाव, गुण आणि भविष्य

Numerology : 7 जन्मांक असलेल्या व्यक्ती कशा असतात? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या स्वभाव, गुण आणि भविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 16 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

    ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 16 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज आर्थिक विषयांची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे बँक खाती आणि स्टेटमेंट्स पाहावीत. हीलिंग सेशन्स घेणं, सरकारी काँट्रॅक्ट्सवर सह्या करणं, इव्हेंट्स स्पॉन्सर करणं, टुर्नामेंट्स खेळणं आदींमध्ये दिवस व्यतीत करावा. कायदेशीर किंवा ऑफिसमधल्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या भक्कम पार्श्वभूमीचा वापर करून मित्र आणि नातेवाईकांना मदत केली पाहिजे. आकर्षक दिसण्यासाठी चामड्याच्या वस्तूंचा वापर टाळावा. शुभ रंग : Orange शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 7 दान : आश्रमात पिवळे तांदूळ दान करावेत. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज दुसऱ्यावर विश्वासून त्याच्याकडे जबाबदारी देणं टाळावं. आज वैयक्तिक मुद्दे विसरून करिअरच्या मार्गावर लक्ष केंद्रित करावं, जेणेकरून विकासाचा वेग वाढेल. तुमच्या स्वप्नातल्या भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आजचा दिवस रोमँटिक आहे. बिझनेस कमिटमेंट्स अगदी सहज पूर्ण केल्या जातील. मोठ्या कंपनीसोबत पार्टनरशिप करण्यासाठी योग्य कालावधी. तुमच्या भविष्यातल्या कल्पना शेअर करणं टाळावं. राजकीय नेत्यांनी कागदपत्रांवर सह्या करताना सावधगिरी बाळगावी. शुभ रंग : Sky Blue & Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2, 6 दान : गरिबांना किंवा मंदिरात साखर दान करावी. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं इंट्यूशन आज स्पष्ट आणि जोरावर असेल. त्यामुळे त्याचं ऐका. आज तुमचा स्टेजवरचा वावर चार्मिंग असेल. नाट्यकलावंतांनी नवी सुरुवात करायला हरकत नाही. नव्या रिलेशनशिपची सुरुवात होण्याची शक्यता आहे. पब्लिक फिगर्स आणि वकिलांना नशीब अनुकूल असेल. संगीतकार, डिझायनर्स, विद्यार्थी, न्यूज अँकर्स, राजकीय नेते, अभिनेते, कलावंत, गृहिणी, हॉटेलियर्स, लेखक यांच्या करिअरवृद्धीच्या दृष्टीने खास घोषणा होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : Red शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : गरजूंना कच्ची हळद दान करावी. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कर्मचाऱ्यांना जुन्या आणि नव्या असाइनमेंट्समुळे कामाचा प्रचंड ताण जाणवेल. हिरव्या रंगाचे पदार्थ, तसंच संत्री खाल्ल्यामुळे शारीरिक आणि मानसिक वाढीला प्रोत्साहन मिळेल. बांधकाम, मशिनरी, धातू, सॉफ्टवेअर्स, ब्रोकर्स आदी बिझनेसमधल्या व्यक्तींनी आज करारावर सह्या करणं टाळावं. प्रोफेशनल लाइफ उत्तम असेल. प्राउड पॅरेंट्स असल्याचा सुंदर अनुभव घेता येईल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : गरिबांना संत्री दान करावीत. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सर्व संधी आणि स्रोतांचा तुम्ही पूर्णपणे वापर करून घ्यायला हवा. तुमच्या कामगिरीची दखल घेतली जाण्याचा आणि बक्षीस मिळण्याचा दिवस. आजचा दिवस प्रॉपर्टीत, तसंच स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा आहे. कारण लवकरच आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. खेळाडू, तसंच प्रवासी मंडळींना उत्तम लाभ मिळेल. मीटिंग्जमध्ये नशीब अनुकूल होण्यासाठी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत. आज प्रिय व्यक्तीला प्रपोझ करण्याचा दिवस आहे. कारण आज जीवन तुम्हाला तुमच्या आवडीची गोष्ट गिफ्ट देण्याची शक्यता आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीत करिअर करणाऱ्यांना सर्व अनुभव मिळतील. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : गरिबांना पांढरं पीठ दान करावं. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) रोमान्स आणि प्रॉमिसची भावना आज तुमच्या मनावर राज्य करील; मात्र विश्वासघात होणार नाही, याची काळजी घ्या. बिझनेस आणि नोकरीत प्रगती होईल; मात्र आज पर्सनल इश्यूज खूप गुंतागुंतीचे ठरतील. त्यामुळे वादावादी होणार नाही, याची काळजी घ्या. एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणावर जबाबदाऱ्या खांद्यावर घेऊ नका. कारण तुम्ही सर्वांना आनंदी करू शकत नाही. हॉटेलियर्स, ट्रॅव्हलर्स, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकीज, डॉक्टर्स आदींनी आपल्या कौशल्यांचं प्रदर्शन करावं. कारण आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी आहे. भविष्यासाठी क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घ्या. ते अनुकूल ठरेल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : चांदीचं नाणं दान करावं. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) वकील, सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, विद्यार्थी, खेळाडू, सीए यांच्यासाठी उत्तम दिवस. नेतृत्वगुण आणि विश्लेषणाचं कौशल्य हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे गुण आहेत. आज पैशांशी संबंधित निर्णयांमध्ये शहाणपण वापरण्याची गरज आहे. वादविवादांत पडू नका. कारण त्यामुळे तुमच्या प्रतिमेला धक्का लागू शकेल. प्रेमाच्या नातेसंबंधांत तुमच्या प्रामाणिकपणाला विश्वास आणि आदराचं रिटर्न गिफ्ट मिळेल. आजचा दिवस कागदपत्रांवर विश्वास ठेवण्याचा नाही. कोर्ट्स, थिएटर, तंत्रज्ञान, सरकारी निविदा, रिअल इस्टेट, शाळा, इंटेरिअर्स, धान्य आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुम्ही जोपर्यंत पार्टनरशिपमध्ये राहत नाही, तोपर्यंत बिझनेस रिलेशन्स हेल्दी असतील. शुभ रंग : Orange & Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : पिवळं कापड दान करावं. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दैनंदिन असाइनमेंट्समधल्या समस्या सोडवण्यात आज व्यग्र असाल. अल्पकालीन उद्दिष्टं साध्य होतील; मात्र दीर्घकालीन उद्दिष्टं रिडिझाइन करावी लागतील. आरोग्याची काळजी घेण्याची आणि हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करण्याचा काळ आहे. दुपारी जेवणापूर्वी केलेले बिझनेस व्यवहार यशस्वी होतील. कौटुंबिक सोहळे, प्रेझेंटेशन्स, सरकारी करार किंवा इंटरव्ह्यू आदींना उपस्थिती लावायलाच हवी. आज कुटुंबीयांसमवेत वेळ व्यतीत करायलाच हवा. आज लाँग ड्राइव्ह टाळा. आज आध्यात्मिक शक्ती वाढवा आणि प्रेमाचे नातेसंबंध बळकट करा. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गायींना हिरवं धान्य खाऊ घाला. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) लोकप्रियता हा कायमच तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कामाचा भाग आहे. त्यामुळे तुमचा करिष्मा कायम राहण्यासाठी समाजात मिसळत राहा. मीडिया, खेळ, बांधकाम, वैद्यकीय, राजकारण, ग्लॅमर आदी उद्योगांमध्ये प्रगतीचं नवं शिखर गाठलं जाईल. शिक्षण आणि क्रिएटिव्ह आर्ट क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अचीव्हमेंट्स आणि आर्थिक लाभाचा असेल. बिझनेस किंवा जॉबमध्ये प्रगतीसाठी फॅमिली कनेक्शन्सशी संपर्क साधण्याचा दिवस आहे. कारण एक चांगली संधी येण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसाची सुरुवात करताना लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9, 6 दान : महिलांना केशरी रंगाचं कापड दान करावं. 16 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : विकी कौशल, मुक्तानंद, नटवरसिंग, सोनल चौहान, धर्मेश दर्शन
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Numerology

    पुढील बातम्या