Home /News /lifestyle /

Numerology : 'या' दिवशी जन्म झाला असल्यास आज कोणत्याही करारावर सही करणं टाळा!

Numerology : 'या' दिवशी जन्म झाला असल्यास आज कोणत्याही करारावर सही करणं टाळा!

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 15 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

    ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 15 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस हा तुमच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध राहील. त्यामुळे प्रसंगी लवचिकता दाखवावी लागेल. याचा फायदा आत्ता दिसत नसला, तरी काही दिवसांमध्ये समाजात तुमची पत वाढू शकते. एखाद्या जुन्या मित्राने दिलेला प्रस्ताव आनंदाने स्वीकारा. कायदेशीर अडचण सोडवण्यासाठी मदत करणारी एखादी व्यक्ती भेटेल. अभिनेत्यांनी मिळणारी ऑफर नक्की स्वीकारावी. आज कृपया चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. शुभ रंग : Teal शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 9 दान : कृपया आश्रमांमध्ये पिवळ्या रंगाच्या डाळी दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) एखाद्या जुन्या वा नव्या मित्रामुळे आयुष्यात आनंद येईल. रोमँटिक नातेसंबंध अधिक खुलतील. मुलांसोबत असणारं नातं अधिक घट्ट होईल. तुमच्या मनातली भावना सत्यात उतरवण्यासाठी योग्य दिवस. बिझनेसशी संबंधित बोलणी सुरळीत पार पडतील. मोठ्या कंपनीसोबत भागीदारी करण्याची हीच योग्य वेळ आहे. राजकीय नेत्यांनी कागदपत्रांवर सही करताना खबरदारी घ्यावी. सेवा क्षेत्रातल्या व्यक्तींना भरपूर फायदा होईल. खासगी निर्णय घेताना भावनिक होणं टाळा. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 आणि 6 दान : कृपया गरिबांना पांढरे तांदूळ दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमचं नशीब जोरावर असणार आहे; मात्र, मित्रांसोबत असताना आर्थिक बाबींवर चर्चा करणं टाळा. क्रिएटिव्ह व्यक्ती, कलाकार, गृहिणी, रिटेलर्स, बेकर्स किंवा शेफ, राजकीय नेते आणि पब्लिक डीलर्स यांच्यासाठी अगदी उत्तम दिवस. थिएटर कलाकारांना नवी संधी मिळेल. संगीतकार, डिझायनर, विद्यार्थी, वृत्तनिवेदक आणि लेखकांना करिअरशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. शुभ रंग : Red शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : कृपया गरजूंना लेमन राइस दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) बऱ्याच काळापासून रखडलेली कामं आता जलद गतीने होतील. नशिबाची साथ मिळेल. ठरवलेली सर्व कामं वेळेत पूर्ण होतील. आज कपडे किंवा चपला दान केल्याने अधिक फायदा होईल. बांधकाम, मशिनरी, मेटल, सॉफ्टवेअर अशा क्षेत्रांमध्ये असलेल्या व्यक्तींनी, तसंच ब्रोकर असणाऱ्या व्यक्तींनी आज करारावर सही करणं टाळावं. तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया अनाथाश्रमात कपडे दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज घरूनच काम करण्यास प्राधान्य द्या आणि आपल्या कुटुंबीयांसोबत किंवा मित्रांसोबत वेळ व्यतीत करा. आज नवीन गुंतवणूक आरामात करू शकाल. तुमच्या कामाबद्दल प्रसिद्धी मिळेल. प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याचा फायदा होईल. खेळाडू आणि ट्रॅव्हलर असणाऱ्या व्यक्तींसाठी उत्तम दिवस. महत्त्वाच्या मीटिंगमध्ये हिरवे कपडे घातल्याने फायदा होईल. आज तुमच्या मनातल्या गोष्टी सत्यात उतरतील. त्यामुळे आवडत्या व्यक्तीला नक्की प्रपोज करा. शुभ रंग : Sea green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया गरिबांना हिरवी फळं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कामाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी नव्या संधी मिळतील. एखाद्या कार्यक्रमाला उपस्थिती लावाल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. कुटुंबीयांसोबत पिकनिकला जाण्यासाठी, तसंच शॉपिंग करण्यासाठी उत्तम दिवस. दिवसभर आनंदी राहाल. डिझायनर, डान्सर, ज्वेलर, अभिनेते, जॉकी आणि डॉक्टरांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आजचा दिवस या व्यक्तींसाठी भाग्याचा आहे. वडील आपल्या मुलांना भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन करतील. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया चांदीचं नाणे दान करा. एखाद्या महिलेला निळं कापड दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस हा अगदी रोलरकोस्टरप्रमाणे असेल. बरेच चढउतार जाणवतील; मात्र तुमच्या कुटुंबीयांचा आणि सहकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा राहील. त्यामुळे दिवसाच्या शेवटी यशस्वी व्हाल. आज पैशांचे निर्णय विचारपूर्वक घ्याल. भूतकाळात केलेल्या गोष्टींमुळे नातेसंबंधांतला विश्वास वाढेल. आज कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना खबरदारी घ्या. सरकारी टेंडर, रिअल इस्टेट, शाळा, इंटेरिअस, धान्य अशा व्यवसायांमध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी उत्तम दिवस. बिझनेसचे निर्णय घेताना भावनिक होऊ नका. शुभ रंग : Orange and Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया मंदिरात पिवळी मिठाई दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज घेतलेले आर्थिक निर्णय दीर्घ काळापर्यंत फायद्याचे ठरतील. कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला स्वीकारा. तुम्हाला लवकरच मोठं यश मिळणार आहे. त्यामुळे आता खांद्यावर आणखी जबाबदाऱ्या घेऊ शकता. बिझनेस व्यवहार दुपारच्या जेवणानंतर केल्यास फायद्याचे ठरतील. आज नियोजित असणाऱ्या मुलाखतीला आवर्जून उपस्थित राहा. आज कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करणं गरजेचं आहे. कृपया प्रवास टाळा. आज आर्थिक आणि प्रेमसंबंध अशा दोन्ही गोष्टींमध्ये नशीबवान राहाल. शुभ रंग : Sea Blue and Red शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना ब्राउन राइस दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मेडिकल, सायन्स, ग्लॅमर, फायनान्स, अ‍ॅस्ट्रॉलॉजी, वास्तू, आर्किटेक्चर या क्षेत्रांतल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. तसंच खेळाडू आणि विद्यार्थ्यांसाठीही भाग्याचा दिवस. बिझनेस किंवा कामाच्या ठिकाणी प्रगती होण्यासाठी मोठ्या व्यक्तींच्या ओळखी वापराल. आज लाल रंगाचे कपडे घातल्याने फायदा होईल. डान्सर, सिंगर, डिझायनर, पेंटर आणि गृहिणींनी तब्येतीची काळजी घ्यावी. आज मांसाहार करणं टाळावं. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 आणि 6 दान : कृपया गरिबांना लाल फळं दान करा. 15 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : सुरैया, लक्ष्मी मित्तल, टी. आर. बालू, मनिका बात्रा, राज राजरत्नम, नकुल
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Numerology

    पुढील बातम्या