Home /News /lifestyle /

Numerology : मैत्री किंवा रिलेशनशिपचा गैरफायदा घेऊ नका, अन्यथा...; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology : मैत्री किंवा रिलेशनशिपचा गैरफायदा घेऊ नका, अन्यथा...; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 14 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

    ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 14 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचे नेतृत्वगुण आणखी चांगले होणार आहेत. लोक तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतील. तुम्हीदेखील त्यांच्यावर विश्वास ठेवू शकाल. तुमचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. तुम्ही स्वतः पूर्ण बिझनेस सांभाळू शकता किंवा ऑफिसमधली एखादी महत्त्वाची पोझिशनदेखील तुम्ही हाताळू शकता. वैयक्तिक आयुष्यात भावनिकदृष्ट्या नशीबवान ठराल. आज जवळच्या व्यक्तींकडून भरपूर कौतुक, प्रपोझल, सत्कार आणि पाठिंबा मिळेल. ज्वेलर्स, इंजिनीअर असलेल्या व्यक्तींसाठी उत्तम दिवस. इलेक्ट्रॉनिक्स, मेटल, सोलार बिझनेस, धान्य, कॉस्मेटिक्स आणि कापड या उद्योगांमध्ये भरपूर फायदा होईल. एकूण आनंदी दिवस. शुभ रंग : Green and Yellow शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 आणि 5 दान : कृपया मंदिरात सूर्यफुलाच्या बिया दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रेमसंबंधांमध्ये आज नशीब जोरावर राहील. नवीन प्रपोझल आल्यास नक्की स्वीकारा. लहान मुलांना भरपूर आत्मविश्वास राहील; मात्र यश दिसून येण्यासाठी थोडा वेळ लागेल. तुमच्या मुलांसाठी गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. जोडप्यांमध्ये भरपूर रोमान्स राहील. त्यामुळे नातेसंबंध मजबूत होतील. महत्त्वाची बैठक वा मुलाखतीला जाताना Sea Green रंगाचे कपडे घालणं फायद्याचं ठरेल. जुन्या मित्रांसोबत वेळ व्यतीत करा. त्यामुळे भविष्यात फायदा होईल. वकील आणि अभिनेत्यांना विशेष यश मिळेल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 आणि 6 दान : कृपया गरिबांना मीठ दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कामाच्या ठिकाणी तुम्हाला वेगळी ओळख मिळेल. प्रमोशनचं कामही मार्गी लागण्याची शक्यता आहे. आज संवाद साधल्याने नातेसंबंध अधिक सुधारतील. त्यामुळे मौन टाळा. क्रिएटिव्ह व्यक्तींना गुंतवणुकीत चांगला परतावा मिळेल. एखादं नवीन व्हेंचर सुरू करण्यासाठी चांगला दिवस. शिक्षण, हॉटेल, संगीत आणि राजकारण या क्षेत्रांमधल्या व्यक्तींना प्रमोशन आणि प्रसिद्धी मिळेल. बिझनेसमधल्या व्यक्तींनी आपल्या क्लायंट्सना दुपारच्या जेवणानंतर भेटावं. शुभ रंग : Brown शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया आश्रमात पिवळे तांदूळ दान करावेत. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कामाच्या ठिकाणी एखादी सकारात्मक घडामोड होईल. तिचा परिणाम बऱ्याच काळापर्यंत राहील. एखादी मार्केटिंग स्ट्रॅटेजी अवलंबणार असाल तर निश्चिंतपणे पुढे जा. आज नशीब तुमच्या बाजूने असेल. आजचा दिवस काहीसा निरर्थक वाटेल; मात्र दिवसभर केलेल्या कामाचं फळ संध्याकाळपर्यंत मिळेल. तरुणांनी आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त कराव्यात. तसंच मैत्री किंवा रिलेशनशिपचा गैरफायदा घेणं टाळावं. आज मांसाहार आणि मद्यपान टाळावं. शुभ रंग : Teal शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना लिंबूवर्गीय शाकाहारी अन्न दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या यशाचा मार्ग खुला होईल. करिअरमध्ये अचानक मोठी संधी मिळू शकेल. तसेच आज नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने असेल. चांगले नातेसंबंध, शॉपिंग अशा गोष्टी आनंदी करतील. शेअर मार्केट, खेळ, स्पर्धा अशा गोष्टींमध्ये बिनधास्त रिस्क घेऊ शकता. एखादी आरामदायी सहल होऊ शकते. तसंच, आज एखादी विशेष व्यक्ती तुम्हाला भेटू शकते. शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल. अप्रूव्हल, प्रमोशन, अप्रैझल अशा गोष्टींसाठी आज बोलणी करणं फायद्याचं राहील. एखादा खास मित्र वा मार्गदर्शक भेटेल. शुभ रंग : Sea green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया हिरवी रोपं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज विवाहित जोडप्यांसाठी उत्तम दिवस आहे. आपल्या जोडीदारावरचा विश्वास आणि दोघांमधलं नातं अधिक वाढेल. कामाच्या बाबतीत सर्व टार्गेट्स आज पूर्ण होतील. राजकीय व्यक्तींना आपल्या क्षेत्रात मोठा विजय मिळेल. गृहिणींना कुटुंबीयांकडून प्रेम आणि सन्मान मिळेल. सरकारी अधिकाऱ्यांना प्रमोशन किंवा नवीन पोझिशन मिळू शकेल. कलाकार व्यक्ती बाकीच्यांवर छाप पाडण्यात यशस्वी होतील. आज प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार सुरळीत पार पडतील. विवाहासाठी प्रपोझल येऊ शकतं. शुभ रंग : Sky blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 आणि 2 दान : कृपया लहान मुलांना निळं पेन वा पेन्सिल दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) वैयक्तिक आयुष्यात आज तुमचा समजूतदारपणा मोलाची भूमिका बजावेल. आजूबाजूच्या व्यक्तींकडून भरपूर प्रेम मिळाल्यामुळे आनंदी असाल. सकाळी आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद नक्की घ्या. आज पिवळ्या डाळी दान केल्याने फायदा होईल. मोठ्या ब्रँडपेक्षा लहान ब्रँड्सना अधिक फायदा होईल. तुमच्यावर तुमच्या सहकाऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय सर्व सहकारी अगदी मनापासून मान्य करतील. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया तांब्याचं भांडं दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) भूतकाळात तुम्ही केलेल्या कामामुळे आज एखाद्या अडचणीवर सहज मात कराल. गायी-गुरांसाठी दानधर्म करण्याकरिता आजचा दिवस चांगला आहे. जोडप्यांमधले प्रेमसंबंध अधिक फुलतील. डॉक्टर, फार्मासिस्ट, इंजिनिअर आणि उत्पादकांना आर्थिक फायदा होईल. मशीन खरेदी करण्यासाठी आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. कामाच्या ताणामुळे तब्येतीवर परिणाम होईल. झोपण्यापूर्वी योगासनं करणं फायद्याचं ठरेल. शुभ रंग : निळा शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून तुमचा आत्मसन्मान दुखावला जाऊ शकतो. तसंच, तुमच्या वस्तूंचंही नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या दोन्ही बाबतींत खबरदारी घेणं गरजेचं आहे. शेअर मार्केटव्यतिरिक्त इतर बिझनेस गुंतवणूक फायद्याची ठरेल. तरुणांना आपल्या जोडीदारावर छाप पाडण्यासाठी चांगली संधी मिळेल. क्रिएटिव्ह व्यक्तींना आपल्या योजनांवर काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस. मास स्पीकिंग, एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणं, पार्टी होस्ट करणं, दागिने खरेदी, कौन्सिलिंग किंवा खेळासाठी साधारण दिवस. शुभ रंग : Brown शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 आणि 6 दान : कृपया एखाद्या लहान मुलीला लाल हातरुमाल दान करा. 14 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : जुबिन नौटियाल, कुमार मंगलम् बिर्ला, अकबरुद्दीन ओवैसी, किरण खेर, राज ठाकरे, गणेश आचार्य, प्रीतम, शेखर सुमन
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Numerology

    पुढील बातम्या