Numerology : 'ही' जन्मतारीख असलेल्यांची आज फसवणूक होण्याची शक्यता, अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य
Numerology : 'ही' जन्मतारीख असलेल्यांची आज फसवणूक होण्याची शक्यता, अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य
ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 13 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 13 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
बिझनेसशी संबंधित व्यवहारांमधून आज आर्थिक लाभ मिळवणं अवघड आहे. भविष्यातल्या विकासासाठी तुम्ही आज ऑफिसमधल्या आणि कुटुंबातल्या वरिष्ठांचा सल्ला घेतला पाहिजे. प्रॉपर्टी खरेदी करणं, मालमत्तेची विक्री करणं असे दोन्ही व्यवहार सुरळीतपणे होतील. आज तुमची मुलं चांगली अचीव्हमेंट करण्याची मोठी शक्यता आहे. शेती, डीलरशिप, बांधकाम, इन्फ्रास्ट्रक्चर, पुस्तकं, औषधं, फायनान्स आदी बिझनेसची रिकव्हरी सुरळीत होईल. मुलांचं त्यांचे शिक्षक किंवा प्रशिक्षकांकडून कौतुक होईल.
शुभ रंग : Teal
शुभ दिवस : रविवार
शुभ अंक : 3
दान : भिकाऱ्यांना पिवळी फळं दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुमच्या कल्पना समोर मांडणं टाळा. लीगल कमिटमेंट्समुळे संकट येईल आणि गुंतागुंत होईल; पण आर्थिक जबाबदारी कमी होईल. एखादी व्यक्ती तुमचा आत्मसन्मान दुखावू शकेल. त्यामुळे सावध राहा. महिलांनी कुटुंबातल्या अन्य महिलांना सहकार्य करावं. कुतुहल असलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज मेडिटेशनचा वापर करा. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बिझनेस आणि राजकीय नेते नवी उंची गाठतील.
शुभ रंग : Sky Blue
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 6
दान : गरिबांना साखर दान करावी.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आई-वडिलांचे आणि शिक्षकांचे आशीर्वाद मिळालेले असल्यामुळे विद्यार्थी, राजकीय नेते, खेळाडू यांना आज मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या ज्ञानामुळे तुमचे वरिष्ठ इम्प्रेस होतील. खासकरून संगीतकार किंवा लेखकांनी आज घेतलेले सर्व निर्णय अनुकूल ठरतील. आज केलेल्या गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळेल. प्रेमात असलेल्यांनी आज आपल्या भावना खुल्या दिलाने व्यक्त करायला हव्यात. सरकारी अधिकाऱ्यांना सर्व डीलिंग्जमध्ये नशीब साथ देईल. दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या गुरूचं नाव घ्यायला आणि कपाळावर चंदन लावायला विसरू नका.
शुभ रंग : Orange
शुभ दिवस : गुरुवार
शुभ अंक : 3, 1
दान : महिला मदतनीसाला केशर दान करा.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज नातेसंबंधांत सावध राहा. कारण आज कदाचित फसवणूक होण्याची शक्यता आहे. आज पैसे मोठ्या प्रमाणावर येतील; मात्र नवी गुंतवणूक आजच्या दिवसापुरती तरी थांबवा. खासकरून राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रात असलेल्यांना आजचा दिवस प्रवासाकरिता अनुकूल नाही. बांधकाम किंवा स्टॉक मार्केट बिझनेसमध्ये थोडी मंदी जाणवेल; मात्र मेडिकल, कृषी आदी क्षेत्रांत सकारात्मक बदल दिसतील. विद्यार्थ्यांनी आपलं धोरण लिहून काढावं. त्याचा त्यांना ध्येयनिश्चितीसाठी उपयोग होईल. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्ती त्यांचं महिनाअखेरीचं टार्गेट पूर्ण करू शकतील. आज मांसाहार टाळावा.
शुभ रंग : Blue
शुभ दिवस : शनिवार
शुभ अंक : 9
दान : भिकाऱ्यांना ब्लँकेट दान करणं गरजेचं आहे.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज फ्रस्टेटेड वाटत असेल, तर भूतकाळातले सगळे पराजय किंवा नुकसान विसरा आणि पुढे चला. एक तेजस्वी दिवस तुमची वाट पाहतो आहे. पूर्वी केलेल्या कामांचे लाभ मिळण्याचा आणि दखल घेतली जाण्याचा दिवस. नवा मित्र आयुष्यात येईल. बँकर्स, अभिनेते आदींना नशिबाची खास साथ मिळेल. सेल्स आणि क्रीडा क्षेत्रात असलेल्यांना चपळाई अनुकूल ठरेल. विद्यार्थी आज त्यांच्या शैक्षणिक यशाचा आनंद घेतील.
शुभ रंग : Sea Green
शुभ दिवस : बुधवार
शुभ अंक : 5
दान : हिरव्या पालेभाज्या दान कराव्यात.
# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
वाद मिटवण्यासाठी, लक्झरी वस्तूंवर खर्च करण्यासाठी, घर आणि स्टॉक्स खरेदी करण्यासाठी, प्रवासासाठी, देण्यासाठी, टुर्नामेंट्स खेळण्यासाठी, ऑडिशन्स देण्यासाठी, चित्रपट साइन करण्यासाठी, प्रेझेंटेशन्ससाठी, मास मीडियासमोर जाण्यासाठी, विजय साजरा करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मुलांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी उत्तम दिवस. व्हिसासाठी वाट पाहत असलात, तर सकारात्मक घडामोडीमुळे सुरक्षित वाटेल. नव्या फॅक्टरीसाठी प्रॉपर्टीच्या शोधात असलेल्यांना चांगला पर्याय उपलब्ध होईल. अभिनेते, मीडिया क्षेत्रातल्या व्यक्ती यशाचा आनंद घेतील.
शुभ रंग : Teal
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : गरिबांना मिठाई दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कोणी तरी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करील; मात्र त्यात यशस्वी होणार नाही. ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे खेळ आणि शैक्षणिक क्षेत्रात विजय मिळेल. नातेसंबंध बहरतील. विरुद्धलिंगी व्यक्ती आज तुमच्यासाठी भाग्याच्या ठरतील. गुरुमंत्राचं पठण न चुकता करावं. मृदू शब्दांमुळे आज सर्व काही जिंकाल. राजकीय नेत्यांना पब्लिक मीटिंगला जाण्यासाठी, तसंच वरिष्ठांना इम्प्रेस करण्यासाठी सुंदर दिवस.
शुभ रंग : Orange
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 7
दान : मंदिरात कुंकू दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
दीर्घकालीन उद्दिष्ट आज सहजपणे गाठलं जाईल, खासकरून पैशांशी संबंधित. कौटुंबिक जीवनात सलोख्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. तुमचा संयम आणि उत्तम संवादकौशल्यामुळे दिवसाच्या अखेरीला तुम्हाला काही तरी बक्षीस मिळेल. उच्च पातळीचं ज्ञान मिळवण्यात अधिक वेळ व्यतीत कराल. सेमिनारमध्ये डॉक्टर्सना सन्मान मिळेल. पब्लिक फिगर्सना संध्याकाळपर्यंत आर्थिक लाभ मिळतील.
शुभ रंग : Sea Blue
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : भिकाऱ्यांना संत्री दान करा.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुमच्या कार्यशैलीमध्ये लवचिक राहा. दानधर्म करा. सरकारी ऑर्डर्स मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याकरिता उत्तम दिवस. विद्यार्थी आणि खेळाडूंनी डॉक्युमेंटेशनसाठी पुढाकार घ्यावा. अभिनेते, सीए, शिक्षक, खेळाडू, हॉटेलियर्स आदींना नशिबाची मोठी साथ मिळेल.
शुभ रंग : Red & Orange
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 3, 9
दान : मुलांना लाल पेन दान करा.
13 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : पीयूष गोयल, राजकुमार राव, दिशा पटानी, तरण आदर्श, राज रेड्डी
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.