Home /News /lifestyle /

Numerology : वाणी मृदू ठेवल्यास आज हवं ते साध्य कराल, अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य!

Numerology : वाणी मृदू ठेवल्यास आज हवं ते साध्य कराल, अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य!

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 12 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

    ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 12 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) रखडलेली सर्व कामं आज मार्गी लागतील. प्रॉपर्टी खरेदी किंवा वस्तू विक्रीचे व्यवहार सुरळीत पार पडतील. खेळामध्ये किंवा स्पर्धेत जिंकण्याची भरपूर शक्यता आहे. सोलार एनर्जी, ट्रेनिंग, क्रिएटिव्ह आर्ट, शिक्षण, शेती, साहित्य, औषधं आणि फायनान्स या क्षेत्रांमधल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. लहान मुलांना शिक्षक वा प्रशिक्षकांकडून कौतुकाची थाप मिळेल. आज दुपारच्या जेवणात पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे कुंडलीतल्या गुरूची ताकद वाढेल. शुभ रंग : Peach and Sky Blue शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 3 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना संत्री दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्हाला जिथे मार्गदर्शनाची गरज असेल, तिथे तुमचं अंतर्मनच तुम्हाला दिशा दाखवेल. खेळामध्ये विजय नक्की आहे, त्यामुळे कोणतीही स्पर्धा टाळू नका. कायदेशीर कमिटमेंट आरामात पार पडाल. एखादी अशी व्यक्ती भेटेल जिच्याबद्दल तुम्हाला भरपूर आदर वाटेल. महिलांनी वरिष्ठांशी जुळवून घेणं गरजेचं आहे. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तींना मोठं यश मिळेल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरात तेल किंवा दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचे वरिष्ठ आणि मार्गदर्शक आज तुमच्या कामावर खूश असतील. तुमचं ज्ञान आणि कौशल्य याची सर्वांवर छाप पडेल. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली बातमी मिळेल. संगीतकार, लेखक, अभिनेते, डान्सर आणि डिझायनर असलेल्या व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. या व्यक्तींनी आज घेतलेले सर्व निर्णय त्यांच्या फायद्याचे ठरतील. आज केलेली गुंतवणूक मोठा परतावा देईल. सरकारी अधिकाऱ्यांचं नशीब आज जोरावर राहील. दिवसाची सुरुवात करताना कपाळावर चंदनाचा टिळा लावणं उत्तम. दिवसभरात गुरूचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. शुभ रंग : Orange and blue शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया महिला मदतनीसाला केशर दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या आयुष्यात काही तरी नवीन घडणार आहे. एखादा नवीन जोडीदार मिळू शकतो किंवा एखादं नवं काम मिळू शकेल. आज केलेल्या कामाचं फळ भविष्यात मिळणार आहे हे लक्षात घ्या. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रांतल्या व्यक्तींसाठी आज प्रवास फायद्याचा ठरेल. बांधकाम किंवा शेअर मार्केट व्यवसायाला गती मिळेल. औषध आणि शेती क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडतील. विद्यार्थ्यांनी आपलं प्लॅनिंग कागदावर लिहून काढल्यास फायद्याचं ठरेल. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींचं टार्गेट पूर्ण होईल. कृपया आज मांसाहार टाळा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना अन्न दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे तुम्ही सर्वांचे लाडके आहात. आज तुमचे सर्व मित्र आणि कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. तुमच्या भूतकाळातल्या चांगल्या कामांबद्दल कौतुक आणि त्याचे फायदे आता तुम्हाला मिळतील. एखादा मित्र वा नातेवाईक तुमच्याकडे मदत मागेल. त्याला टाळू नका. बँक कर्मचारी, डिफेन्स ऑफिसर, मीडिया कर्मचारी आणि अभिनेते यांच्यासाठी भाग्याचा दिवस. सेल्स आणि खेळातल्या व्यक्तींना आज जलद कामं केल्याचा फायदा होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात यश मिळेल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया हिरव्या पालेभाज्या दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्हाला भरपूर प्रेम आणि आपुलकी मिळेल. प्रवासासाठी, प्रेझेंटेशन देण्यासाठी, समाजमाध्यमांसमोर बोलण्यासाठी, लहान मुलांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी किंवा पार्टी करण्यासाठी उत्तम दिवस. व्हिसाची वाट पाहत असाल, तर सकारात्मक बातमी मिळेल. नवीन फॅक्टरी उभारण्यासाठी प्रॉपर्टी शोधत असाल तर आज चांगला पर्याय मिळेल. अभिनेते आणि माध्यम क्षेत्रातल्या व्यक्तींना भरपूर यश मिळेल. पालकांना आपल्या पाल्यांचा अभिमान वाटेल. शुभ रंग : Blue and Pink शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना पांढरी मिठाई दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) बऱ्याच काळापासून तुम्ही नातेसंबंधांमध्ये त्रास सहन करत आहात, तर आज संवादातून वाद मिटवण्याची वेळ आहे. खेळ आणि शिक्षणामध्ये यश मिळवण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद कामी येतील. आज विरुद्धलिंगी व्यक्ती तुमच्यासाठी नशीबवान ठरू शकते. नातेसंबंध अधिक फुलण्यास वाव आहे. वाणी मृदू ठेवल्यास आज हवं ते साध्य कराल. राजकीय नेत्यांना वरिष्ठांवर छाप पाडण्यासाठी आणि लोकांना संबोधित करण्यासाठी उत्तम दिवस. गुरुमंत्राचा जप करणं फायद्याचं ठरेल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया गरिबांना लेमन राइस दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्यासाठी अगदी भाग्याचा दिवस आहे. प्रयत्नांपेक्षा नशिबावर आज सगळी मदार असणार आहे. दुपारच्या जेवणानंतर एखादी चांगली बातमी मिळेल. ज्ञानार्जनात आज दिवसाचा बराचसा वेळ जाईल. डॉक्टर, टेक कर्मचारी, कलाकार, पब्लिक स्पीकर्स आणि शिक्षकांचा एखाद्या सेमिनारमध्ये सत्कार होईल. पब्लिक फिगर किंवा मोटिव्हेटर असणाऱ्या व्यक्तींना संध्याकाळपर्यंत आर्थिक फायदा होईल. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना संत्री दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज अचानक मोठं यश वा धनलाभ संभवतो. मॉडेल आणि डिझायनर असणाऱ्या व्यक्तींना वेगानं प्रगती होताना दिसेल. सरकारी ऑर्डर घेण्यासाठी चांगला दिवस. खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटेशनशी संबधित कामं आज उरकून घ्यावीत. अभिनेते, सीए, शिक्षक, खेळाडू आणि हॉटेल व्यावसायिक यांच्यासाठी अगदीच भाग्याचा दिवस. उजव्या हाताच्या मनगटावर आजपासून लाल धागा बांधल्यास फायद्याचं ठरेल. शुभ रंग : Red & Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया घरगुती कामगारांना वा भिक्षेकऱ्यांना डाळिंबं दान करा. 12 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : अंजना ओम कश्यप, अभिनेता गोपीचंद, सलमान युसूफ खान, पद्मिनी, नरेंद्रसिंह तोमर
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Numerology

    पुढील बातम्या