मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Numerology: तुमची जन्मतारीखही सांगते भविष्यातील होणाऱ्या घटना; कसा असेल 3 जुलैचा दिवस? वाचा सविस्तर

Numerology: तुमची जन्मतारीखही सांगते भविष्यातील होणाऱ्या घटना; कसा असेल 3 जुलैचा दिवस? वाचा सविस्तर

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 3 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 3 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 3 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 3 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

जर तुम्हाला उत्कृष्ट संवादकौशल्य अवगत असेल, तर आजचा दिवस तुमचा आहे. स्पर्धेत उतरण्यापूर्वी तुमच्या प्रशिक्षकांचा सल्ला घ्या, आणि तो अंमलात आणा. खेळामध्ये जिंकण्याची भरपूर शक्यता आहे. प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री या दोन्हीसाठी आज अडचण येऊ शकते. आयटी, बांधकाम, शेती, साहित्य, औषध आणि फायनान्स व्यवसायांतील व्यक्तींना मोठा फायदा होईल. लहान मुलांचं शिक्षकांकडून कौतुक होईल. सूर्यदेवाचं आणि तुमच्या गुरूचं नामस्मरण केल्यास फायदा होईल.

शुभ रंग : Yellow

शुभ दिवस : रविवार

शुभ अंक : 1

दान : कृपया भिक्षेकऱ्यांना केळी दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज भरपूर मूड स्विंग्स होतील, त्यामुळे तुमच्या वाणीवर ताबा ठेवा. कायदेशीर कामं वेळेवर पूर्ण होतील. एखादी व्यक्ती तुमचा अपमान करण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध रहा. महिलांनी आपल्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तींशी जुळवून घ्यावं. सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी जुन्या ओळखी वापराल. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनिक होणं टाळा.

शुभ रंग : Cream

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 6

दान : कृपया मंदिरामध्ये दूध किंवा तेल दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमचं कौशल्य, ज्ञान आणि हुशारी दाखवण्यासाठी उत्तम दिवस. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. तुमची हुशारी आणि संवादकौशल्याची लोकांवर छाप पडेल. संगीतकार आणि लेखकांनी आज घेतलेले सर्व निर्णय फायद्याचे ठरतील. आज केलेली गुंतवणूक भरपूर फायदा देईल. सरकारी अधिकाऱ्यांना सर्व व्यवहारांमध्ये फायदा होईल. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी आज आपल्या भावना जोडीदाराकडे व्यक्त कराव्यात. दिवसाच्या सुरुवातीला कपाळावर चंदनाचा टिळा लावावा. दिवसभरात गुरूनामाचा जप केल्यास उत्तम.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : गुरूवार

शुभ अंक : 3 आणि 1

दान : कृपया महिला मदतनीसास केशर दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज वेळेचं उत्तम नियोजन करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व अपॉईंटमेंट्सचे वेळापत्रक नीट तयार करा. आज केलेल्या कामाचा भविष्यात फायदा होणार आहे हे लक्षात घ्या. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रांतील व्यक्तींनी आज प्रवास टाळावा. बांधकाम आणि शेअर मार्केट व्यवसायात मंदी जाणवेल. मेडिकल आणि शेती व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येतील. विद्यार्थ्यांनी आपली स्ट्रॅटजी कागदावर उतरवून काढल्यास फायदा होईल. मार्केटिंग क्षेत्रातील व्यक्तींचं टार्गेट पूर्ण होईल. आज मांसाहार टाळा.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शनिवार

शुभ अंक : 9

दान : कृपया भिक्षेकऱ्यांना चादर दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुमचा हसरा चेहरा सर्वांवर छाप पाडेल. तुमच्या परफॉर्मन्समुळे भरपूर प्रसिद्धी आणि फायदा मिळेल. एखादा मित्र किंवा नातेवाईक तुमची मदत मागू शकतो, त्याला टाळू नका. बँकिंग क्षेत्रात असलेल्या व्यक्तींसाठी विशेष भाग्याचा दिवस. सेल्स आणि खेळाशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी जलद हालचाल करणं फायद्याचं ठरेल. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल.

शुभ रंग : Sea Green

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : कृपया हिरव्या पालेभाज्या दान करा.

# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

प्रवास, प्रेझेंटेशन, जनसंवाद, सेलीब्रेशन अशा गोष्टींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. लहान मुलांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी चांगला दिवस. व्हिसा मिळण्याची वाट पाहत असाल, तर आज सकारात्मक बातमी मिळू शकते. नवीन फॅक्टरी उभारण्यासाठी जागा पाहत असाल तर आज चांगला पर्याय मिळेल. अभिनेते आणि मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना मोठं यश मिळेल.

शुभ रंग : Teal

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : कृपया गरिबांना मिठाई दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कायदेविषयक प्रकरणांमध्ये तुमची हुशारी दाखवण्याची गरज आहे. शिक्षण आणि खेळामध्ये यश मिळवण्यासाठी वडिलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद कामी येतील. विरुद्धलिंगी व्यक्ती तुमच्यासाठी नशीबवान ठरेल, नातेसंबंध अधिक बळकट होतील. आज तुमच्या संवादकौशल्यामुळे कित्येक कामं होऊन जातील. राजकारणी व्यक्तींसाठी सभेला उपस्थित राहणं फायद्याचं ठरेल, पक्षातील वरिष्ठांवर छाप पडेल. आज गुरुमंत्राचा जप करणं गरजेचं आहे.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : कृपया मंदिरामध्ये कुंकू दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

मोठे निर्णय घेताना थोडी तडजोड करण्याची तयारी ठेवा. यश मिळवण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल. दिवसाच्या शेवटी तुमच्या कामासाठी मोठं बक्षीस मिळेल. आजचा बराचसा वेळ ज्ञानार्जनात जाईल. डॉक्टरांनी आज सेमिनारला उपस्थित राहणं टाळू नये. पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तींना दिवसाच्या शेवटी आर्थिक फायदा होईल.

शुभ रंग : Sea Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : कृपया भिक्षेकऱ्यांना लिंबूवर्गीय फळं दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस हा भरपूर प्रगती आणि कौतुकाचा आहे. अचानक मोठं यश वा धनलाभ संभवतो. सरकारी ऑर्डर मिळवण्यासाठी उत्तम दिवस. खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसंबंधी कामं पूर्ण करून घ्यावीत. अभिनेते, सीए, शिक्षक, खेळाडू आणि हॉटेल व्यावसायिक यांच्यासाठी भाग्याचा दिवस.

शुभ रंग : Red and Orange

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 3 आणि 9

दान : कृपया घरगुती कामगारांना वा भिक्षेकऱ्यांना डाळिंब दान करा.

3 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज: भारती सिंग, हरभजनसिंग, तिग्मांशू धुलिया, अमित कुमार, कृतिका सेंगर, अदूर गोपालकृष्णन

Keywords : Numerology

सुदेश

First published:

Tags: Lifestyle, Numerology