'या' कारणामुळे भारतीय युवकांमध्ये धूम्रपान करण्याचं प्रमाण सर्वाधिक

एका अभ्यासात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, भारतात धूम्रपान करणाऱ्यांमध्ये युवकांचं प्रमाण सर्वाधिक आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 12:02 PM IST

'या' कारणामुळे भारतीय युवकांमध्ये धूम्रपान करण्याचं प्रमाण सर्वाधिक

मुंबई, 15 जुलै : एका अभ्यासात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, भारतात धूम्रपान करणाऱ्यांमध्ये युवकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. हे प्रमाण जवळपास 53 टक्के इतकं आहे आणि 20 ते 30 वयोगटाच्या युवकांचा त्यामध्ये समावेश आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना नैराश्य, टेन्शन, कामाचा तणाव या समस्यांना सामोरं जावं लागतं. आयुष्यात अनेक चढ-उतार होतच असतात. या समस्यांनाचा भार कमी करण्यासाठी अनेक जण अंमली पदार्थांचं सेवन, धूम्रपान अशा शरीराला हानिकारक गोष्टींचा अवलंब करायला सुरुवात करतात. काही काळाने त्याची सवय होऊन जाते आणि मग ते सोडणं अवघड होतं. खरं तर मानसिक ताणाला तात्पुरता विश्राम देण्यासाठी जरी याचं सेवन केलं जात असलं तरी ते आरोग्यासाठी हानिकारक आहे.

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करायचा असेल तर स्त्रियांनी लावून घ्यायला हवी 'ही' सवय

एका अभ्यासात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, भारतात धुम्रपान करणाऱ्यांमध्ये युवकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. हे प्रमाण जवळपास 53 टक्के इतकं आहे आणि 20 ते 30 वयोगटाच्या युवकांचा त्यामध्ये समावेश आहे. अनेकजण तणाव कमी करण्यासाठी धूम्रपान करतात. एका निरीक्षणामध्ये असं सांगण्यात आलं की, 15 ते 50 या वयोगटातल्या लोकांची तुलना करता प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला धूम्रपान करण्याचं व्यसन आढळलं.

53 टक्के धूम्रपान करण्याऱ्या काही टक्के युवकांना असं वाटतं की धूम्रपान केल्याने त्यांचा ताण कमी होतो. काहींना त्याच्या दुष्परिणामांची जाणीव असूनही ते सवयीमुळे धूम्रपान करतात. तर काही युवकांना ते सोडण्याची इच्छा आहे पण प्रयत्न करूनही सोडण्यात अपयशी ठरले. खरंतर अमली पदार्थ आणि धूम्रपान यांच्या सेवनामुळे व्यसन लागतं आणि ते सोडणं अवघड होतं. पण, त्याचे परिणाम काही गंभीर आजारांना निमंत्रण देतात. या आजारांमुळे थेट मृत्यूही ओढवू शकतो.

VIDEO : तुम्हाला खूप राग आला आहे? मग जा या 'भडास कॅफे'मध्ये !

Loading...

शिवाय World Health Organization (WHO) ने केलेल्या निरीक्षणामध्ये असं सांगितलं आहे की, धूम्रपान करणाऱ्या टक्क्यांमध्ये जगभरातून एकट्या भारताचं प्रमाण 12 टक्के आहे. युवकांमध्ये हे वाढतं प्रमाण एकूणच भविष्यासाठी हानिकारक आहे. कारण साहजिकच आजाराचं प्रमाणदेखील वाढणार आणि अशाने देशाच्या भविष्यावरही परिणाम होऊ शकतो.

SPECIAL REPORT : भक्तांची अलोट गर्दी जेव्हा अ‍ॅम्ब्युलन्सला वाट करून देते!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 12:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...