बायकोसाठी आपलं गाव सोडणाऱ्या नवऱ्यांची संख्या वाढतेय! 'हे' राज्य आहे आघाडीवर

बायकोसाठी आपलं गाव सोडणाऱ्या नवऱ्यांची संख्या वाढतेय! 'हे' राज्य आहे आघाडीवर

लग्न ठरलं, त्यामुळे आता गाव सोडून जावं लागणार हे सांगणाऱ्या स्त्रियाच असतात. पण आता चक्र उलट्या बाजूने पण फिरायला लागलं आहे. गेल्या दशकभरात लग्नामुळे स्थलांतर करणाऱ्या पुरुषांची संख्या दुप्पट झाली आहे. कुठल्या राज्यात हे प्रमाण जास्त आहे पाहा...

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : नवऱ्याची बदली झाली, म्हणून नोकरी सोडून गाव सोडून जाणाऱ्या स्त्रिया आपण आजपर्यंत पाहात आलो. लग्न ठरलं, त्यामुळे आता गाव सोडून जावं लागणार हे सांगणाऱ्याही स्त्रियाच असतात. पण आता चक्र उलट्या बाजूने पण फिरायला लागलं आहे. लग्न ठरलं म्हणून आता गाव सोडून तिच्या शहरी जातोय, असं सांगणारे पुरुष वाढायला लागले आहेत. बायकोच्या करिअरसाठी आपल्या नोकरीवर पाणी सोडायची भारतीय नवऱ्यांची तयारी आहे. लग्नामुळे स्थलांतर करणाऱ्या पुरुषांची संख्या वाढते आहे. बायकोच्या नोकरीच्या शहरात स्थलांतर करणार, अशी उदाहरणं वाढत आहेत. यासंदर्भातली आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली. या आकडेवारीनुसार गेल्या दशकभरात लग्नामुळे स्थलांतर करणाऱ्या पुरुषांची संख्या दुप्पट झाली आहे.

अजूनही स्त्रियांमध्ये स्थलांतराचे कारण 98 टक्के वेळा लग्न हेच आहे. पण पुरुषांमध्ये हे कारण गेल्या काही वर्षांत वाढू लागलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, लग्नामुळे स्थलांतर करणाऱ्या पुरुषांची सर्वाधिक संख्या मेघालयात आहे. त्यानंतर तामिळनाडूचा नंबर लागतो. स्थलांतराचं लग्न हे कारण सांगणारे सर्वांत कमी पुरुष आहेत राजस्थानात आणि मध्य प्रदेशात.

हे वाचा - 'हरभजन तुला लाज नाही वाटत', Chandrayaan-2च्या ट्वीटवर भडकले नेटिझन्स

स्थलांतर करण्याची वेळ स्त्रियांवर येते ती बहुतेक वेळा लग्नामुळे. स्थलांतर करणाऱ्या 98 टक्के स्त्रिया लग्नानंतर शहर सोडतात. त्यासाठी त्या प्रसंगी आपल्या करिअरवर पाणी सोडतात. नोकरीत बदली मिळाली तर ठीक, नाहीतर नोकरी सोडावी लागते, पण आता पुरुषही लग्नानंतर शहर बदलू लागले आहेत. तमिळनाडू, केरळ, पाँडेचरी या राज्यात बायकोसाठी शहर सोडून दुसरीकडे राहायला गेलेल्या पुरुषांची संख्या वाढली आहे. सर्वाधिक संख्या वाढली आहे मेघालयात. मिझोराममध्येही हा ट्रेंड दिसतोय. याउलट हरयाणा, उत्तराखंड, पंजाब, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये पुरुषांचं लग्नानंतरचं स्थलांतर फारसं वाढलेलं दिसत नाही.

अलिया-रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त नाही पण लेहंगा ठरला!

2001 आणि 2011 ची जनगणनेच्या माहितीची तुलना केल्यास त्यातल्या स्थलांतराचा अभ्यास केल्यास ही बाब लक्षात येते. या दहा वर्षांत दाक्षिणात्य राज्यांमध्ये विशेषतः शहरी भागात पुरुषांचं स्थलांतर वाढलं आहे.

फिटनेस टिप्स : प्रेग्नंसीनंतर अभिनेत्री सौम्या टंडननं असं केलं वजन कमी, पाहा फोटो

स्त्रियांच्या नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी जायला पुरुषांची आता ना नाही. लग्नानंतर स्त्रीच पुरुषाच्या गावी जाणार ही मानसिकता आता बदलायला लागली आहे, हेच या ट्रेंडमधून दिसून येईल. ज्याचा किंवा जिचा व्यवसाय मोठा किंवा सोयीचा त्याच्या किंवा तिच्या गावी जाणं हा प्रॅक्टिकल विचार येईल तो दिवस समानतेचा!

---------------------------------------------------------------------

VIDEO: विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारच ठरतोय जीवघेणा!

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 23, 2019, 4:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading