Sleeping naked : आरोग्यासाठी फायद्याचं आहे रात्री कपडे न घालताच झोपणं

Sleeping naked : आरोग्यासाठी फायद्याचं आहे रात्री कपडे न घालताच झोपणं

रात्री झोपताना सैलसर कपडे झोपून घालून झोपावे हे माहिती आहे, पण नग्नावस्थेत झोपल्यानं (Nude sleeping) काय फायदा होतो, हे तुम्हाला माहिती आहे का?

  • Last Updated: Dec 4, 2020 10:45 PM IST
  • Share this:

सामान्यपणे आपण सैल कपडे घालून झोपतो. मात्र खरंतर कपडे न घालताच झोपणं म्हणजे नग्नावस्थेत झोपण्याचे बरेच फायदे आहे. विशेषतः जेव्हा जोडीदारासोबत अशा अवस्थेत झोपतो तेव्हा त्याचे फायदे अधिक होतात. फक्त शारीरिक संबंध बनवतानाच नाही तर एरवीदेखील पार्टनरसह न्यूड होऊन झोपल्याने त्याचे आरोग्यावर चांगले परिणाम होतात असं एका संशोधना दिसून आलं आहे.

कोर्टिसॉल संप्रेरक पातळी संतुलित राहते

लंडनमध्ये झालेल्या संशोधनानुसार रात्री दोन वाजेनंतर शरीरात कोर्टिसॉलची पातळी लक्षणीय वाढते, मात्र आपल्या जोडीदाराबरोबर नग्न झोपल्यास शरीरातील कॉर्टिसॉलची पातळी नियंत्रित राहते. रात्री कपड्यांशिवाय झोपल्यानं कॉर्टिसॉल स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते, जास्त चरबी पोटात साठवली जात नाही आणि शरीरातील कोलेस्टेरॉल देखील नियंत्रित होतं.

परिपूर्ण झोपेसह शरीराचं तापमान संतुलित राहतं

जोडीदारासह नग्न झोपण्यामुळे शरीराचं तापमानही नियंत्रणात राहतं. रात्रीच्या वेळी शरीराचं तापमान नियंत्रित राहिल्यानं बरेच शारीरिक विकार दूर होतात. याशिवाय जोडपे अशा अवस्थेत झोपल्यामुळे झोपदेखील चांगली लागते आणि झोपेच्या समस्या देखील दूर होतात. म्हणून नग्न झोपणं शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी आणि पूरक झोपेसाठी फायदेशीर आहे. संशोधन अहवालानुसार असंही दिसून आलं आहे की असे लोक अधिक निरोगी राहतात आणि त्यांच्यात तणावही कमी असतो.

लैंगिक जीवन देखील चांगलं राहतं

नग्न झोपण्यामुळे जोडीदारासह लैंगिक जीवन देखील चांगले राहते. परस्पर समंजसपणामुळे कौटुंबिक जीवन देखील यशस्वी होतं. नग्न झोपण्यामुळे त्वचेचा त्वचेशी स्पर्श होऊन शरीरात ऑक्सिटोसिनची पातळी वाढते ज्यामुळे पूर्वीपेक्षा शारीरिक संबंध सुधारतात.

मधुमेहाचा धोका कमी होतो

जे लोक नग्न झोपतात त्यांच्या शरीरात मधुमेहाचा धोका कमी होतो. त्याच वेळी बेडरूमचं तापमान लठ्ठपणावर देखील परिणाम करतं. निर्वस्त्र झोपण्यामुळे ओव्हर हिटिंगची समस्या देखील रोखली जाऊ शकते.

सौंदर्य वाढतं आणि तारुण्य टिकतं

आपण अधिक सुंदर आणि तरुण होऊ इच्छित असल्यास झोपेच्या वेळी कधीही कपडे घालू नका. जर जोडीदाराबरोबर नग्न अवस्थेत झोपाल तर सौंदर्य नेहमीच कायम राहील. आपण म्हातारे झाल्यावरही आपल्याला तरुण असल्यासारखे वाटेल. याशिवाय दिवसभर काम करून झोपायच्या आत त्याचा थकवा कमी व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा परिस्थितीत लोक चांगल्या झोपेचीही अपेक्षा करतात. तुम्हालाही प्रत्येक प्रकारे थकवा आणि तणाव कमी करायचा असेल तर नग्न झोपणं अधिक फायदेशीर आहे.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख – झोपेचा अभाव: लक्षणे, कारणे, उपचार ...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीयमाहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com य

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 4, 2020, 10:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading