मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आता BIG B अमिताभ बच्चन यांचा आवाज जाणार; मोबाइलवर ऐकायला येणार नवी Caller tune

आता BIG B अमिताभ बच्चन यांचा आवाज जाणार; मोबाइलवर ऐकायला येणार नवी Caller tune

बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आवाजातली ही ‘कोरोना’ कॉलर ट्यून (Caller tune) ऐकून आपल्यापैकी अनेकांना कंटाळा आला आहे. काही जण वैतागलेही आहेत.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 14 जानेवारी : 'नमस्कार आज हमारा पूरा देश और विश्व कोरोनाकी चुनौती का सामना कर रहा हैं....', कोणालाही फोन लावला की सर्वात आधी हा आवाज आपल्याला ऐकायला येतो. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आवाजातली ही ‘कोरोना’ कॉलर ट्यून (Caller tune) ऐकून आपल्यापैकी अनेकांना कंटाळा आला आहे. दरम्यान आता उद्यापासून तुम्हाला ही कॉलर ट्यून ऐकायला मिळणार नाही. कारण सरकारनं आता त्याऐवजी नवी कॉलर ट्यून आणली आहे. कोरोनाच्या जनजागृतीऐवजी आता कोरोना लसीकरणासंबंधित कॉलर ट्यून ऐकायला मिळणार आहे, अशी एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 ला मिळाली आहे. 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण होणार आहे. त्यामुळे आता लसीकरणासंबंधी कॉलर ट्यून ऐकायला मिळेल. कोरोना जेव्हा सुरू झाला तेव्हा नागरिकांना कोरोनाच्या नियमांबद्दल माहिती मिळावी यासाठी कोरोनासंबंधी कॉलर ट्यून सुरू करण्यात आली होती. पण आता कोरोना येऊन 10 महिने उलटून गेले आहेत तरीही ही कॉलर ट्यून सरकारकडून बंद करण्यात आली नाही. रोज एकच कॉलर ट्यून ऐकून लोक वैतागले होते. हे वाचा - Corona vaccine हवी आहे, त्याआधी तुम्हाला 7 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या कॉलर ट्यूनवर अनेक जोक्सही व्हायरल झाले. शिवाय कॉलर ट्यूनविरोधात दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. कोरोना कॉलर ट्यूनविरोधात याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीचं नाव समजू शकलेलं नाही. एनएनआय वृत्तसंस्थेने या जनहित याचिकेबद्दल ट्विटरवरून माहिती दिली होती. हे वाचा - COVID-19 Vaccine: बाजारात नाही मिळणार कोरोना लस, NITI आयोगाचं स्पष्टीकरण काही दिवसांपूर्वी एका वैतागलेल्या नेटकऱ्याने थेट अमिताभ बच्चन यांना ट्विटवर प्रश्न विचारला होता की, ही कॉलरट्यून नक्की कधी बंद केली जाणार आहे. अमिताभ बच्चन यांनी विनम्रपणे त्या व्यक्तीला सांगितलं, ‘माझं काम फक्त व्हॉइस ओव्हर देण्याचं असतं.  कोणतीही जाहिरात किंवा कॉलरट्यून कधी सुरू करायची आणि कधी बंद करायची याचा निर्णय माझ्या हातात नसतो. तुम्हाला होण्याऱ्या त्रासाबद्दल मी तुमची माफी मागतो.’
First published:

Tags: Corona, Mobile

पुढील बातम्या