मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Stop Forgetting The Umbrella : अरे यार, पुन्हा छत्री विसरली! 'या' ट्रिक्स वापरा आणि छत्री विसरण्याचं टेन्शन दूर करा 

Stop Forgetting The Umbrella : अरे यार, पुन्हा छत्री विसरली! 'या' ट्रिक्स वापरा आणि छत्री विसरण्याचं टेन्शन दूर करा 

छत्री आणि पाऊस

छत्री आणि पाऊस

पावसाळ्यात बऱ्याचदा आपल्याकडून छत्री विसरते (Stop forgetting the umbrella). तर आपली छत्री विसरली जाऊ नये, यासाठी 4 महत्त्वाच्या ट्रिक्स फार महत्त्वाच्या आहेत. त्या अंमलात आणल्या की, छत्री तुमची कधीच विसरली जाणार नाही.

  पावसाळा सुरू झाला की, सर्वांत पहिल्यांदा आठवते ती म्हणजे छत्री (umbrellas). बाहेर पाऊस सुरू असला की, छत्री घेऊन जायचं आपल्या लक्षात येतं. नेमकं बाहेर गेल्यानंतर पाऊस थांबतो आणि आपण छत्री मिटवून ठेवतो. पण, एखाद्या दुकानात, हाॅटेलमध्ये... गेल्यानंतर मिटवून ठेवलेली छत्री दुकानाबाहेर ठेवतो. पण, दुकानातून बाहेर पडताना नेमकी छत्रीच विसरते (forgetting the umbrella). नंतर लक्षात येते की, छत्री हरवली ते. पावसाळ्यात बहुतेकदा छत्री विसरली जाते किंवा हरवली जाते. कारण, छत्री लक्षातच राहत नाही. त्यामुळे पावसाळ्यात छत्री विसरण्याचं प्रमाण जास्त आहे. तर, छत्री विसरू नये, यासाठी 4 महत्त्वाच्या ट्रिक्स आहे. त्या कोणत्या, ते आपण थोडक्यात पाहुया... (Now stop forgetting the umbrella)

  छत्री नेण्याची मानसिकता तयार करा

  आपण छत्री आणलेली आणि ती न विसरता आपल्याला घेऊन जायची आहे, ही मानसिक तयार करायला हवी. ही मानसिकता तयार करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. ती म्हणजे कल्पना करायची की, बाहेर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आपल्या दारात छत्री मिटवून ठेवली आहे, असं सतत आपल्या बुद्धीला सांगा. त्यामुळे बाहेर जाताना छत्री घेऊन जायची आहे, ही सूचना मेंदूमध्ये तयार होते. नंतर त्याची सवय तुमच्या मेंदूला लागते. त्यामुळे बाहेर पडताना तुमचा मेंदू आपोआप तुम्हाला छत्री आठवणीने घेऊन जाण्याची सूचना देतो.

  महागडी छत्री खरेदी करा

  छत्री अशी वस्तू आहे की, ती पावसाळा सुरू झाल्यानंतरच आठवते. पावसाळा सुरू झाला की, आपण बाजारातून छत्री खरेदी करतो. पण, खरेदी करताना 4 महिनेच पावसाळा आहे, कुठं महाग छत्री विकत घ्यायची. नंतर त्याचा काही उपयोग नाही, या विचारातून तुम्ही स्वस्तातली छत्री विकत घेता. त्यामुळे होतं काय की, छत्रीला तितकं महत्त्व आपण देत नाही. बाहेर कुठं गेलो की, सहजपणे छत्री विसरली जाते. जेव्हा तुम्ही महागडी छत्री विकत घेता, तेव्हा त्याच्या किमतीचा प्रभाव तुमच्या मनावर पडलेला असतो. त्यामुळे त्याच्यासाठी मोजलेले पैसे तुमच्या लक्षात राहतात, सहाजिक छत्रीदेखील लक्षात राहते. त्यामुळे छत्री विसरली की, मोठा तोटा होऊ शकतो, या भीतीनेच माणूस छत्री विसरत नाही. वाचा : जोडीदाराकडून अशा अपेक्षा ठेवत असाल तर चुकताय तुम्ही; आनंदी राहण्याच्या सोप्या टिप्स

  दोन वस्तुंचा परस्परसंबंध लावा

  घरात वावरत असताना आपण मोबाईल आणि चार्जर, दरवाजा आणि कुलूप, गॅस आणि शेगडी या वस्तुंचा जसा संबंध लावतो, तसा संबंध घराबाहेर पडता मुसळधार पावसाचा आणि छत्री लावा. गॅस आठवणीने बंद केलाय का? मोबाईल चार्जर ठेवण्याची जागा फिक्स केलीय का? दरवाजा बंद करताना कुलूप घातलं आहे का? हे जसं आपण पुन्हा पुन्हा तपासून घेत असतो, अगदी तसंच बाहेर पडताना आपण मुसळधार पावसात भिजू, त्यापेक्षा छत्री घेऊन बाहेर पडलेले बरं... असा संबंध पाऊस आणि छत्रीचा लावा. तुमची छत्री कधीच विसरली जाणार नाही. वाचा : पावसाळ्यात जीवघेण्या विजा आणि वादळापासून असे करा स्वतःचे रक्षण, फॉलो करा या टिप्स

  छत्री ठेवण्याची जागा फिक्स करा

  आपल्या घरात प्रत्येक वस्तुची एक जागा फिक्स केलेली असते. त्याच ठिकाणी ती वस्तू ठेवायची, कारण ऐनवेळाला ती वस्तू आपल्या तिथेच सापडते. उदा - गाड्यांच्या, कुलुपांच्या चाव्या ठेवण्याची जागा, दाराबाहेर चपला स्टॅण्डमध्ये ठेवण्याची जागा, अगदी त्याप्रमाणे छत्री ठेवण्याची जागादेखील लक्षात ठेवा. याचं कारण, असं की बाहेर पडताना आपल्याला छत्री हवी असेल, तर  चटकन छत्रीचं ठिकाण आपल्याला आठवतं. छत्रीचं ठिकाण आपल्या लक्षात राहिलेलं असतं. तर या ट्रिक्स वापरल्या की, तुमची छत्री कुठंच विसरली जाणार नाही, हे नक्की!
  Published by:Arjun Nalavade
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Monsoon, Rain

  पुढील बातम्या