Home /News /lifestyle /

आता लेदर सुद्धा शाकाहारी, मशरुम्सपासून बनवले खास चामडं!

आता लेदर सुद्धा शाकाहारी, मशरुम्सपासून बनवले खास चामडं!

आता या पुढे जाऊन शास्त्रज्ञांनी प्राण्यांच्या चामड्याला एक संपूर्ण शाकाहारी पर्याय (veagn Option) निर्माण करण्यात यश मिळवलं आहे

आता या पुढे जाऊन शास्त्रज्ञांनी प्राण्यांच्या चामड्याला एक संपूर्ण शाकाहारी पर्याय (veagn Option) निर्माण करण्यात यश मिळवलं आहे

आता या पुढे जाऊन शास्त्रज्ञांनी प्राण्यांच्या चामड्याला एक संपूर्ण शाकाहारी पर्याय (veagn Option) निर्माण करण्यात यश मिळवलं आहे.

    मुंबई, 06 डिसेंबर : माणसाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून जेव्हा तो जंगलात रहात होता, तेव्हापासून शिकार करून प्राण्याचे मांस खाण्यासह वस्त्र म्हणून प्राण्यांच्या कातडीचा (Leather) वापर माणूस करत होता. नंतर कालानुरूप त्यात बदल होत गेला. तरीही आजही वस्त्रप्रावरणांच्या दुनियेत प्राण्यांच्या कातड्यापासून बनलेल्या कपडयांची एक वेगळीच क्रेझ आहे. दुर्मीळ प्राण्यांच्या कातड्यापासून बनलेल्या कपड्यांसाठी कोट्यवधी रुपये मोजायला लोक तयार असतात. हरिण, मेंढी, सील, मगर इत्यादी प्राण्यांच्या कातड्यापासून कपडे (Clothing) बनवले जातात.यामुळे दरवर्षी हजारो प्राण्यांची (Animals) हत्या होते. प्राण्यांच्या अनियंत्रित शिकारीमुळे निसर्गाचं संतुलन बिघडू लागल्यानं, त्यावर कायदेशीर बंदीही घालण्यात आली मात्र तरीही बेकायदेशीररीत्या प्राण्यांची शिकार होतच असते. त्यात प्लॅस्टिकचा (Plastic) वापर करून कातडे बनवण्यातही यश आलं आहे, मात्र तेदेखील पर्यावरणासाठी धोकादायक आहे. आता या पुढे जाऊन शास्त्रज्ञांनी प्राण्यांच्या चामड्याला एक संपूर्ण शाकाहारी पर्याय (veagn Option) निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. चक्क मशरुम्स म्हणजे कुत्र्याच्या छत्रीपासून (Mushrooms) चामडं (Leather) बनवण्यात आलं आहे. अलीकडच्या काळात प्राणीजन्य कोणत्याही पदार्थांचा वस्तूंचा वापर न करण्याचा वसा लोक जोपासत आहेत. त्यांना वेगन असे म्हटलं जातं. त्यांची संख्या वाढती असल्यानं त्यांच्याकरता त्यांच्या अपेक्षेनुसार वस्तू, पदार्थ उपलब्ध करणारी बाजारपेठ विस्तारत आहे. त्यामुळे आता तंत्रज्ञानाच्या आधारे पर्यावरणपूरक आणि नैतिकदृष्ट्या अनुकूल असे चामडे बनवले जात आहे. मेल ऑनलाइनच्या अहवालानुसार, सॅन फ्रान्सिस्कोमधील (Sanfrancisco) बायोमटेरियल कंपनी मायकोवर्क्सने (MycoWorks ) हे चामडे बनवले असून, प्राण्यांपासून बनवलेल्या चामड्यापेक्षा ते अधिक पर्यावरणपूरक आहे. शास्त्रज्ञांनी विकसित केलेले हे शाकाहारी चामडे केवळ एक पर्याय म्हणून काम करत नाही तर ते अगदी प्राण्यांच्या चामड्यासारखे दिसते. या कातड्यात आणि वासराच्या किंवा मेंढीच्या कातड्यात फरक जाणवू नये यासाठी पारंपरिक पद्धतीनं चामड्याचा व्यवसाय करणाऱ्या कारागिरांबरोबर कंपनी काम करत आहे. यामुळे प्राणी आणि पर्यायाने पृथ्वीचेच संरक्षण होण्यास मदत मिळणार आहे. BREAKING : लहान मुलांना नसणार कोरोना लस, NTAGI कडून रेड सिग्नल! गेल्या दशकभरात, युनायटेड स्टेट्स अर्थात अमेरिका, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियामधील अनेक कंपन्यांनी प्राण्यांचे कातडे आणि प्लास्टिकपासून बनलेले कातडे या दोन्हीसाठी नैतिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ पर्याय म्हणून मश्रूमपासून बनवलेल्या कातड्याचा प्रसार करण्यावर भर दिला आहे. मश्रूमपासून बनवलेले हे कातडे मायसेलियमपासून (Mycelium)बनलेले आहे. भूसा ते शेतमाल कचरा यांसारख्या कोणत्याही सेंद्रिय सामग्रीवर काही आठवड्यांतच या कातडीची वाढ होऊ शकते. शिवाय, मायसेलियमपासून बनवलेले हे कातडे अधिक विघटनशील आहे. यामुळे दररोज बदलणाऱ्या फॅशनचा पर्यावरणावर पडणारा हानिकारक परिणाम यामुळे रोखण्यास मदत होणार आहे. अर्थात, सध्या या चामड्याचा उद्योग अगदी प्राथमिक अवस्थेत असून मोठ्या प्रमाणावर त्याची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मायसेलियमपासून बनवण्यात आलेली हर्म्सची हँडबॅग नुकतीच एका फॅशनशोमध्ये सादर करण्यात आली, असं गार्डियन आपल्या वृत्तात म्हटलं आहे. प्राण्यांच्या चामड्याप्रमाणेच यालाही भावनिक प्रतिसाद मिळू शकतो, असं मायकोवर्क्सचे सीईओ डॉ. मॅट स्कलिन (Dr Matt Scullin ) यांनी सांगितले. ST Bus Strike : लालपरी पुन्हा धावू लागली, 19 हजार कर्मचारी कामावर परतले! नवीन सापडलेल्या मटेरिअलचा वापर फॅशनसह (fashion) कार अपहोल्स्ट्रीपर्यंत असंख्य बाबतीत करता येणे शक्य आहे, मात्र जैव-शास्त्रज्ञांच्या मते, या अशाप्रकारच्या कातड्याचा अविचारी निर्मिती पर्यावरणाला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे कच्च्या मालाबरोबरच अन्य साहित्यदेखील बायोडिग्रेडेबल असावे असे शास्त्रज्ञांचा सल्ला आहे.
    First published:

    पुढील बातम्या