मुंबई, 03 डिसेंबर : कॉफी पिणे (Drink Coffee) लोकांना खूप आवडते. कॉफी सेवन लोक वेगवेगळ्या पद्धती करतात. बऱ्याचदा, थकवा, वजन कमी करण्यासाठी कॉफी वापरली जाते. आजच्या काळात लोक चहापेक्षा जास्त कॉफी घेतात. तुम्हीही हजारो वेळा कॉफी प्यायली असेल मात्र आपण कॉफीच्या पीठाबद्दल कधी ऐकलं नसेल. कॉफीच्या पीठामध्ये ग्लुटिन नसते. कॉफी (Coffee) मिळवण्यासाठी त्याच्या झाडापासून चेरी तोडली जातात आणि त्यातून कॉफी काढून चेरी फेकले जातात.
चेरी ज्या फेकल्या जातात, त्यापासून कॉफीचे पीठ (Coffee Flour) बनविले जाते. कॉफी बनविल्यानंतर चेरी शिल्लक राहतात, त्यांना सुकवून कॉफी पीठ तयार केलं जातं. विशेष गोष्ट म्हणजे कॉफ़ी पीठाती चव कॉफीसारखी अजिबात नाही. या पिठाची चव काही फळांसारखी असते.
कॉफ़ी पीठाच्या 1 चमच्यात 34 कॅलरीज, 310 मिलीग्राम पोटॅशियम, 1.8 मिलीग्राम सोडियम असते. हे पोषक घटक देखील शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करतात. कॉफी पीठाच्या काही विशेष फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
कॉफी पीठाचे फायदे
वजन कमी करणाऱ्यांसाठी कॉफी पीठ खूप फायदेशीर आहे. कॉफ़ी पीठामध्ये फॅट कमी आहेत, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. जर आपण बदाम आणि नारळाचे पीठ कॉपी पीठासोबत वापरत असाल तर त्याचे फायदे अजून वाढतात. यामुळे वजन चांगलेच कमी होते.
हे वाचा - Health Tips: तुम्हाला माहीत आहे का? या गोष्टी शिजवून खाणं आरोग्यासाठी असतं अपायकारक
कॉफीच्या पीठामध्ये डाइट्री फायबर असते ज्यामुळे पचनास भरपूर मदत मिळते. कॉफी पीठात सुमारे 5.2 ग्रॅम फायबर असतात. ज्यामुळे हळूहळू अन्न पचण्यास मदत होते. ज्यामुळे आपल्याला लगेच भूक लागत नाही त्यामुळे आपण कमी खातो. त्यामुळे वजन कमी राहण्यास मदत मिळते.
हे वाचा - Health news: भाजलेले हरभरे खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वजन कमी करण्यासह पुरुषांचा वाढतो स्टॅमिना
- कॉफीच्या पीठामध्ये पोटॅशियम देखील आढळते, जे एक महत्वाचे मायक्रोंटिएंट आहे. हे शरीरात इलेक्ट्रोलाइट संतुलित करण्यास मदत करते. हे सेल्स सामान्य ठेवण्यासाठी कार्य करते.
- कॉफ़ी पीठामध्ये पुरेसे अँटिऑक्सिडेंट असतात, त्यामुळे रोगप्रतिकार यंत्रणेला मजबूत करण्यास मदत मिळते. यामुळे आपल्या शरीरातील मुक्त रॅडिकल्स नष्ट होऊन प्रतिकारक शक्ती मजबूत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coffee, Health Tips