मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आता मुलं ठरवणार स्वत:चं आडनाव, या देशात नावावरुन ठरणार नवा कायदा!

आता मुलं ठरवणार स्वत:चं आडनाव, या देशात नावावरुन ठरणार नवा कायदा!

आउटडोर एक्टिविटी करा - 
मुलांना त्यांची सामाजिक कौशल्ये विकसित करण्यासाठी उद्यानात फिरायला घेऊन जा. यामुळे मुले नवीन मित्र बनवतील, लोकांशी संवाद साधायला आणि निसर्गाच्या सान्निध्यात जायला शिकतात. तसेच मुलं त्यातून अनेक नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची मानसिक वाढ वेगाने होऊ लागते. फक्त घरात राहणं किंवा एकटेच खेळणे नेहमी योग्य नाही.

आउटडोर एक्टिविटी करा - मुलांना त्यांची सामाजिक कौशल्ये विकसित करण्यासाठी उद्यानात फिरायला घेऊन जा. यामुळे मुले नवीन मित्र बनवतील, लोकांशी संवाद साधायला आणि निसर्गाच्या सान्निध्यात जायला शिकतात. तसेच मुलं त्यातून अनेक नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची मानसिक वाढ वेगाने होऊ लागते. फक्त घरात राहणं किंवा एकटेच खेळणे नेहमी योग्य नाही.

लग्नानंतर मुलीचं नाव बदललं जायचं. तसेच तिला माहेरचे नाही, तर सासरचे आडनाव लावावं लागत. आडनाव बदलून नवीन ओळख स्वीकारणं फार कठीण जातं. पण आता काळ बदलत चालला आहे. अनेक मुली लग्नानंतर आपलं आडनाव बदलत नसून आपलं आधीचंच नाव कायम ठेवत आहेत.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 21 डिसेंबर : नावात (Name) काय आहे, असं महान नाटककार शेक्सपिअरने म्हटलं होतं. पण, नाव ही प्रत्येकाची जन्मापासून मिळालेली ओळख असते. आपल्याकडे लग्नानंतर मुलीचे नाव आणि आडनाव (Surname) बदलण्याची प्रथा जुनी आहे. लग्नानंतर मुलीचं नाव बदललं जायचं. तसेच तिला माहेरचे नाही, तर सासरचे आडनाव लावावं लागत.

    आडनाव बदलून नवीन ओळख स्वीकारणं फार कठीण जातं. पण आता काळ बदलत चालला आहे. अनेक मुली लग्नानंतर आपलं आडनाव बदलत नसून आपलं आधीचंच नाव कायम ठेवत आहेत. पण, अजूनही महिलला माहेरचे अडनाव घेत वंश पुढे (Children can pick their surname) नेण्याचा अधिकार नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर, लग्नानंतर जन्मलेले मुलं हे वडिलांचं (Children Take Father’s Surname) आडनाव लावतं. ही रीत चालत आलेली आहे. जगभरात याबाबत साम्य पाहायला मिळते. पण आता फ्रान्स देश याला अपवाद ठरणार आहे. फ्रान्समध्ये (France Name Law) नागरिकांना अगदी सोप्या पद्धतीने स्वतःचे आडनाव निवडण्याचा अधिकार दिला जाणार आहे.

    फ्रान्समधील नव्या कायद्याने मुलांना आईचं आडनाव लावायचा हक्क दिला आहे. आपल्या आई-वडिलांपैकी कुणाचं आडनाव लावायचं, हे पूर्णपणे मुलांवर अवलंबून असणार आहे. फ्रान्सचे न्याय मंत्री डुपोंड मोरेटी यांनी या संदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार, मुलं 18 वर्षांची झाल्यानंतर ती आपलं आडनाव निवडू शकतात.

    फ्रान्समध्ये सत्तेत असलेल्या LREM पक्षाचे सदस्य पॅट्रीत विग्नल यांनी हा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार कायदेशीर वयोमर्यादा पूर्ण केल्यानंतर मुलांना आपलं आडनाव बदलण्याचे स्वातंत्र्य मिळेल. तसंच आपण आडनाव का बदलत आहोत, याचं कोणतेही कारण देण्याची गरज नसणार आहे. या प्रस्तावावर येत्या काही दिवसांत मतदान होणार आहे. बहुमत मिळाल्यास फ्रान्समधील कोणतीही व्यक्ती आपले आडनाव बदलू शकेल. वडिलांच्या वागणूकीमुळे असमाधानी असलेल्या मुलांना याचा जास्त फायदा होईल, ते आपल्या आईचे नाव वापरू शकतील.

    हे ही वाचा-कटू सत्य! शिक्षिका असताना होती गरीब, प्रोफेशन बदलल्यावर झाली गडगंज

    विशेष बाब म्हणजे, फ्रान्समध्ये नागरिकांना आपलं आडनाव बदलण्याचं स्वातंत्र्य या आधीपासून आहेच मात्र, आडनाव बदलण्याची ही प्रकिया फारच किचकट आहे. आपण आडनाव का बदलत आहोत, याची वैध कारणं ही कायदा मंत्रालयाला द्यावी लागतात. पण, आता नव्या कायद्यानुसार ही प्रक्रिया खूप सोपी होणार आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, एकल मातेने ज्या मुलांचं पालनपोषण केले आहे अशा मुलांना आपल्या आईचे नाव लावण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे.

    First published:
    top videos

      Tags: France, Viral news