मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /मेंदूसंबंधीच्या आजारांवरील उपचार आता आणखी सुरक्षित; चिरफाड न करता होणार अनोखी 'शस्त्रक्रिया'

मेंदूसंबंधीच्या आजारांवरील उपचार आता आणखी सुरक्षित; चिरफाड न करता होणार अनोखी 'शस्त्रक्रिया'

वैज्ञानिकांनी आता अवघड शस्त्रक्रियेशिवाय मेंदूवरील उपचार (Brain treatment) करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे कोणतीही चिरफाड न करता न्यूरॉलॉजिकल आजारांवर (Neurological Diseases) उपचार करता येणार आहेत.

वैज्ञानिकांनी आता अवघड शस्त्रक्रियेशिवाय मेंदूवरील उपचार (Brain treatment) करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे कोणतीही चिरफाड न करता न्यूरॉलॉजिकल आजारांवर (Neurological Diseases) उपचार करता येणार आहेत.

वैज्ञानिकांनी आता अवघड शस्त्रक्रियेशिवाय मेंदूवरील उपचार (Brain treatment) करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे कोणतीही चिरफाड न करता न्यूरॉलॉजिकल आजारांवर (Neurological Diseases) उपचार करता येणार आहेत.

  नवी दिल्ली 07 डिसेंबर : शस्त्रक्रिया म्हटलं की जोखीम आलीच. त्यात हृदय किंवा मेंदूची शस्त्रक्रिया असेल तर ही जोखीम आणखी वाढते. कारण एका छोट्याशा चुकीमुळे यात रुग्णाचा जीव जाऊ शकतो. मेंदूची शस्त्रक्रिया (Brain Surgery) ही अत्यंत अवघड आणि धोकादायक असल्यामुळे ती टाळण्याकडे लोकांचा कल असतो. यामुळे बऱ्याच वेळा मेंदूच्या आजारांवरील उपचारही टाळले जातात. पण वैज्ञानिकांनी आता अवघड शस्त्रक्रियेशिवाय मेंदूवरील उपचार (Brain treatment) करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे कोणतीही चिरफाड न करता न्यूरॉलॉजिकल आजारांवर (Neurological Diseases) उपचार करता येणार आहेत.

  अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठाच्या (University of Virginia) स्कूल ऑफ मेडिसिनने (School of Medicine) याबाबत संशोधन केले आहे. हे संशोधन जर्नल ऑफ न्यूरो सर्जरीमध्ये (Journal of Neurosurgeries) प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान जर ऑपरेशन थिएटरमध्ये यशस्वीपणे स्वीकारता आलं, तर न्यूरोसंबंधी कॉम्प्लेक्स डिसीजेसच्या उपचारांमधील (Neuro Complex disorders) हा क्रांतीकारी शोध ठरेल. फीट येणे (Epilepsy), मूव्हमेंट डिसऑर्डर (Movement Disorder) यासोबतच अन्य कित्येक आजारांवर या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचार करणं शक्य आहे.

  हेही वाचा - तुम्ही कधी पहिल्याच नजरेत कुणाच्या प्रेमात पडला? जाणून घ्या शास्त्रीय कारण...

  कसं काम करतं हे तंत्रज्ञान

  यामध्ये मायक्रोबबल्स (Microbubbles) आणि कमी तीव्रतेच्या अल्ट्रासाउंड वेव्हचा (Low intensity ultrasound waves) वापर करण्यात आला आहे. हे दोन्ही मिळून थोड्या वेळासाठी मेंदूला असणारे नैसर्गिक सुरक्षा कवच भेदून पुढे जातात. यामुळे न्यूरोटॉक्झिन्सना (Neurotoxins) आवश्यक त्या ठिकाणी पोहोचवता येते. हे न्यूरोटॉक्सिन्स खराब झालेल्या किंवा निकामी असलेल्या ब्रेन सेल्सना नष्ट करते. या सर्व प्रक्रियेत हेल्दी सेल्सचे किंवा ब्रेन स्ट्रक्चरचे कसलेही नुकसान होत नाही.

  या तंत्रज्ञानासाठी एमआरआयची मदत घेण्यात आली. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंगमुळे कवटीच्या आत विशिष्ट ठिकाणी साउंड वेव्ह पोहोचवण्यास मदत होते. यामुळे ज्या भागात उपचारांची गरज आहे, त्याच भागातील ब्लड-ब्रेन बॅरिअरची नैसर्गिक सुरक्षा भेदणं शक्य होतं. मेंदूला नुकसान पोहोचवू शकणाऱ्या सेल्सना आणि मॉलिक्यूल्सना बाहेर ठेवण्याचे काम हे सुरक्षा कवच करत असतं.

  हेही वाचा - Health News : प्लास्टिकमुळे गंभीर हृदयविकार होऊ शकतात, नवीन संशोधनातील माहिती

  या नवीन तंत्रज्ञानाला वैज्ञानिकांनी पिंग (PING) असं नाव दिलं आहे. लॅब स्टडीमध्ये याची क्षमता दाखवण्यात आली आहे. याचा उपयोग एपिलेप्सीच्या त्या रुग्णांसाठी केला जाऊ शकतो, ज्यांच्यावर औषधांचा काहीच परिणाम होत नाही. केवळ एपिलेप्सीच नाही, तर जिथे औषधांचा परिणाम होत नाही अशा मेंदूसंबंधी सर्व आजारांवरील उपचारांसाठी हे तंत्रज्ञान फायद्याचं आहे. यामुळे सध्याच्या न्यूरोसर्जिकल प्रक्रियेत अमुलाग्र बदल करता येऊ शकतो, असं मत व्हर्जिनिया विद्यापीठाच्या न्यूरोसायन्स अँड न्यूरोसर्जरी विभागातील संशोधक केव्हिन एस. ली यांनी व्यक्त केलं.

  एपिलेप्सीच्या एक तृतीयांश रुग्णांमध्ये अँटि-सिझर ड्रगचा (Anti-Seizure Drugs) उपयोग होत नाही. अशावेळी, मेंदूची शस्त्रक्रिया करून सिझर कमी किंवा नष्ट केला जातो. पिंगमुळे मात्र शस्त्रक्रियेशिवाय हा सिझर (Seizure) नष्ट करता येणार आहे. यासोबतच मेंदू संबंधित अन्य आजारांसाठी देखील याच प्रकारे उपचार शक्य आहे. त्यामुळे चिरफाड करण्याची आवश्यकता नसणारी शस्त्रक्रियेची ही अनोखी पद्धत, मेडिकल सायन्समध्ये एक महत्त्वाचा शोध ठरणार आहे.

  First published:

  Tags: Brain, Surgery