Home /News /lifestyle /

फोनवर सतत Notification आल्यावर तुमचीही चिडचिड होते का? मग याला हलक्यात घेऊ नका

फोनवर सतत Notification आल्यावर तुमचीही चिडचिड होते का? मग याला हलक्यात घेऊ नका

text notification anxiety : 'द गार्डियन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील व्हिडिओ निर्माती सनायत लारा अवघ्या 28 वर्षांची आहे. लोकांशी बोलण्यात ती खूप कम्फर्टेबल असते. पण फोनवर किंवा सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या मेसेजला लगेच उत्तर द्यायला लागलं की तिच्या अडचणीत वाढ होते. त्यात ती खूपच अस्वस्थ होते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 जून : सध्या सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. अगदी थोडेफार शिक्षण असलेले लोकही सोशल मीडियाचा वापर करताना पाहायला मिळत आहेत. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की आजचे तरुण वास्तविक जगापेक्षा आभासी जगामध्ये (Virtual World) अधिक सक्रिय आहेत. कारण त्यांचा स्मार्टफोन (Smartphone) त्यांना दिवसभर व्यस्त ठेवतो. प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे प्रोफाइल आहेत, प्रत्येक गोष्टीवर भाष्य करणे हा त्यांचा मनोरंजनचा भाग आहे. पण हे खरंच सत्य आहे का? तर नाही. एका अभ्यासानुसार, 73 टक्के तरुणांमध्ये सोशल मीडियाबद्दल नकारात्मक विचार आहेत. त्यांच्या नोटिफिकेशनमुळे त्यांना मानसिक त्रास होऊ लागला आहे. 'द गार्डियन'मध्ये (The Guardian) प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील व्हिडिओ निर्माता सनायत लारा (Senait Lara) अवघ्या 28 वर्षांची आहे. लोकांशी बोलण्यात ती खूप कम्फर्टेबल असते. पण फोनवर किंवा सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या मेसेजला लगेच उत्तर द्यायला लागलं की तिच्या अडचणीत वाढ होते. त्यात ती खूपच अस्वस्थ होते. याबाबत तिचे मित्रही तिच्याकडे तक्रार करतात. यानंतर सनायतने या वर्तनाबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेतला. मग तिला कळले की प्रत्यक्षात ती अशा मेसेजेस आणि डायलॉग्सचा विचार करूनच बेचैन (anxious) होते. विशेष म्हणजे अशा प्रकारचा त्रास, उत्साह (Excitement) किंवा चिंता (Anxiety) अनुभवणारी सनायत एकटी नाही. गेल्या वर्षी केलेल्या अभ्यासात, सुमारे 73% वापरकर्त्यांनी सोशल मीडियाबद्दल नकारात्मक विचार (Negative thoughts) व्यक्त केले. इम्युनिटीपासून डाइजेशनपर्यंत.. लवंग काढा पावसाळ्यात पिण्याचे आहेत खास फायदे आताच्या पिढीसाठी समस्या या अभ्यासानुसार, बहुतांश तरुणांमध्ये सोशल मीडिया आणि टेक्स्ट मेसेजिंगची चिंता वाढत आहे. याचे कारण म्हणजे सोशल मीडिया, मेसेजिंग अॅप्स इत्यादींवरून वारंवार येणारे नोटिफिकेशन. लोक अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. तज्ज्ञांच्या मते, 'मिलेनिअल जनरेशन' (1980 आणि 90 च्या दशकात जन्मलेल्या) या प्रकारची समस्या अधिक दिसून येत आहे. आणि ही पिढी आता मानसिक समस्येचे (Psychological problem) रूप धारण करत आहे. कोरोना नंतर परिस्थिती बिकट झाली तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 2019 नंतर कोरोनाच्या युगामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या कालावधीत, ऑनलाइन घडामोडींमध्ये सुमारे 61% वाढ दिसून आली. परिणामी, अमेरिकेतील प्रत्येक वापरकर्ता आता दररोज फोनवर सरासरी 47 संदेश सोडतो. तर 1,602 ईमेल उघडण्याची किंवा वाचण्याची तसदी घेत नाहीत. तज्ञ काय म्हणतात? न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्राच्या प्राध्यापिका एमिली बालसेटिस (Emily Balcetis) म्हणतात की ही परिस्थिती टाळण्याचा एकच मार्ग आहे, मर्यादा सेट करा. म्हणजे, एक मार्ग असा असू शकतो की झोपण्यापूर्वी फोन दुसऱ्या खोलीत ठेवा. आपण फोनमध्ये अलार्म सेट केल्यास, फक्त अलार्म-घड्याळ वापरणे चांगले. याच्या मदतीने आपण रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठताना फोनपासून दूर राहू शकतो. हे खूप मदत करेल.
    Published by:Rahul Punde
    First published:

    पुढील बातम्या