Home /News /lifestyle /

फक्त गोड पदार्थांसाठीच नव्हे तर या गोष्टींसाठीही साखर आहे उपयोगी, जाणून घ्या फायदे

फक्त गोड पदार्थांसाठीच नव्हे तर या गोष्टींसाठीही साखर आहे उपयोगी, जाणून घ्या फायदे

Tips to Use Sugar: गोडवा वाढवण्यासोबतच इतर कोणत्या गोष्टींसाठी साखर उपयोगी ठरू शकते पाहुयात.

    नवी दिल्ली, 09 डिसेंबर : आतापर्यंत तुम्ही साखरेचा (Sugar) वापर फक्त चहा, कॉफी, मिठाई, कुकीज, केक, शेक, सरबत आणि अनेक प्रकारचे गोड पदार्थ बनवण्यासाठी केला असेल. पण, साखरेचा उपयोग फक्त गोड (Sweet's) पदार्थांसाठीच होतो असे नाही. तुमची इतर अनेक कामे सुलभ करण्यासाठी देखील साखरेचा उपयोग होतो. गोडवा वाढवण्यासोबतच इतर कोणत्या गोष्टींसाठी साखर उपयोगी ठरू शकते, याविषयी जाणून (Tips to Use Sugar) घेऊया. जिभेच्या जळजळीवर आराम मिळेल काही वेळा काही गरम पदार्थ खाल्ल्याने किंवा प्यायल्याने अचानक जीभ पोळते/भाजते. त्यामुळे दीर्घकाळ जिभ (Tongue) रखरखत राहते. जास्त भाजले असल्यास काहीही खाल्ले तरी त्याची चव जिभेवर समजत नाही. अशावेळी थोड्याशा साखरेचा चांगला उपयोग होतो. पोळलेल्या जिभेवर थोडी साखर ठेवा आणि हळू हळू विरगळू द्या. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी कधी-कधी घरात काम करत असताना दुखापत होऊन त्यातून रक्त येऊ लागते. त्यावेळी रक्त ताबडतोब थांबवण्यासाठी तुम्ही साखरेची मदत घेऊ शकता. यासाठी रक्तस्रावाच्या ठिकाणी साखर ठेवा. त्यामुळे रक्तस्त्राव थांबतो आणि जखमही लवकर बरी होऊ लागते. हे वाचा - लक्ष द्या! रडू आल्यास अश्रूंना वाट करून द्या मोकळी; थांबवून ठेवल्यास होऊ शकतात आजार त्वचा स्क्रबिंग काही कारणास्तव तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये जाता येत नसेल किंवा घरात स्क्रबर नसेल. त्यामुळे त्वचेला स्क्रब करण्यासाठीही तुम्ही साखर वापरू शकता. मध, लिंबू, दही, मलई, नारळ किंवा बदामाचे तेल मिसळून तुम्ही त्वचेला हलक्या हातांनी स्क्रब करू शकता. यामुळे डेड स्कीन निघून जाते आणि त्वचा मुलायम आणि चमकदार बनते. ओठांसाठी ओठांवर लिपस्टिक लावल्यानंतर काही वेळाने त्याचा रंग फिका पडू लागतो. काहीवेळा याचे कारण खाणेपिणे देखील असू शकते. ओठांवर जास्त वेळ लिपस्टिक ठेवण्यासाठी लिपस्टिक लावल्यानंतर साखर ओठांवर लावावी. पाच मिनिटे ठेवल्यानंतर हळू हळू हलक्या हातांनी काढा. यामुळे तुमच्या लिपस्टिकचा रंग बराच काळ फिका पडत नाही. हे वाचा - Mental Health : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा कपड्यांवरील डाग अनेकदा स्वयंपाक करताना, खाताना किंवा इतर कोणतेही काम करताना कपड्यांवर डाग पडतात. ते घालवण्यासाठी तुम्ही साखरेचीही मदत घेऊ शकता. यासाठी साखरेचे जाड द्रावण तयार करून कपड्याच्या डागलेल्या भागावर ठेवा आणि पाच मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर, कापड घासून डाग काढून टाका, नंतर कापड साध्या पाण्याने धुवा. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या