मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Morning Routine : सकाळी उठल्यावर उत्साह वाटत नाही? मग या टिप्स नक्की फॉलो करा थकवा जाईल निघून

Morning Routine : सकाळी उठल्यावर उत्साह वाटत नाही? मग या टिप्स नक्की फॉलो करा थकवा जाईल निघून

सकाळी उठल्यावर उत्साह वाटत नाही? मग या टिप्स नक्की फॉलो करा थकवा जाईल निघून

सकाळी उठल्यावर उत्साह वाटत नाही? मग या टिप्स नक्की फॉलो करा थकवा जाईल निघून

अनेकदा पुरेशी झोप होऊनही तुम्हाला सकाळी उठल्यावर फ्रेश आणि उत्साही वाटत नाही. तेव्हा सकाळी उठल्यावर काही टिप्स फॉलो करा जेणेकरून तुमचा थकवा निघून जाण्यास मदत होईल.

माणसाची सकाळ चांगली झाली तर त्याचा संपूर्ण दिवस देखील चांगला जातो असे म्हणतात. परंतु अनेकदा रात्री पुरेशी झोप आणि आराम होऊनही काहींना सकाळी उठल्यावर उत्साही आणि फ्रेश वाटत नाही. सकाळी सकाळी कोणतेही काम करण्यासाठी उत्साह वाटतं नसल्याने संपूर्ण दिवस ही निरुत्साही जातो. एक दोन दिवस जर तुम्हाला सकाळी निरुत्साही वाटत असेल तर ती सामान्य गोष्ट आहे. पण जर दरोरोज तुम्हाला असा अनुभव येत असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या शरीराकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर आरोग्यासंबंधित मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तेव्हा सकाळी काम करण्यासाठी उत्साह वाटावा म्हणून काही टिप्स फॉलो करा.

दररोज उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटावे आणि दिवसभर उत्साह असावा असे वाटत असेल तर रुटीन मध्ये काही खास बदल करा. आयुर्वेदिक डॉक्टर नितीका कोहली यांनी इंस्टाग्रामवर काही पोस्ट करून याबद्दल जागृती केली आहे.

सकाळी लवकर उठणे :

जर तुमची सकाळ उत्साही आणि फ्रेश व्हावी असं वाटतं असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठायला हवं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ६ वाजता उठणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. लवकर उठल्यामुळे तुम्ही हेल्दी राहता आणि सोबतच तुमचा मेंदू फ्रेश आणि अॅक्टिव राहतो.

दररोज मालिश करा :

रात्री पुरेशी झोप होऊन देखील निरुत्साही वाटत असेल तर तुम्ही दररोज २० ते २५ मिनिटं तेलाने शरीराची मालिश करा. असे केल्याने तुमची नर्व्हस सिस्टम उत्तम रित्या काम करेल. शिवाय तुमचे शरीर देखील खूप अॅक्टिव्ह राहील. मालिश ही अशी क्रिया आहे जी शरीरावरचा दाब रिलीज करते आणि शरीर मोकळे करण्यास मदत करते.

योगा आणि प्राणायाम :

योग आणि प्राणायाम तुमच्या शरीराला हेल्दी ठेवण्यास मदत करू शकतात. यामुळे केवळ तुमचे शरीरच नाही तर मानसिक आरोग्य देखील सुधारते. योगा केल्यामुळे तुमच्या शरीराच्या मुख्य भागांना योग्य प्रमाणात रक्त पोहोचवण्यात मदत होते आणि तुमचे शरीर योग्य पद्धतीने काम करते.

ध्यानधारणा :

मेंदू शांत करण्यासाठी आणि त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दररोज सकाळी उठून ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. तज्ञांच्या सांगण्यानुसार ध्यान ही एक उत्तम पद्धत आहे जी तुमच्या मनाला आणि मज्जा संस्थेला संपूर्ण दिवसासाठी तयार करते.

गरम आणि ताजे अन्न :

गरम आणि ताजे अन्न खाण्याला आयुर्वेदात खूप महत्व आहे. तेव्हा दररोज सकाळी गरम आणि ताजे अन्न खाल्ल्याने शरीराला पुरेश्या प्रमाणात पोषक तत्वे प्राप्त होतात आणि शरीरातील उष्णता कायम राहते. त्यामुळे काम करण्यास देखील उत्साह वाटतो.

आंघोळ करणे : सकाळी थकवा दूर करण्यासाठी आंघोळ करण खूप महत्वाच आहे. आंघोळ केल्याने शरीरातील रक्त परिसंचरण देखील योग्य होते आणि थकवा नाहीसा होतो.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle