• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • मास्कसारखंच काम करतात नाकातील केस; कोरोना काळात Nose waxing ठरू शकतं घातक

मास्कसारखंच काम करतात नाकातील केस; कोरोना काळात Nose waxing ठरू शकतं घातक

नोज वॅक्सिंग (Nose Waxing) करून नाकातील केस (Nose hair) हटवून तुम्ही गंभीर आजारांना वाट मोकळी तर करून देत नाही आहात ना?

  • Share this:
मुंबई, 05 ऑगस्ट :  डोकं, भुवया आणि पापण्या सोडून आपल्या शरीरावर एकही केस (Hair) नसावा असं अनेकांना वाटतं. अगदी नाकातील केसही (Nose hair) अनेकांना नकोसे वाटतात. त्यामुळेच सध्या बहुतेक जण नोज वॅक्सिंग (Nose Waxing) करून घेतात. पण कोरोना काळात नोज वॅक्सिंग हानिकारक  (Nose Waxing side effect) ठरू शकतं. नोज वॅक्सिंग करणं म्हणजे तुमच्याकडे आजारांना शरीरात जाण्यापासून रोखण्याचं असलेलं शस्त्र फेकून देण्यासारखंच आहे. कारण नोज हेअर म्हणजे नाकातील केस हे मास्कसारखंच काम करतात (Nose hair benefits) . शरीरातील प्रत्येक अवयवाची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण असते. या रचनेमागे काही ना काही कारण असतं. असंच नाकातील केसांबाबतही आहे. आपल्याला अनावश्यक आणि सौंदर्यात बाधा वाटत असले तरी नाकातील केस किती फायद्याचे आहेत, हे तुम्हाला माहिती नाही. नाकामधील केस हे आरोग्याच्या (Health) दृष्टीनं अत्यंत महत्वाचे असतात. जेव्हा आपण नाकाद्वारे श्वास घेतो तेव्हा श्वासासोबत धूळ, मातीचे कण, जंतू नाकात गेल्यास त्यामुळे आजार होऊ शकतात. पण नाकातील केस ती हवा (Air) फिल्टर करत असतात. नाकात केस असतील तर धूळ, मातीचे कण, जंतू या केसांमध्येच अडकून बसतात. ते शरीरात प्रवेश करु शकत नाहीत.  या केसांमुळे हवेतील जंतू, बॅक्टेरीया (Bacteria) किंवा आजार पसरवणाऱ्या घटकांपासून आपलं संरक्षण होतं. रेस्पिरेटरी सिस्टीम (Respiratory System) चांगली ठेवण्यासाठी नाकातील केस हे महत्त्वाचे असल्याचं अनेक वर्षांपासून तज्ज्ञ सांगत आले आहेत, मात्र याकडे आता दुर्लक्ष होताना दिसत आहे. हे वाचा - ताप, सर्दी, खोकला असेल तर 'हेल्दी' असले तरी हे पदार्थ खाणं टाळा, हे आहे कारण न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार 2011 मध्ये इंटरनॅशनल अर्काईव्हज ऑफ अॅलर्जी अॅड इम्युनोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासनुसार, 233 रुग्णांचा अभ्यास केला असता ज्या लोकांच्या नाकात केस जास्त प्रमाणात होते त्यांना अस्थमा (Asthama) होण्याची शक्यता कमी असल्याचं तुर्की संशोधकांना आढळून आलं. हा एक निरीक्षणात्मक अभ्यास असल्यानं याची कारणं आणि परिणामाबाबत काही स्पष्ट होऊ शकलं नाही कारण अस्थमा हा आजार असून संसर्गजन्य नाही. 2015 मध्ये मेयो क्लिनिकच्या डॉक्टरांनी 30 लोकांवर नाकातील केस कापल्यावर काय परिणाम होतात, याविषयी अभ्यास केला होता. या संशोधकांनी नाकातील केस कापण्यापूर्वी आणि कापल्यानंतर नोज फ्लो (Nose Flow) किती होता हे अभ्यासले. नाकात केस जास्त असल्यास नोज फ्लोपण अधिक असतो, असं या अभ्यासातून दिसून आले. नोज वॅक्सिंग हे अपायकारक असल्याचं स्पष्ट करताना न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचे डॉ. एरिच वोईगट यांनी सांगितलं, नाकाच्या वरील भागापासून ओठांचे दोन्ही कोन जोडल्यास त्रिकोण तयार होतो. हा त्रिकोण चेहऱ्यावरील घातक त्रिकोण असतो. डोळे, नाक आणि तोंडाच्या आसपासचा भाग हा खूप संवेदनशील असतो. चेहऱ्यावरील या भागात अनेक महत्वपूर्णनसा असतात आणि त्या थेट मेंदूला जोडलेल्या असतात. या त्रिकोणातील रक्तवाहिन्यांचा थेट संबंध मेंदू नजीकच्या रक्तवाहिन्यांशी असतो. डोळे, तोंड आणि नाकाजवळच्या त्वचेला संसर्ग लवकर होतो. एखादा केस जर ओढून काढला तर या रक्तवाहिन्यांना (Blood Vessels) इजा पोहचते आणि त्यातून रक्त येते, अशातच जर तिथं संसर्ग झाला तर तो मेंदूतील नसांवरही परिणाम करू शकतो. हे वाचा - आपल्याच वाईट सवयी देतात डोकेदुखीला आमंत्रण; थोडा बदल संपवेल कायमचा त्रास 1896 मध्ये डॉक्टरांच्या एका पथकाने प्रख्यात मेडिकल जर्नल द लॅन्सेटमध्ये लिहिलं होतं की, अनेकदा नाकात पिंपल्स येतात. याला नेजल वेस्टिब्युलिटीस किंवा फॉलिक्युलिटिस असं म्हणतात. प्रदूषण, धूळ किंवा मातीच्या कणांमुळे हे पिंपल्स येतात. अशा वेळी नाकातील केस ओलावा असलेलं एक जाळं तयार करतात. यामुळे हा संसर्ग फुफ्फुसापर्यंत जाऊ शकत नाही. याचाच अर्थ नाकाच्या आतील भागातील रचना ही जंतूरोधक अशी असते. अशावेळी जर लोकांनी नोज वॅक्सिंग केलं तर जंतूंचा मार्ग स्वच्छ होऊन जातो आणि ते सहज फुफ्फुसापर्यंत जाऊन पोहोचू शकतात. काही तज्ज्ञांच्या मते, नोज वॅक्सिंग केल्यास रेस्पिरेटरी इन्फेक्शनचा धोका वाढतो, असं अद्याप पूर्णतः स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे नोज वॅक्सिंग करूच नये, असंदेखील म्हणता येणार नाही. पण कोरोना काळात कोरोनासारख्या श्वसनसंबंधी आजारांचा धोका लक्षात घेता आपण तात्पुरतं हे नक्कीच टाळू शकतो.
First published: