नोकियानं लाँच केला स्मार्टफोन 3310

18 मेपासून हा फोन भारतात उपलब्ध होणारेय. या फोनची किंमतही 3310 रुपयेच आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 16, 2017 03:31 PM IST

नोकियानं लाँच केला स्मार्टफोन 3310

16 मे : नोकियानं स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन लाँच केलाय. याचं नाव आहे स्मार्टफोन 3310.  आणि 18 मेपासून हा फोन भारतात उपलब्ध होणारेय. या फोनची किंमतही 3310 रुपयेच आहे.

काय फिचर्स आहेत या स्मार्टफोनमध्ये ?

1 . या फोनमध्ये 1200mahची बॅटरी आहे. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे ही बॅटरी एक दिवसाचा टाॅक टाईम आणि महिन्याभराचा स्टँडबाय बॅकअप देते.

2 . फोनमध्ये 2.4 इंचाची कर्व्ड डिस्प्ले आहे.

3. 2G कनेक्टिविटी आहे.

Loading...

4. फोनमध्ये डुएल सिम वापरता येणारेय.

5. इंटरनल मेमरी 16MB आहे. ती 32MBपर्यंत वाढवता येईल

6. 3.5mmचा हेडफोन जॅक, एलईडी फ्लॅशलाईट आणि स्नेक गेमही आहे.

7. चार रंगात फोन मिळतो. पिवळा, लाल, डार्क निळा आणि ग्रे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2017 12:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...